www.upkarmarathi.com
माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध | maza avismarniya prasan
नमस्कार मित्रांनो , आज आपण माझ्या जीवनातील एक भीतीदायक व अविस्मरणीय लक्ष वेधून घेणारा प्रसंग पाहणार आहोत . चला तर पाहूया. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग.
माझ्या जीवनातील अविस्मरणीय घटना मराठी
लेखन: कृष्णा दत्तात्रय पगारे.
नवोदय विद्यालय खेडगाव नाशिक
तर उन्हाळ्याचे दिवस होते ,व मी नवोदय परीक्षा मध्ये भाग घेतला होता. अभ्यास तर खूप केला होता आणि परीक्षेचा दिवस हळूहळू जवळ येत होता. मी मनापासून अभ्यास करत होतो .शाळेत आमचे सर पण आमच्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायचे. असेच हळूहळू परीक्षा तीन दिवसावर आली. आम्ही सर्व मित्र मैत्रिणी अभ्यास करायला लागलो. असे करता करता परीक्षा साठी फक्त एक दिवस उरला होता .आमच्या मित्र-मैत्रिणींचा असा नियम होता की परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायचा नाही . जरा आराम करायचा.
असा हा दिवस उगवला .आमचे परीक्षेचे ठिकाणी सटाणा येथे होते .मी तहाराबादला राहत होतो .जे विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसले होते ते सर्व शाळेत जमले. आम्हाला परीक्षा ठीकाणी सोडायला स्कूल बस येणार होती. तर आम्ही सर्व मित्र जमलो, वर चर्चा केली की कोणी काय घेतले, किती अभ्यास केला ,व तिथे वेळ लागणार होता म्हणून सगळ्यांनी टिफिन आणले होते. तर आमचे सर आले आमच्या सोबत दोन सर ,आणि दोन मॅडम होत्या. आमचे मुख्याध्यापक व शाळेचे संस्थापक होते .तर आम्ही सर्व स्कूल बस मध्ये बसलो . सर्व विद्यार्थ्यांनी जोराने देवाचा जयघोष केला .सर्व एका सुरात म्हणाले "गणपती बाप्पा मोरया."
स्कूल बस निघाली. आम्ही सर्व मुले बस मध्ये गप्पा मारत सटाण्याला पोहोचलो. परीक्षेच्या ठिकाणी गेलो. परीक्षेचा वेळ सकाळी नऊ ते अकरा होती. आम्ही साडेआठ वाजता सटाणा येथे पोहोचलो. तिथे मला समजले की, माझी परीक्षा सटाण्याला नसून ती माझ्या जन्मा गावानुसार साक्री ला आहे. मग परीक्षेची वेळ झाली आणि मी सटाण्यालाच होतो .काही क्षणांसाठी मला असे वाटले की एवढा एक वर्ष अभ्यास केलेला वाया गेले. असे वाटले पण माझे सर मला बस स्टॉप वर घेऊन गेले. 9:15 झाले व आम्हाला एसटी बस घेतली .आम्ही गेलो तिथून सरांची गाडी मला सोडायला साक्रीला येणार होती. साक्री पोहोचत मला 10:15 होऊन गेले. मला परीक्षा स्थळी प्रवेश भेटत नव्हता कारण वेळ खूप झाली होती. तर कसातरी मला प्रवेश भेटला.
माझ्या जीवनातील आनंददायी क्षण
मी परीक्षा द्यायला बसलो . मला तीन तासाचे परीक्षा फक्त 45 मिनिटात द्यायची होती. मी परीक्षा हॉलमध्ये गेलो व पेपर प्लास्टिक रेपिंग मधून बाहेर काढला. व सोडवायला सुरुवात केली. माझे सर किती या शिक्षकांकडे गेले व त्यांनी त्यांना विनंतीकरून मला पंधरा मिनिटे जास्त मिळवून दिले. सरांना परत येण्यास 45 मिनिटे लागून गेली. त्या वेळात माझा पेपर होऊन गेला होता. मी तो पेपर 45 मिनिटात सोडवला होता . सर आश्चर्यचकित झाली व मला म्हणाले की अजून पंधरा मिनिटे जास्त आहे , पण मी सांगितले की माझा पेपर झाला आहे व मी घरी गेलो. सर्वांना माझ्या निकालाची चिंता होती . सर्वांना वाटायचे की मी पेपर पंचवीस मिनिटात दिला आहे. माझा नंबर नाही लागु शकत, पण रिझल्ट लागला आणि सर्व दंग झाले. मी पास झालो व सर्व आनंदात होते. मला थोडे दुःख पण वाटत होते, कारण आई-वडिलांना सोडून होस्टेलमध्ये रहायचे होते. मी पास झालो म्हणून शाळेने माझा सत्कार केला.
हा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला. अडचणी आणि संकटे येणारच. तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण जर आपले कष्ट आणि तयारी प्रामाणिकपणे केली असेल तर, अडचणी केवढे असू दे आपण त्यातून बाहेर येतोच.
विशेष धन्यवाद
* माझे आई - वडील
* शिक्षक :- गुरुवर्य गर्दे सर व जिरे सर
* आणि ज्यांनी मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली ते माझे मामाश्री श्री विजय साळवे सर .
- स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी माहिती वाचा .
- राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .
हे वाचायला विसरू नका.
- मी मासा बोलतोय
- मी शेतकरी बोलतोय
- झाडे आपले मित्र
- पैंजण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- उपकार कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे निबंध वाचायला विसरू नका
- आजची स्त्री मराठी निबंध
- Which topics of essays can come in board exam 2020
- शालेय जीवनात खेळाचे महत्व
- या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi
- माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
- माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
- बालपण /रम्य ते बालपण
- माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay
- माझी आई - माझा छोटासा निबंध
- संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
- बैल
- नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
- माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
- लॉक डाऊन चे फायदे लेख वाचा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.