Mi pahilele swapna Marathi nibandh.
मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध.
दिवसभर मनामध्ये आपण जे विचार घोकत असतो, तेच रात्री स्वप्न होऊन आपल्याला दिसत असते. स्वप्नात काय घडेल काहीही सांगता येत नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनामध्ये अशक्य वाटतात, त्या गोष्टी स्वप्नांमध्ये अगदी चुटकीसरशी शक्य होणार्या वाटतात. मला नेहमीच स्वप्न पडत असतात. त्यातीलच मी पाहिलेले स्वप्न तुम्हाला या निबंधातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
हे अगदी मला पडलेले खरे स्वप्न आहे.
चला तर मग बघुया एक छानसा निबंध, मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध.|मला पडलेले स्वप्न
..............................................
Mi pahilele swapna Marathi nibandh.
मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध.
सकाळी उठलो तेव्हा माझे दात खूप दुखत होते. वेदना असह्य होत होत्या. वाटत होते की शरीरामध्ये कोणताही अवयव दुखत असला तरी चालेल परंतु दाताचे दुखणे नको. सकाळी उठलो त्या वेळेपासून दात इतका ठणकत होता की मला कोणतीही गोष्ट चांगली वाटत नव्हती.
दात खूप दुखत असल्यामुळे आज शाळेला सुट्टी मिळाली होती. या सुट्टीचा आनंद मात्र अजिबात घेता येत नव्हता. डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर काही वेळ थोडासा आराम वाटला, परंतु संध्याकाळी पुन्हा त्रास सुरू झाला. तो त्रास होत असतानाच कशी झोप लागली ते कळलेच नाही.
सकाळी उठलो त्यावेळी मात्र थोडासा त्रास कमी झाला होता. चूळ भरून झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेले औषध ब्रशवर लावून दात घासण्यासाठी आरशासमोर उभा राहिलो. दात कसे पांढरेशुभ्र दिसत होते.
हळुवार दातांवर ब्रश फिरवायला सुरुवात केली होतीच. तितक्यात ज्या दातावर मी ब्रश टेकवला होता तो दात सरळ तोंडात पडला. पुढचे तीन दात पडले होते आणि मोकळ्या जागेतून ब्रश आरामात आत शिरला. माझी तर पायाखालची जमीनच सरकली असे झाले.
मी जोरात ओरडलो. माझा आवाज ऐकून आई पळत आली. मी आईला माझे पडलेले दात दाखवण्यासाठी हातात घेतले, तर अजून तीन चार दात हातात आले. आता तर मात्र मी जोर जोरात रडायला लागलो. काय आश्चर्य मी रडत असताना माझ्या तोंडातून अजून दात पडत होते.
माझे सर्व दात हळूहळू पडत होते आणि मी काहीच करू शकत नव्हतो. माझ्या गालामध्ये खोल खड्डे पडले. अगदी म्हाताऱ्या माणसांसारखे. आता तर कहरच झाला होता. मी खाली गदागदा लोळून हात पाय झटकून रडू लागलो.
इतक्यात खाडकन कसलातरी आवाज झाला आणि माझे डोळे उघडले. बघतो तर काय पलंगावरून खाली पडलो होतो. डोकं जमिनीवर आपटून बरंच मोठं टेंगूळ आलं होतं. तसाच पटकन उठलो आणि आरशासमोर जाऊन सर्व दात जागेवर आहेत की नाही याची खात्री करून घेतली.
आरशात बघून सर्व दात सुरळीत आहेत. याची खात्री झाल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला आणि माझ्या ओठांवर एक स्मितहास्य आले. या सर्व धावपळीत घरातील सगळे लोक माझ्याकडे बघत आहेत. याकडे माझे लक्षच नव्हते. सर्वांच्या नजरेवरून ते मला काय झाले आहे असेच विचारत होते? हे मला स्पष्ट जाणवले.
मी मात्र ब्रश घेतला आणि आरशासमोर दात घासण्यासाठी उभा राहिलो परंतु ब्रश दातांना लावताना स्वप्न डोळ्यासमोर दिसत होते.
- स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी माहिती वाचा .
- राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .
हे वाचायला विसरू नका.
- मी मासा बोलतोय
- मी शेतकरी बोलतोय
- झाडे आपले मित्र
- पैंजण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- उपकार कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे निबंध वाचायला विसरू नका
- आजची स्त्री मराठी निबंध
- Which topics of essays can come in board exam 2020
- शालेय जीवनात खेळाचे महत्व
- या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi
- माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
- माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
- बालपण /रम्य ते बालपण
- माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay
- माझी आई - माझा छोटासा निबंध
- संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
- बैल
- नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
- माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.