1001marathiessay.blogspot.com
मी पाहिलेला समुद्र किनारा वर्णनात्मक मराठी निबंध
मित्रांनो आपल्याला कुठे ना कुठे फिरायला नेहमी आवडते .फिरण्यामुळे विविध भागातील संस्कृतीची, लोकजीवनाची आपल्याला ओळख होते .पुस्तकात वाचून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिकलेले कधीही विसरत नाही.
असाच माझ्या जीवनात एक छान प्रसंग घडला. त्यातून माझ्या मनाला खूप आनंद मिळाला. चला तर मग बघुया तो प्रसंग मी पाहिलेला समुद्र किनारा या मराठी वर्णनात्मक निबंधातून.
मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara Marathi nibandh.
मी एका अंशा लहान खेड्यात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. माझे नाव उदय आहे मला निसर्गाचे निरीक्षण करायला खूप आवडते. निसर्गातील प्रत्येक लहानसहान घटनांचे बारकाईने निरीक्षण करणे हा माझा आवडता छंद आहे.
खेड्यामध्ये आकर्षक असे सूर्योदय आणि सूर्यास्त नेहमीच बघायला मिळतात. शेतांमधील हिरवाई आणि निसर्ग भरभरून बघण्याचा आनंद मला लहानपणापासूनच घेता आलेला आहे.
नदीचे काठ, तलाव ,धरण हे सारं बघून झालेलं होतं .आता फक्त विशाल अशा समुद्राचे दर्शन घेणे बाकी आहे असे मनात असताना शाळेची सहल जाणार आहे अशी सूचना वर्गामध्ये आली. मी खूप आग्रह करून वडिलांना सहलीचे पैसे करायला सांगितले. वडिलांनीही मला नाराज केले नाही. मी त्यांचा लाडका मुलगा आहे ना!!
अष्टविनायक दर्शनासाठी शाळेची सहल जाणार असे ठरले होते ,आणि त्यातच गणपतीपुळे येथील गणपतीचे दर्शन घेण्याचेही सहलीमध्ये नियोजन होते. माझ्या मनात गणांचा राजा गणरायाचे दर्शन घेण्याचा आनंद होताच त्याहूनही अधिक गणपतीपुळे येथे असलेला समुद्र किनारा मला खुणवत होता.
समुद्रकिनारा
सहलीचा दिवस आला. आम्ही सोमवारी पहाटेच निघालो. पुण्यामधील थेऊरचा चिंतामणी महागणपती इत्यादींचे दर्शन घेऊन आम्ही गणपतिपुळे च्या दिशेने निघालो तत्पूर्वी कोल्हापूर येथील अंबाबाई चे दर्शन घेणे हि आम्ही विसरलो नाही. महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आम्ही कोल्हापूरच्या बाहेर निघालो गणपतीपुळे च्या दिशेने.
माझे मन अत्यंत आतुर झाले होते . गणपतीपुळे चा समुद्र लांब होता परंतु माझ्या मनाच्या डोहात मात्र असंख्य तरंग एकाच वेळी उठत होते. गणपतीपुळे येथे पोहोचताना आम्हाला अंधार होणार हे जवळजवळ निश्चित झाले होते. त्यामुळे माझ्या मनाची हुरहूर अजूनच वाढलेली होती.
गणपतीपुळे येथे पोहोचल्यानंतरबराच अंधार झालेला होता त्यामुळे समुद्रकिनाऱ्याचे दर्शन घेणे हे तूर्तास तरी शक्य नव्हते . शिक्षकांनी उद्या सकाळी गणपतीचे आणि विशाल समुद्राचे दर्शन घेण्याचे सांगितले. काहीसे नाराज का होईना नाईलाजाने आम्हाला सरांनी सांगितल्याप्रमाणे करावेच लागणार होते. मनाची समजूत घालत आम्ही आमच्या मुक्कामाच्या दिशेने निघालो.
आमची सहल, आमची शैक्षणिक सहल .
दिवसभराच्या प्रवासाने शरीर थकलेलं होतं .मन मात्र समुद्रकिनाऱ्या कडेच धाव घेत होतं. खरोखरच मनाचा अवैध थांबवणं किती अवघड असतं याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेत होतो. जेवण वगैरे झाल्यानंतर कधी डोळे लागले समजले नाही. स्वप्नातही बऱ्याच वेळा समुद्र किनारा फिरून झाला.
सकाळी अगदी पहाटेच सरांनी आम्हा सर्वांना उठवले आणि आता आपण समुद्रकिनारा बघण्यासाठी जाणार असे सांगितले. झोपेमुळे अंगात आलेला आळस एका क्षणात नाहीसा झाला आणि अगदी मनापासून वाट बघत असलेल्या दर्या राजाचं दर्शन घेण्याचा आता योग आला होता. आम्ही मनातून आनंदी झालो.
पायांचा वेग आपोआपच वाढत होता. चालत चालत समुद्राच्या काठावर येऊन पोहोचलो .अजून पुरेसा उजेड पसरलेला नव्हता. त्यात हळूहळू सूर्याची लालसर सोनेरी कड दिसू लागली. सूर्यनारायण हळूहळू झोपेतून उठून बसावे तसा डोकावून वर येत आहे असे वाटत होते. सूर्य पुरेसा वर आल्यानंतर आम्हाला मानवाच्या आणि इतर सर्व सजीवांच्या तुच्छतेची जाणीव झाली. इतका प्रचंड विशाल जलसागर बघून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या सोनेरी क्षणाची मी इतक्या आतुरतेने वाट बघत होतो, तो क्षण माझ्या आयुष्यात मी अनुभवत होतो. काही क्षणापुरता या संपूर्ण जगामध्ये फक्त मी आणि माझ्या स्वप्नातील हा समुद्रकिनारा एवढेच शिल्लक होतो.
एवढा विशाल समुद्रकिनारा बघून मन अगदी भरून गेले होते. विचारांच्या या अवस्थेत असतानाच हळूच माझ्या पायाला कुणीतरी गुदगुल्या करत असल्याचा मला भास झाला. खाली वाकून बघितले तर एक छोटीशी लाट माझे पाय धुऊन पुन्हा माघारी जात होती. जनु या विशाल दर्या राजाने माझे पद प्रक्षालन करून स्वागतच केले होते. इतका विशाल असूनही कसलाही गर्व न करणारा समुद्र मला खरोखरच जिवाभावाच्या मित्रासारखा वाटत होता. मी स्तब्ध उभा होतो तशी अजून एक लाट आली आणि माझ्या पायाखालची वाळू हळूहळू सरकू लागली .मी प्रथमच हा अनुभव घेत होतो.
माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण
इतक्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याकडे बघून मन अचंबित झाले होते. विचारांमध्ये समुद्र किनारा कसा असेल ? याचे अनेक वेळा चित्र रंगवले होते. आज प्रत्यक्ष समुद्रकिनारा बघून मन भारावून गेले. समुद्र किनाऱ्यावरून गुडघ्या इतक्या पाण्यात धावत सुटलो. अगदी बेभान होऊन ,सगळे जग विसरून. अनेक जन्मांची भेटीची इच्छा आज जणू पूर्ण झाली होती.
सूर्य रंगांची उधळण करत आता वर आला होता. समुद्राच्या पाण्यामध्ये त्याचे प्रतिबिंब पडत होते. किनाऱ्यावरून हे मनोहारी दृश्य मी डोळ्यांमध्ये साठवून घेत होतो. समुद्रकिनाऱ्यावर आम्ही भरपूर खेळलो. समुद्राच्या वाळुत किल्ले बनवले. विविध आकार बनवले.
वाळूमध्ये बोटाने विविध प्रकारच्या नक्षी बनवल्या.
सर्वांनी समुद्रकिनाऱ्यावर बनवलेल्या नक्षी बघत असतानाच मध्ये लाट येत असे आणि सर्व धूवुन जात असे. हा आमच्यासाठी संदेशच होता की, आपल्या मनावर असे कोणतेच विचार जमु न देता नित्य नूतन रहावे. आयुष्याच्या प्रत्येक सकाळी इतरांविषयी चे सर्व मळभ धुऊन टाकावे. समुद्रकिनाऱ्याच्या काठावर असलेले अनेक शंख-शिंपले गोळा करत आम्ही आठवणी साठवू लागलो. समुद्रकिनाऱ्याच्या आठवणीचे अनेक तरंग मनात घेऊन गणपती राया चे दर्शन घेतले. गणपती बाप्पाला मनोमन नमन करून आम्ही पुन्हा गाडीच्या दिशेने निघालो. सर्वांनी कपडे बदलून गाडीत आपापली जागा सांभाळली आणि सहलीच्या व जीवनाच्या पुढच्या प्रवासाकडे समुद्राने दिलेले आनंदाचे क्षण घेऊन निघालो. आम्ही पाहिलेला समुद्र किनारा जीवनाच्या अंतिम टोकाच्या प्रवासापर्यंत आमच्या स्मरणात राहील.
......
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट मुळे मला अजून निबंध लिहिण्याची प्रेरणा मिळते. खूप खूप धन्यवाद.
- अति तिथे माती
- विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
- माझे आवडते शिक्षक my favourite teacher Marathi essay
- फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
- भग्न देवालयाचे मनोगत Bhagn devalayache manogat
- जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी पालकांच्या समर्थनावर निबंध ,Essay on the support of parents in overcoming hardships of life
- मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
- मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
- माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
- मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.