1001marathiessay.blogspot.com


             आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण घेत असताना कोणते तरी शिक्षक आपल्या मनाला भावतात. त्यांचे शिकवणे ,त्यांचे बोलणे आपल्या मनात घर करून राहते .पुढे आयुष्यभर ते आपल्याला आठवतात.
     असेच मी आयुष्यातील माझे आवडते शिक्षक याच्यावर आधारित निबंध तुमच्यासमोर मांडत आहे तो तुम्ही नक्की वाचा.
    चला तर मग बघुया एक छानसा मराठी निबंध माझे आवडते शिक्षक.


                माझे आवडते शिक्षक maze avdate shikshak

        काही दिवसांपूर्वीच माझ्या वाचनामध्ये एक कविता आली. कवितेच्या ओळी फारच छान होत्या. ते वाचल्या बरोबर मनाला स्पर्शून गेल्या आणि आमच्या आवडत्या शिक्षकांची आठवणही मनात दाटून आली. त्या ओळी अशा होत्या
     गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
    आम्ही चालवू हा पुढे वारसा

       या ओळी वाचताच मला माझे प्रिय गुरुजी वाडेकर सरांची खूप आठवण आली. मी तिसरीत असताना वाडेकर सर आमचे वर्गशिक्षक म्हणून  काम पाहत होते.
          सरांची आणि माझी गट्टी जुळण्याचे एक मुख्य कारण असे की, मी तिसरीत असेपर्यंत मला साधा दोन चा पाढा येत नव्हता. मला पाढ्यांची प्रचंड भीती वाटत असे. वाडेकर सरांच्या हसऱ्या आणि मनमिळावू स्वभावामुळे तो पाढा मला अगदी काही मिनिटातच पाठ झाला. पाढा पाठ  झाला म्हणजे मला फार मोठे युद्ध जिंकल्यासारखे वाटत होते. मी अक्षरशः उड्या मारत होतो. भानावर आलो तेव्हा बघितले सर माझ्याकडे बघून गालातल्या गालात फार छान हसत होते. त्यांचा तो हसरा चेहरा आजही डोळे बंद केल्यावर आठवतो . मनाला एक प्रेरणा देऊन जातो.
         आता मी इयत्ता आठवी मध्ये आहे. वाडेकर सर आजही आम्हाला गणित विषय शिकवतात. पाचवीनंतर तासिका सुरू झाल्या. गणिताच्या तासिकेला दांडी मारलेली आज पर्यंत मला आठवत नाही. सरांच्या तसिकेला   बसणे म्हणजे एक पर्वणीच असते.
        सर गणित शिकवत असताना गणितातील अंक जणू आमच्याशी खेळू लागतात. गणितातील मोठमोठ्या पदावल्या आणि सूत्रे आमच्या जिभेवर अक्षरशः नाचू लागतात. गुणाकार ,भागाकार ,बेरीज, वजाबाकी क्षेत्रफळ ,परिमिती, भूमिती ,बीजगणित यांच्यावर आम्ही जणू तुटून पडतो. एक एक गणित युद्धभूमीवर शत्रूला भुईसपाट करावे तसे आम्ही सोडवून टाकतो.
         इतर विषयाचा अभ्यास ,,बस आता बस ,असे म्हणावे वाटते . गणिताला मात्र अजून अभ्यास हवा असेच सतत वाटत राहते. गणित म्हणजे कंटाळवाणा विषय असे जर कोणी म्हटले तर मला त्यांच्या दुर्दैवाची कीव करावीशी वाटते. त्याच वेळी आम्हाला गणितासाठी छान शिक्षक आहेत याचा अभिमानही वाटतो.
         वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर वाडेकर सरांचे अगदी मैत्रीपूर्ण नाते आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला रागवताना मी त्यांना पाहिलेले नाही. नेहमी अत्यंत हसऱ्या चेहऱ्याने आणि उत्साहाने ते आम्हाला शिकवत असतात. एखादी शंका त्यांना विचारले असता जोपर्यंत आमच्या शंकेचे पूर्ण निरसन होत नाही तोपर्यंत विविध उदाहरणे देऊन ते आम्हाला समजावत असतात.
      गणित शिकवताना त्यांच्या तोंडून एक वाक्य सतत ऐकायला मिळते ," मी तुम्हाला हजार वेळा गणित समजावून द्यायला तयार आहे परंतु तुम्हाला समजले नसेल तर तुम्ही समजले असे चुकूनही सांगू नका.जोपर्यंत तुमची संकल्पना पूर्णपणे स्पष्ट होत नाही तोपर्यंत मला तुम्ही शंका विचारू शकता." त्यांचे हे विश्वास पूर्ण शब्द आम्हाला अभ्यासामध्ये गोडी निर्माण करतात.
        शिकवताना ते इतक्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात की नंतर मनात काही शंकाच उरत नाही. खरोखर त्यांच्या इतका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती मी आजपर्यंत बघितलेला नाही.
          शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे यामध्येही वाडेकर सर फार उत्साहाने सहभाग  घेतात. सरांचे वय सुमारे 33 वर्ष आहे.  सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य बसवताना ते स्वतः नृत्य करून दाखवतात. त्यांनी आमच्या वर्गाच्या बसवलेल्या गरबा (दांडिया) नृत्याचा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला होता.
      नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यात ही त्यांना फारच आनंद मिळतो. ती नेहमी सांगतात की , 'जुनं हे जरी सोनं असलं तरी नवीन हे काळाची गरज आहे. 'आपली संस्कृती आणि संस्कार जपून नवीन जीवन पद्धतीचा स्वीकार करण्यात काहीच गैर नाही. असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
     वाडेकर सरांमुळे शिक्षण देणे किंवा घेणे ही प्रक्रिया किती आनंददायी आणि सहज सुलभ असू शकते याचे प्रत्यंतर येते. वाडेकर सर्वांसारखे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एकदा तरी त्याला मिळालेच पाहिजेत. देवाकडे मी अशी प्रार्थना करतो. माझ्या आवडत्या शिक्षकांना म्हणजेच वाडेकर सरांना मी मनापासून नमस्कार करतो आणि धन्यवाद देतो.



   मित्रांनो तुम्हाला निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.

हे निबंध वाचायला अजिबात विसरू नका .
  1. विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
  2. वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
  3. माझी आई - माझा छोटासा निबंध
  4. आजची स्त्री मराठी निबंध
  5. आमचे वनभोजन
  6. अति तिथे माती
  7. विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
  8. माझे आवडते शिक्षक my favourite teacher Marathi essay
  9. फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
  10. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  11. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  12. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  13. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  14. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  15. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  16. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  17. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  18. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  19. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  20. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  21. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  22. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  23. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.    

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने