upkarmarathi.com


प्रेरणादायी विचार



  1. नेहमी समोर दिसणारे सत्य असेल असे नाही बर्‍याचदा सत्य जाणून घ्यावे लागते.
  2. विश्वास आणि भ्रम यात खूपच पुसटसा फरक आहे.
  3. जेव्हा  ज्ञान दाखवण्यासाठी शब्द अपुरे पडू लागतात तेव्हा उदाहरण देणे अनिवार्य होऊन जाते .उदाहरणाने बऱ्याचदा शब्दांनी व्यक्त न होणाऱ्या गोष्टीही व्यक्त होऊन जातात.
  4. आपल्या ज्ञानाचा गर्व असणं हेच अज्ञानाचं सर्वप्रथम लक्षण आहे. बऱ्याच ज्ञानी लोकांना आपले अज्ञान समजत नाही .
  5. काठोकाठ भरलेल्या भांड्यात अजून नवीन पदार्थ सामावू शकत नाही. त्याप्रमाणेच ज्ञानाच्या गर्वाने भरलेल्या माणसाला नवीन ज्ञान मिळवता येत नाही. आधी रिकामे व्हा मगच काहीतरी आत भरता येईल.
  6. आधी स्वतःला गाडून घ्यावे लागते मगच सर्व ताकदीनिशी उधळून देता येतं.
  7. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठी ताकद सामावलेली असते फक्त आपल्याला ती ओळखावी लागते.
  8. विशाल वटवृक्ष बघून आपले डोळे विस्फारित व मन अचंबित होतात परंतु त्या वटवृक्षाचे बीज  अगदी सूक्ष्म असते, अगदी याच पद्धतीने एखाद्या मोठ्या संकटाचे बीज अगदी छोट्या गोष्टींमध्ये ही असू शकते. त्यामुळेच कोणतेही काम करतांना छोट्या-छोट्या गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.
  9. ज्या वेळी एखादे बीज जमिनीत पडते त्यावेळी त्याचे तोंड कोणत्याही दिशेला असले तरी त्याचा कोंब जमिनीच्या वरच्या दिशेने वाढतो. तसेच जिद्दीने पेटलेल्या माणसाला संकटांच्या कितीही ओझ्याखाली दाबण्याचा प्रयत्न केला तरीदेखील तो त्यातून मार्ग काढून वर येतो.
  10. फक्त प्रेरणादायी वाक्य वाचून प्रेरणा मिळत नाही. ठरवलेले काम जेव्हा आपल्या आवडी आणि छंद याला अनुसरून असेल तर बाह्य प्रेरणेची गरज लागत नाही.
  11. मन दिसत नाही तरीही त्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे.
  12. मनुष्य जन्माला येताना आंधळा, पांगळा कसाही असला तरीदेखील तो शुद्धच जन्माला येतो.
  13. संपन्नता आणि सूफळता यामध्ये फरक आहे. संपन्न व्यक्ती सुफळ असेल असे नाही. रावणाचा संसार संपन्न होता तर संतांचा संसार सुफळ होता.
  14. आपल्याशी सरळ संपर्क असणारे, संबंध असणारे आणि आपल्याला परिचित नसणारे या सर्वांचा देखील एकत्रितपणे आपल्या यश आणि अपयश यामध्ये हातभार असतो . त्यामुळे आपला दैनंदिन कार्यभार साधताना जी माणसे तुमच्या संपर्कात येतात, तुम्हाला भेटतात त्यांच्याशी सतत प्रेमाने आणि मैत्रीपूर्ण भावनेने वागावे.

    1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
    2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



    हे वाचायला विसरू नका.

    1. आजची स्त्री मराठी निबंध
    2. Which topics of essays can come in board exam 2020
    3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
    4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
    5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
    6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
    7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
    8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
    9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
    10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
    11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
    12. बालपण /रम्य ते बालपण
    13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
    14. माझी आई - माझा छोटासा निबंध
    15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
    16. बैल 
    17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
    18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने