1001marathiessay.blogspot.com
फुलांचे मनोगत मराठी निबंध
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शालेय जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे निबंध लिहावे लागतात .त्यामध्ये मनोगत हा निबंध प्रकार फारच आकर्षक आणि छान वाटतो. एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांच्या जागी स्वतःला ठेवून त्यांच्या मनातील भावना काय आहेत? हे अशा प्रकारच्या निबंधांमध्ये व्यक्त करावे लागते.त्या वस्तू किंवा व्यक्तीशी पूर्णपणे एकरूप होण्याची एक संधी अशा मनोगत पर निबंधामधून भेटते.
चला तर मग मित्रांनो आता आपण बघू या फुलांचे मनोगत मराठी निबंध | fulanche manogat Marathi nibandh
फुलांचे मनोगत Fulanche manogat
काल मामाच्या गावाला गेलो होतो. मामा मला एका लग्नसमारंभात घेऊन गेले होते. लग्नामधील सुंदरता बघून फारच मज्जा वाटली.सजावट तर इतकी अप्रतिम केली होती की, जणू इंद्राचा दरबार भरलेला आहे. असे वाटत होते. मी मामा चा हात सोडला आणि लग्न मंडपातील सर्व सजावट जवळ जाऊन बघू लागलो.
फुलांचे मनोगत
नवरदेव नवरी च्या खुर्ची जवळ पोहोचलो तेथे वेगवेगळ्या रंगीत फुलांची सुंदर आरास तयार केलेली होती. अगदी सुंदर पद्धतीने फुलांची नक्षी तयार केलेली होती. मध्यभागी ठेवलेल्या एका मोठ्या गुलाबाचा वास दुरूनही वाऱ्याबरोबर येत होता. मी डोळे बंद करून तो सुवास एका मोठ्या श्वासाने अनुभवत होतो.
काय छान सुगंध आला कि नाही असा आवाज माझ्या कानावर पडला मी इकडे तिकडे बघू लागलो माझ्या आजूबाजूला कुणीही नव्हते सगळीकडे नजर टाकल्यावर प्रत्येक जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त होता स्त्रिया आपल्या साड्या आणि अलंकार नीट करण्यामध्ये व्यस्त होत्या .पुरुष मंडळी गप्पामध्ये व्यस्त होती. तर काही जण मंडपाची सुंदरता न्याहाळत होते.
फुलाचे मनोगत निबंध
पुन्हा आवाज आला अरे ,' आम्ही याठिकाणी सजवलेली ही सर्व फुले तुझ्याशी बोलत आहोत. बघ आमची हि सुंदरता बघून तू देखील मोहित झालास कि नाही. तूच काय फुलांचे सौंदर्य मोठ्यांना भूल पाडते.'
आम्ही फुले कधीही दुःखात नसतो. फक्त आनंदाने फुलत राहणे एवढेच आम्हाला समजते आणि तेच आम्ही करतो. सर्व फुले माझ्याशी बोलू लागलेले होते.
मोगरा म्हणाला माझा पांढराशुभ्र रंग कोणाच्या या मनात कितीही मळभ असले तरीदेखील ते दूर करून टाकतो. माझ्या सुगंध एक धुंदी निर्माण करतो. शांत प्रसन्न वातावरणामध्ये ा वाऱ्याच्या झुळकीबरोबर दूरदूरपर्यंत माझा सुगंध पसरत जातो.
पाण्याच्या पात्रामध्ये ठेवलेले कमलपुष्प मोगऱ्याला थांबवत म्हणाल , माझाही थाट फार वेगळा असतो .माझ्यासाठी स्वतंत्र भांड्याची व्यवस्था करावी लागते. मोठमोठ्या जलाशयांमध्ये आणि तलावांमध्ये मी राजा महाराजांसारखा विराजमान झालेला असतो.
फुलाचे मनोगत निबंध मराठी
मोगरा आणि कमळ यांचा संवाद दुरूनच शांतपणे जाई जुई आणि शेवंतीची फुले ऐकत होती. त्यांचा संवाद ऐकण्यात त्यांना फार मज्जा वाटत होती. मी त्यांना म्हटलं तुम्ही काही बोलत नाहीत का? त्यावर जाई जुई बोलू लागली आम्हाला शांतपणे निसर्गाचा आनंद घेणे खूप आवडतं. आमच्या वेलीवर झुल्यात राहणं हा आमचा आवडता छंद. शेवंती ची फुले बोलू लागली, लग्न समारंभामध्ये माझ्याशिवाय पान हलत नाही.
प्रत्येक लग्नामध्ये शेवंतीचे ताट असतेच माझ्या फुलांचा सुगंध हा लग्नासाठी चाच राखीव सुगंध आहे.लग्नामध्ये तुम्हाला इतर कोणत्या फुलाचा सुगंध अनुभवायला मिळेल किंवा नाही परंतु शेवंतीचा सुगंध प्रत्येक लग्नामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेलच यात अजिबात शंका नाही.
गोंधळ वाढू लागलेला होता ट्युलीप, जास्वंद ही फुले अगदी तटस्थ राहून सर्व संवाद ऐकत होते.
थांबा रे थोडं, फार झालं तुमचं ,..तुमचं हे वागणं आपल्या स्वभावाला शोधून नाही .आपण फुले आहोत . फुलांनी कसं शहाण्यासारखं वागावं. अचानक आलेला आवाज बघून फुले बावरली. हा आवाज होता त्यांचा राजा म्हणजे लाल लाल गुलाबाचा. जे मध्यभागी मोठ्या थाटात विराजमान झालेले होते.
फुलाचे मनोगत मराठी
गुलाबाचे फुल आता शांततेने बोलू लागले. मित्रांनो तुम्ही माणसांसारखे का भांडता? आपला जन्मच मुळी इतरांना आनंद आणि सुख देण्यासाठी झालेला असतो. तसे निसर्गाने प्रत्येकाला याच कामासाठी निर्माण केलेले आहे परंतु माणसे मात्र बऱ्याच वेळा विसरलेले दिसतात. गुलाबाच्या बोलणे सर्व फुले शांतपणे ऐकत होते.
गुलाब पुन्हा हा बोलू लागला. तो मला म्हणाला ,"ही तुझ्या पायाजवळ पडलेली फुले, तुझ्याशी काय बोलतात ते जरा ऐकतोस का?"माझ्या पायाजवळ पडलेले काही फुले तसेच पायाखाली चुरगळले गेलेले फुले कण्हत कण्हत बोलू लागले.
माणसे फुलांच्या माळा बनवतात . मोठ्या कष्टाने त्या माळा आवश्यक त्या ठिकाणी बांधतात आणि काही वेळानंतर त्याच माळा कसलाही विचार न करता तोडून फेकून देतात आहे आमच्यावर पाय ठेवून निघून जातात. आमचे अंग दुखू लागते. पोर आम्ही तुमच्याकडे काहीही तक्रार करत नाही कारण दुसऱ्यासाठी जीवन अर्पण करणे हेच आमच्या फुलाच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे .
सुकलेल्या फुलांचे मनोगत फुलांचे मनोगत निबंध मराठी
गुलाब बोलू लागले चला बस झाले आता गप्पा मारणे पुरेसे झाले. नवरदेवाची वरात मंडपा पर्यंत येऊन पोहोचली त्यांच्या सुखी जीवनासाठी देवाकडे शुभेच्छा मागून आणि आपल्या जीवनाचे कार्य सफल करूया.
एवढे बोलून फुलांचा आवाज येणे बंद झाले. मलाही फुलांकडून परोपकार शिकायला मिळाला. नंतर त्या फुलांकडे बघत मी मामाकडे पोहोचलो. लग्न समारंभ झाल्यानंतर जेवणावर ताव मारला. पुन्हा पावले त्या फुलांच्या दिशेने वळली. ती फुले त्यावेळी मंडपात उपस्थित असलेल्या अनेक लहान लहान मुलांच्या हातांमध्ये दिसत होती. काही मुले ती फुले पाकळ्या पाकळ्या करून उंच फेकत होती. ते बघून मला फुलांचा एकच शब्द पुन्हा पुन्हा आठवू लागला...... परोपकार ..... परोपकार....
प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निबंध कसा वाटला ? मला कमेंट करून नक्की सांगा.
या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
- फुलांचे मनोगत
- सुकलेल्या फुलांचे मनोगत
- फुलांचा संवाद
- फुले बोलू लागली तर मराठी निबंध
- फुले आणि मुले संवाद.
हे वाचायला विसरू नका
- एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
- मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची कैफियत
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या. Tips for personality development in Marathi.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
- शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
- मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
- विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
- मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
- माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
- जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
- मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
- भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे , |bhuta paraspare jado maitr jivanche|
- पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
- माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
- उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
- सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
- माझे घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.