1001marathiessay.blogspot.com


Importance of time Marathi essay.

       वेळेचे महत्व सर्वांना  आहे .तरी देखील वेळेकडे अगदी सहज दुर्लक्ष केले जाते . आपल्याला जन्मताच फुकट मिळालेले देणगी म्हणजे वेळ होय. हिचा आपण अगदी विचारपूर्वक वापर केला पाहिजे.
       वेळेचा उपयोग कशा पद्धतीने करायला हवा आणि त्याचे किती महत्त्व आहे हे आपण आता वेळेचे महत्व या छानशा निबंधांमध्ये बघूया. यालाच आपण वेळेचा सदुपयोग असेही म्हणू शकतो.

..............................

वेळेचे महत्व मराठी निबंध


          फुकट मिळालेल्या वस्तूची कोणालाच किंमत नसते असे म्हणतात , ते उगाचच नाही.फुकट मिळालेली वस्तू मिळवण्यासाठी कष्ट करावे लागलेले नसतात , त्यामुळे तिला कमीच महत्त्व दिले जाते आणि ही गोष्ट आपोआपच घडते. फुकट मिळालेल्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची आणि सतत कमी कमी होत जाणारी बाब म्हणजे वेळ होय.
        मानवाला त्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत मिळालेल्या वेळेचे तो कशा पद्धतीने नियोजन आणि वापर करतो यावरच त्याच्या संपूर्ण आयुष्याचे यश अवलंबून असते. वेळ जरी माणसाला फुकट मिळालेले  रत्न असले त्याचे महत्त्व अजिबात कमी होत नाही.
       वेळेचे नियोजन करण्यामध्ये जीवनाच्या यशाचे रहस्य दडलेले आहे. असे म्हणतात की मिळालेल्या वेळेचे योग्य नियोजन करून वेळेवर स्वार व्हा. नाहीतर वेळच तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईल . जगण्याच्या शर्यतीमध्ये तुम्ही बाहेर फेकले जाल. महाकाय अशा डायनासोर शक्तिशाली प्राण्याचे काय झाले? ते अनेक वर्ष या पृथ्वीवर राज्य करत होते. परंतु वेळेचे नियोजन न जमल्यामुळे त्यांनी स्वतः मध्ये बदल घडवले नाही आणि आता त्यांचे अस्तित्वच संपून गेले आहे.
      डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत तेच सांगतो की वेळेनुसार जे स्वतःमध्ये आवश्यक तो बदल घडवत नाही ते काळाच्या पडद्याआड जातात किंवा नष्ट होऊन जातात. यावरून असे दिसून येते की मानवाच्या अस्तित्वाचे मुळेच वेळेचे योग्य नियोजन आहे. त्यामुळे मला सारखे सांगावेसे वाटते कि ,जगायचे असेल तर वेळेचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
         धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य सर्व गोष्टींचे नियोजन करताना दिसून येतो परंतु परत कधीही न मिळणाऱ्या वेळेचे नियोजन करण्यात मात्र मनुष्य दिरंगाई करतो. पैशाने सर्व प्रकारचे सुख होई समाधान तुम्ही विकत घेऊ शकता परंतु कितीही पैसे खर्च केले तरी तुम्हाला एक क्षण देखील विकत घेता येऊ शकत नाही.
       संपूर्ण जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला देखील आपल्या अंतिम क्षणांमध्ये संपूर्ण राज्य दान देऊन सुद्धा एक क्षणही विकत घेता आला नाही.
         संपूर्ण जग हे वेळेचे गुलाम आहे. प्रत्येक व्यक्ती घड्याळाच्या काट्यावर धावत आहे. वेगवेगळ्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोक यांना रेल्वे बस यादी वाहतूक साधनांमध्ये प्रवास करताना काही क्षण जरी उशीर झाला तरी देखील त्यांचे दिवसभराचे नियोजन कोलमडून पडते.
       विविध स्पर्धांमध्ये भाग घेणारे स्पर्धक अवघ्या काही क्षणांनी स्पर्धेतील पहिले बक्षीस गमावतात त्यावेळी आपल्याला वेळेचे महत्त्व समजते आणि ज्यावेळी बाळाला जन्म देते त्यावेळी डॉक्टरांना यायला थोडा जरी उशीर झाला तरीदेखील आपल्याला पळता भुई थोडी होते . परीक्षेमध्ये पेपर लिहिताना आपली नजर सारखी घड्याळ्याच्या सुई कडे वळत असते. प्रिय आणि जिवाभावाच्या व्यक्तींना नेचे वेळ सरता सरत नाही त्यावेळचा थोडावेळ देखील खूप मोठ्या कालावधी सारखा वाटतो.
      राजकीय डाव असू द्या किंवा खेळातील डाव असू द्या नाहीतर आयुष्याचे गणित असू द्या. प्रत्येक ठिकाणी योग्य वेळेवर योग्य निर्णय घेणारा जग जिंकून घेतो. आपल्या प्रियजनांचे हृदय जिंकून घेतो. यावरूनच वेळेचे असामान्यत्व लक्षात येते. शेवटी शेवटी मला असे म्हणावेसे वाटते की ज्याला वेळ सांभाळता आली त्याला सर्व जग सांभाळता येते आणि जग त्याच्या कर्तुत्वाला सलाम देखील करते.
        वेळेचा अगदी काटेकोरपणे पालन करणारे लोक जसे की अमिताभ बच्चन, श्री रतन टाटा, एलोन मस्क , धीरूभाई अंबानी ही माणसे यशाच्या अतिउच्च शिखरापर्यंत पोहोचलेत.  आपणही आज असा पक्का निर्धार करूया की, काटेकोरपणे वेळ पाळूया काळाची पावले ओळखू आणि सामाजिक ,आर्थिक ,अध्यात्मिक, भौतिक क्षेत्रातील अतिउच्च शिखरे पादाक्रांत करूया.




  1. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  2. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  3. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  4. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  5. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  6. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  7. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  8. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  9. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  10. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  11. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  12. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  13. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  14. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.


    

.........

         प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे नक्की सांगा या निबंधामध्ये जैविक वेळेनंतर अजून माहिती वाढवले जाईल. हा निबंध किंवा यातील काही भाग इयत्ता 1,2,3,4,5,6,7,8,9,10 साठी उपयोगात येऊ शकतो या निबंधातील तुम्हाला हवा तो भाग विविध स्पर्धांमध्ये तुम्ही वापरू शकता तसेच हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि या निबंधात काही सुधारणा आवश्यक असतील तर ते देखील सुचवा तुमच्या सूचनांचे आम्ही स्वागतच करू.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने