नमस्कार मित्रांनो आज आपण जो निबंध बघणार आहोत त्याचे नाव आहे आपला महान देश चला तर पाहूया.
निबंध लेखन
आदेश संदीप साळवे.
इयत्ता सहावी,
ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालय
तहाराबाद .
तालुका सटाणा
जिल्हा नाशिक
मी माझे भाग्य समजतो की, अशा महान देशात माझा जन्म झाला. आपल्या महान देशात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. जसे की महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले , सरदार भगतसिंग इत्यादी क्रांतिकारक आपल्या महान देशात होऊन गेले .
त्या क्रांतिकारकांमुळे आज आपला देश स्वातंत्र्य आहे .आपल्या महान भारत देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले . 1947 सालापासून तर 2021 पर्यंत आपल्या देशाची प्रगती खूप झाली आहे .ते फक्त विज्ञानातच नव्हे तर लोकसंख्येमध्ये आपला भारत देश लोकसंख्येबाबत दोन नंबर ला आहे व चीन एक नंबर ला आहे .
आपल्या देशाचे प्रधानमंत्री कोण आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल ,आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सर.आपल्या देशात शेती मोठ्या प्रमाणात होते म्हणून आपल्या देशाला शेतीप्रधान देश असेही म्हणता. आपल्या देशात झाडांचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे म्हणून मोदी सर सतत सांगत असतात की झाडे लावा झाडे जगवा व आपण ते केले पाहिजे .
मी व माझ्या काही मित्रांनी शाळेच्या मागे जराशी शेती केली आहे. आम्ही आत्ता कांदे लावले आहेत. त्यातून जे पैसे येतात ते आम्ही गरीबांमध्ये वाटतो. किंवा शाळेत जे गरीब मुलं असतात त्यांना देतो.
आपल्या देशात सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणजे क्रिकेट .त्या खेळामध्ये एकूण 11 खेळाडू असतात. व या खेळाचे 3 प्रकार पडतात t20 , टेस्ट व ओडीआय असे तीन प्रकार पडतात.
पण आता हे सर्व बंद पडले आहे कारण आता कोरोनाव्हायरस पसरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या देशाला आर्थिक , शैक्षणिक नुकसान झाले आहे. खासकरून इयत्ता दहावी अकरावी व बारावी यांचे जास्त नुकसान झाले आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी आपण घरीच थांबले पाहिजे .वारंवार हात धुतले पाहिजे . मास्कचा वापर केला पाहिजे.
धन्यवाद
- विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
- इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
- माझे आवडते शिक्षक my favourite teacher Marathi essay
- फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
- भग्न देवालयाचे मनोगत Bhagn devalayache manogat
- जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी पालकांच्या समर्थनावर निबंध ,Essay on the support of parents in overcoming hardships of life
- मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
- नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
- माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
- क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
- थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
- अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.