upkarmarathi.com
वाचाल तर वाचाल घोषवाक्यवर आधारित निबंध .
आपल्यासाठी घेऊन आलो आहोत वाचाल तर वाचाल हा कल्पनाविस्तारात्मक निबंध.या निबंधाचा तुम्ही परीक्षांमध्ये किंवा विविध स्पर्धांमध्ये उपयोग करू शकता. लहान मुले या निबंधातील काही भाग आपल्या उपयोगाला आणू शकतात. निबंध वाचल्यानंतर निबंध कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका .
चला तर मग बघुया | वाचाल तर वाचाल हा निबंध.
|वाचाल तर वाचाल मराठी निबंध vachal tar vachal Marathi nibandh
" वाचनाने मनुष्य समृद्ध होतो ". "वाचाल तर वाचाल" असे अनेक प्रकारचे घोषवाक्य आपण वारंवार ऐकत असतो. यावरून वाचनाचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. ज्ञान मिळवण्याचे सर्वात योग्य साधन म्हणजे वाचन हा छंद होय.
प्रत्येक व्यक्तीला कोणतातरी छंद असतो. त्याप्रमाणेच अनेक लोकांना वाचनाचा देखील छंद असतो. संत महात्म्यांनी देखील मनुष्याने कोणतातरी छंद जोपासला पाहिजे असे आपल्या अनेक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की,
असा धरी छंद |
जाई तुटोनिया भवबंध
कोणताही एखादा छंद जोपासल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक रंजकता निर्माण होते व चाकोरीबद्ध जीवन जगण्यामुळे आपल्याला कंटाळा येत नाही.. छंद जोपासण्यासाठी थोडीफार पैसेदेखील खर्च होतात पण आनंद मात्र भरपूर मिळतो. काहीजणांचे छंद दुसऱ्यांना त्रासदायक देखील ठरतात. तर काही जणांच्या छंदामुळे लोकांसाठी खूप फायदा होतो. उदाहरण द्यायचे झाले तर , श्री केळकरांना वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह करण्याचा छंद होता . त्यामुळे त्यांच्या या संग्रहातून राजा केळकर संग्रहालय निर्माण झाले आणि आज अनेक लोकांना मनोरंजनासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी छान ठिकाण निर्माण झाले.
वाचाल तर वाचाल म्हणजे काय
अशा विविध छंदा प्रमाणेच वाचन एक अतिशय उपयोगी व ज्ञानवर्धक छंद आहे. वाचनाचा छंद मात्र लहानपणीच लागणे फार फार उपयुक्त ठरते. एकदा कि अक्षर ओळख झाली मग माणसाला हळूहळू वाचता येऊ लागते. पहिल्यांदा वाचता येऊ लागल्यावर खूप आनंद मिळतो. शाळेतून घरी जाताना रस्त्यावर असणारे विविध फलक वाचण्याचा प्रयत्न सुरू होतो. जे शब्द दिसतील ते शब्द वाचण्याचा सपाटाच चालू होतो.
वाचाल तर वाचाल बाबासाहेब आंबेडकर
ज्याला आपले ज्ञान वाढवायचे असेल त्याने वाचनाचा छंद जोपासायला हवा. त्यामुळे ज्ञानात फार मोठ्या प्रमाणात वाढ होते. ज्ञानाचे महत्त्व पटवून देताना सावित्रीबाई फुले असे म्हणतात की,
विद्या हे धन श्रेष्ठ आहे रे
सार्या धनाहून
त्याचा साठा जयापाशी
ज्ञानी तो मानती जन
ज्ञान तर अनंत आणि अगाध आहे. ते संपूर्ण मिळवण्यासाठी अनेक जन्मही पुरणार नाहीत. त्यामुळे आपल्या आवडीनुसार प्रत्येक जण वाचनाचा मार्गही ठरवतो. व आपल्या आवडीनुसार वाचनाला सुरुवात करतो. वाचनातून ज्ञानप्राप्ती बरोबरच मनोरंजनही होते. वाचन माणसाला जगण्याचे वेगवेगळे अर्थ समजावते , माणसाला मोठे करते. वाचनामुळे माणसाचे विचार आणि मन समृद्ध होतात. मनामध्ये विशालता निर्माण होते. वाचन माणसाला वेगळ्याच जगात घेऊन जाते.
वाचनाचा छंद जोपासणे फारसे अवघडही नाही. हा छंद जोपासण्यासाठी ग्रंथालयांचा चांगला उपयोग होतो. तरीदेखील आपल्याला जे पुस्तके आवडतात ती पुस्तके आपण विकत घेतो आणि जतन करून ठेवतो. वेळ मिळेल त्यावेळी पुन्हा पुन्हा वाचून आनंद मिळवतो.
ज्या व्यक्तीच्या अंगी वाचनाचा छंद आहे त्याला कंटाळा येत नाही .त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी इतर लोकांनाही आवडते कारण की ,त्याच्याकडून लोकांना सतत नवीन नवीन माहिती मिळत राहते. आयुष्य जगत असताना कधीकधी आपले सगळे सोबती देखील आपला कंटाळा करतात. पुस्तक असे मित्र आहेत की ते आपली संगत कधीही सोडत नाहीत . संकटात आणि आनंदात योग्य पद्धतीचे वर्तन कसे करावे याचे ज्ञान पुस्तके सतत शिकवत असतात. उत्कृष्ट मार्गदर्शक असतात त्यामुळेच तर ,ग्रंथ हेच गुरु असे म्हटले जाते.
या सर्ववरून मला आपणास हेच सांगावेसे वाटते की प्रत्येकाने वाचनाचा छंद नक्कीच जोपासला पाहिजे.
- शालेय जीवनात खेळाचे महत्व
- या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi
- माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
- माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
- बालपण /रम्य ते बालपण
- माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay
- माझी आई - माझा छोटासा निबंध
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.