1001marathiessay.blogspot.com

      माझा लहान भाऊ मराठी निबंध




     कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींमध्ये आपापसात प्रेमाचे नाते असते. कुटुंबांमध्ये माणसाची प्रेमाची गरज  भागवली जाते. आई-वडील भाऊ-बहीण आजी आजोबा असे  नाते एका छत्राखाली आनंदाने आणि प्रेमाने राहत असतात.
      आज आपण माझा भाऊ या निबंधामध्ये आपला भाऊ आपल्याशी कसा वागतो त्याचे संबंध आणि आपले कसे असतात त्याविषयी थोडक्यात माहिती या निबंधामध्ये आपण बघूया.
  या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
१) माझा भाऊ
२) माझा प्रिय भाऊ मराठी निबंध.
३) माझा लहान भाऊ

      माझा लहान भाऊ मराठी निबंध

       तसे आमच्या घरातील सर्व सदस्यांनी मध्ये अगदी प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते आहे. माझ्या भावाचे आणि माझे नाते मात्र फारच सुंदर आहे.माझा भाऊ माझ्या पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तो इयत्ता सहावी मध्ये शिकतो आणि मी इयत्ता नववी मध्ये शिकतो.
        माझ्या धाकट्या भावाचे नाव उल्हास आहे. उल्हास अगदी त्याच्या नावा सारखाच आहे. सतत उल्हासित आणि हसरा असतो तो.
     उल्हास चा स्वभाव अगदीच चंचल आहे.  तो सतत हसरा तर असतोच परंतु खूप नाटकी देखील आहे. वारंवार कोणतेही नाटक करणे हा त्याचा स्थायी स्वभावच आहे. कुणाचीही नक्कल करणे त्याला फार छान जमते आमच्या घरातील सर्व सदस्यांची तो उत्तम प्रकारे नक्कल करतो आणि आम्हाला खूप हसवतो त्याचा हा विनोदी स्वभाव नेहमीच सर्वांच्या लक्षात राहतो आमच्या घरी येणारे पाहुणे देखील उल्हास च्या या स्वभावाचे कौतुक करतात आणि त्याच्या कलेचे ही कौतुक करतात.
        उल्हास ला मोबाईलचे फार वेड आहे . त्याच्याकडून कोणतेही काम करून घ्यायचे असले तर त्याला फक्त मोबाईलचे आमिष दाखवावे लागते . मग तो तुमच्यासाठी आकाशातून चंद्र घेऊन येण्यासाठी देखील तयार होऊन जातो. मोबाईल वर विविध प्रकारचे गेम्स खेळणे हा त्यांचा आवडता छंद आहे. घरात जर कोणाचा मोबाईल दिसत नसेल आणि उल्हास देखील दिसत नसेल तर अगदी कोणतीही शंका मनात न घेता फोन उल्हास कडेच  असणार हे सर्वांना समजून जाते. तो मोबाईल सायलेंटवर करून ठेवतो आणि घरात कुठल्या कोपऱ्यात जाऊन गेम खेळत बसतो. एखाद्या गेम मध्ये चांगलं स्कोर झाला की मग उड्या मारत सर्वांना दाखवत सुटतो. हे..... मी आज इतका स्कोर केला, हाय स्कोर केला. त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो संपूर्ण घरभर नाचत सुटतो.
       मोबाईल बरोबरच उल्हास काचेच्या गोट्या खेळण्यात खूपच मग्न होऊन जातो. त्याचा नेम अगदी जबरदस्त आहे. त्यामुळे खेळताना सर्वच मुले त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उतावीळ असतात. याला दुसरे कारण असे आहे की त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आहे .त्यामुळे त्याला खूपच मित्र आहेत. माझ्यापेक्षा हि त्याच्या मित्रांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे त्याला फक्त त्याच्याच वर्गातली मित्र आहेत असे नाही. त्याला दुसऱ्या शाळेतील ही मित्र आहेत दुसऱ्या गल्लीमध्येही मित्र आहेत. त्याची खेळाडू वृत्ती ही खुपच छान आहे खेळतांना तो अगदी मनापासून खेळतो हार जीत मनापासून पचवतो. अर्थात कधीकधी खेळताना सगळ्यांची नजर चुकवून खोटेपणा देखील करताना मी त्याला बघितलेले आहे.
       जेवणाचा अगदी मनापासून आनंद घेणारा आमच्या घरातील उत्तम खवय्या उल्हासच आहे. त्याला सर्वच खाद्यपदार्थ खूप आवडतात.खाताना तो म्हणतो मी अन्नपूर्णा मातेचा भक्त आहे. त्यामुळे मी अन्नाचा मनसोक्त आनंद घेतो. तो सतत आईला नवनवीन पदार्थ बनवायला सांगतो. पदार्थ करत असताना ते कधीही पूर्ण होतात आणि मी कधी खायला बसतो असेच त्याला होऊन जाते. खात असतानाच तो पुढच्या वेळी कोणता पदार्थ बनवायचा याचे नियोजन करत असतो. खाऊन झाल्यावर आईला पुढच्या वेळी कोणता पदार्थ बनवायचा त्याचे नाव तो आत्ताच सांगून ठेवतो. हे सर्व सांगताना मात्र तो आईला मस्का लावायचे विसरत नाही. आई तुझ्या हाताला किती चव आहे इतकं सुंदर जेवण तर जगात कोणीच बनवत नसेल असे कौतुक करायला देखील तो मागेपुढे बघत नाही.जाता जाता मात्र आई मी तुला खोटं सांगत होतो अशी कोपरखळी मारायला देखील तो विसरत नाही. त्याच्या या नाटकी आणि खोडकर स्वभावाची आम्हाला खूपच सवय झालेली आहे.
         तो बाहेर फिरायला फार कमी जातो शक्यतो आई-वडिलांबरोबर राहणे त्याला खूप आवडते. आमचे छोटेसे दुकान आहे त्यामध्ये विविध प्रकारची खेळणी देखील आहेत त्यामुळे ज्यावेळी दुकानात नवीन माल आणला जातो, त्यावेळी एखादे खेळणे जर त्याला आवडले तर त्या खेळण्यासाठी तो खूप अटक करतो परंतु त्याला नीट समजून सांगितले की लगेच ऐकूनही घेतो.
        त्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आनंद मिळून जातो. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी तो सतत तयार असतो.आम्ही कुठे गावाला जातो त्यावेळी तिथे असलेल्या लहान भावंडांना तो अगदी प्रेमाने खेळवतो. लहान भावंडे त्याच्याजवळ असली म्हणजे घरातील सर्व माणसे अगदी बिनधास्तपणे त्यांची कामे करण्यासाठी मोकळे असतात इतका त्या सर्वांना उल्हास वर विश्वास आहे.
        असा माझा हा धाकटा भाऊ अभ्यासात देखील हुशार आहे. त्याचा सगळ्यात आवडीचा विषय आहे गणित आणि नावडता विषय आहे विज्ञान.तसा विज्ञान विषयाचा अभ्यास तो पूर्ण करतो परंतु गणितात जितका मन लावून तो अभ्यास करतो तितका मन लावून विज्ञानाचा अभ्यास करताना तो मला दिसत नाही.
        आम्ही दोघे भावंड एकमेकांशी खूप प्रेमाने वागतो .एकमेकांची काळजी घेतो असा माझा हा लहान भाऊ मला खूप आवडतो.

     
       ============ ============
          प्रिय वाचक मित्रांनो हा निबंध काहीजणांना मोठा वाटत असेल. Class 4,5,6,7,8,9,10 च्या विद्यार्थ्यांसाठी हा निबंध उपयोगी ठरू शकतो. प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार या निबंधातील आवश्यक तो भाग स्वतःसाठी वापरावा.

      तसेच तुम्हाला निबंध कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अजून त्यात काही सुधारणा असतील तर त्यादेखील सुचवा आणि तुम्हाला तुमच्या भावा विषयी काय वाटते हे देखील तुम्ही मला सांगू शकता. मला ही ते वाचायला किंवा ऐकायला नक्की आवडेल.
============ ===========
आपल्या या ब्लॉगवर विविध प्रकारचे असंख्य निबंध आहेत. विविध विषयांवरील निबंध बघण्यासाठी तुम्हाला जो निबंध हवा असेल तो सर्च बारमध्ये जाऊन सर्च करा.

  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay

          


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने