माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग.

       नमस्कार मित्रांनो आज आपण जो निबंध बघणार आहोत  त्याला माझ्या आयुष्यातील मीी अनुभवलेला एक प्रसंग असेेे देखील म्हणता येईल .त्याचे नाव आहे नवरात्री.. चला तर पाहूया.



प्रसंग लेखन
 कुमार. आदेश संदीप साळवे. 
ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले
 माध्यमिक शाळा 
तहाराबाद 
तालुका- सटाणा
 जिल्हा - नाशिक

         आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे नवरात्री. नवरात्री हा शब्द ऐकताच आपल्या सर्वांचा उत्साह जागा होतो. काय त्या टिपऱ्या! काय तो आनंद ! त्याची मजाच वेगळी .(तुमच्यापैकी कोणाकोणाला नवरात्री हा उत्सव आवडतो त्यांनी कमेंट मध्ये कळवा) नवरात्री बाबतची ही माझ्या जीवनातील कथा.


          दिनांक १-७-२००७ वार सोमवार रोजी मी व आमच्या मित्र मंडळातील मुख्य सदस्य आम्ही तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला घ्यायला निघालो व भवानी मातेचा जय घोष केला. प्रवास ऐंशी किलोमीटर चा होता. आम्ही  48 किलोमीटर पर्यंत पोहोचलो. आम्हाला एक घाट लागला. आम्ही घाटाच्या मध्यावर पोहोचलो . तेथे ट्राफिक जाम झाले. अर्धा तास झाला. ट्राफिक पुढे सरकत नव्हते. तेवढ्यात मुसळधार पाऊस झाला. ट्राफिक पुढे सरकू लागले. तेवढ्यात त्या डोंगरावरून दगड कोसळू लागले .  त्या वेळेला आमची गाडी बंद पडली. आमच्या गाडीच्या दिशेने एक मोठा दगड येऊ लागला. तो दगड दोन तीन फुटावर असताना  भवानी मातेच्या कृपेने आमची गाडी चालू झाली आम्ही वाचलो. व देवीला घेऊन परत आलो व देवीची स्थापना केली.
        लोकांची अशी बऱ्याच वेळा चर्चा चालू असते की , देव आहे की नाही ? तुझ्या प्रश्नांवर विविध लोकांचे विविध उत्तरे मिळतात. कोणी होकारार्थी उत्तर देतात. तर कोणी अगदी नकारार्थी उत्तरे देतात. परंतु त्यावेळी आम्हाला सगळ्यांना आलेला अनुभव आमची देवावर असलेली श्रद्धा अजूनच दृढ करून गेला. नकारार्थी उत्तर देणाऱ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीतरी असाच चमत्कारिक अनुभव येईलच आणि मग त्यांना यातील सत्यता पटेल. चमत्कारालाच लोक नमस्कार करतात .असे उगीच म्हटले जात नाही.

      असा होता आमचा नवरात्रीचा पहिला दिवस .
       निबंध / प्रसंग लेखन आवडल्यास लाईक व कमेंट करा.

      प्रिय मित्रांनो तुम्हाला देखील आदेश सारखे आमच्या या साइटवर तुमचा एखादा अनुभव इतर हजारो लोकांना सांगायचा असेल तर ,, आम्हाला संपर्क करा. Contact us या TAB वर जाऊन आमच्याशी संपर्क साधा. 


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने