1001marathiessay.blogspot.com

Essay in 100 words use of mobile is good or bad


Autobiography of old mobile in Marathi
mobile shap ki vardan essay in marathi

     

मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध.

Mobile shap ki vardan Marathi nibandh


         mobile shap ki vardan ,तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन पूर्णतः बदलून गेलेले आहे. तंत्रज्ञानातील प्रगती मुळे माणसाच्या जीवनाला गती मिळालेली आहे. यातील महत्त्वाचा शोध म्हणजे मोबाईलचा अर्थातच भ्रमणध्वनीचा शोध. भ्रमणध्वनी (mobile) मुळे मानवी जीवनाचे आयाम बदलून गेलेले आहेत. मोबाईलची उपयुक्तता तर आहेच परंतु त्याचा होत असलेला अतिरेक माणसाला मोबाईल शाप की वरदान असा विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. मोबाईल विषयी छान पैकी माहिती देणारा एक सुंदर निबंध आपण बघूया मोबाइल शाप की वरदान.mobile Che manogat| Autobiography of old mobile in Marathi



|मोबाइल शाप की वरदान|
|mobile curse or blessing essay in Marathi


मोबाईलचा शोध (mobile invention)

      प्रत्येक शतकामध्ये असा कोणता तरी एक महान शोध लागतो, जो संपूर्ण मानव जातीच्या जगण्याची दिशा बदलून टाकतो. असे काही महत्त्वाचे शोध सांगायचे झाले तर चाकाचा शोध, अग्नीचा शोध, विजेचा शोध. भविष्यात मानवी जीवन प्रगतीचा जो अतिउच्च टप्पा गाठेल त्याचे एक प्रतीक म्हणजे मोबाईल होय.

     सध्याच्या काळामध्ये मोबाईल म्हणजे एक मूलभूत गरज बनलेला आहे.   मोबाईल ने संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकलेले आहे . दिवसभरातील खूप वेळ आपल्या हातात मोबाईल असतो . त्या मोबाईल मध्येच आपण आपला खूप वेळ खर्च करत असतो.

     लहान - लहान मुले देखील मोबाईलसाठी रडत असताना चे अनेक व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात. अशी या मोबाईलची महती आहे.

        पूर्वीच्या काळी जी कामे करण्यासाठी आपल्याला संगणकाचा उपयोग करून घ्यावा लागत आणि त्यात बराचसा वेळही वाया जात असे. ती सगळी कामे आता मोबाईलवर सहजतेने करता येतात.

       मोबाईल वापरण्यासाठी लहान असल्यामुळे खिशात घेऊन कुठेही फिरता येते . कोणी आपल्या बरोबरीला असो अथवा नसो मोबाईल असला तर आपल्याला वेळ घालवण्यासाठी इतर कोणाची गरजही लागत नाही. मोबाईल वर गेम खेळताना मग्न असलेली  मुले आपल्याला चौका-चौकात बघायला मिळतात. ही मुले खेळण्यात इतकी गुंग असतात की त्यांच्या जवळून आपण गेलो तरी देखील त्यांचे आपल्याकडे लक्ष जात नाही. एवढी एकाग्रता मुलांनी अभ्यासात केव्हा जीवनावश्यक कौशल्य शिकण्या मध्ये वापरली तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ही मुले मागे पडणार नाहीत.
      

 
Essay in 100 words use of mobile is good or bad
Essay in 100 words use of mobile is good or bad



 | मोबाईलचे उपयोग(uses of mobile )

        ज्यावेळी चंद्रावर प्रथम भारतीय माणूस पोहोचला त्यावेळी वापरलेल्या तंत्रज्ञानापेक्षा आत्ताचे मोबाईल मधील तंत्रज्ञान सरस आहे. मोबाईल अनेक कामांसाठी उपयोगी ठरतो. मोबाईल ला इंटरनेटची जोड मिळाली म्हणजे मोबाईल हा जादूचा दिवाच ठरतो.

       मोबाईल मध्ये आपण कोणत्याही काळातली गाणे ऐकू शकतो. त्यामुळे रेडिओ कडे लोकांचे दुर्लक्ष झाले. मोबाईलला विजेरी म्हणजेच बॅटरी असल्यामुळे लोक आता टॉर्चचा देखील उपयोग कमी करताना दिसतात. दूरदर्शन वर बघितल्या जाणाऱ्या विविध मालिका मोबाईलवर अगदी सहज कुठेही बघता येतात. एखाद्या दिवसाचा भाग बघायचा राहिला असेल तर मोबाईलवर तो भाग कधीही आपल्या सोयीनुसार हव्या त्या वेळेला बघता येतो. मोबाईल च्या आधारे विविध प्रकारच्या गणितीय क्रिया देखील गदी क्षणार्धात करता येतात त्यामुळे कॅल्क्युलेटर कडे ही बर्‍याच जणांचे दुर्लक्ष झाले. एवढेच काय कानामध्ये हेडफोन लावून मोबाईलवर बोलत करणारे तरुण तरुणी आपल्याला रस्त्यांमध्ये तसेच घरांमध्येही जागोजागी दिसतात.

| Autobiography of old mobile in Marathi

        एकंदरीत काय तर मोबाईल ने रेडिओ, टी.व्ही . ,कॅल्क्युलेटर ,सीडी प्लेयर, व्हिडिओ प्लेयर, या सर्वांची गुणवत्ता स्वतः मध्ये धारण केलेले आहे .त्यामुळे या सर्वांपेक्षा मोबाईल अल्पावधीत मध्येच खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या आवडीचा विषय बनलेला आहे.

      मोबाईल अल्पावधीतच खूप लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे, त्याची उपयोगिता आणि कमी जागेत व सहजरित्या हाताळता येण्याची उपयुक्तता.

       तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये मोबाईल म्हणजे मुकुटमणी आहे. मोबाईल ने माणसाचे जीवन सहज सुलभ व वेगवान बनवलेले आहे. आपल्या जिवाभावाची माणसे आपल्यापासून हजारो किलोमीटर अंतरावर देखील असली तरी देखील त्यांचा आवाज त्यांच्या भावना आपण अगदी सहज जाणून घेऊ शकतो. व्हिडीओ कॉलिंग मुळे तर दूरवरची आपली प्रेमाची माणसे आपल्या समोर बोलूनच आपल्याशी गप्पा मारत आहेत असे वाटते. माणसांमध्ये असलेले भौतिक अंतर मोबाईल मुळे अगदी कमी झालेले आहे.

मोबाईलचे उपयोग 


      माणसामाणसातील बहुतेक अंतर देखील मोबाईल मध्ये कमी झाले आहे ,असे आपण म्हणतो .परंतु आपापसातील भावनिक आणि मानसिक अंतर मात्र मोबाईल मुळे खूपच वाढत गेले आहे. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. 

       अनेक घरांमध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येकाकडे स्वतःचा स्वतंत्र मोबाईल आहे असे चित्र दिसते. प्रत्येक जण स्वतःच्या मोबाईल मध्ये काहीना काही करण्यामध्ये गुंग झालेला दिसतो अगदी एकमेकांजवळ बसलेली घरातील माणसे ही कितीतरी वेळ  एकमेकांशी बोलत नाही. ही एक फार मोठी शोकांतिका आहे हे नाईलाजाने मान्य करावे लागेल.

     अर्थातच मोबाईल हा निर्जीव आहे. त्याचा किती वापर करावा याची मर्यादा ठरवण्याचा अधिकार माणसांना आहे. त्यामुळे मोबाइल शाप की वरदान हा विचार करण्यापेक्षा मोबाइलला आपण वरदान म्हणून वापरावे की तो आपल्याला शाप ठरेल इतक्या अति प्रमाणात त्याचा वापर करावा हे आपण आधी मर्यादित करून घ्यावे.

       मनोरंजनाचे तर सर्वात उत्तम साधन म्हणून मोबाईल ला पहिले मानांकन दिले पाहिजे. मोबाईल मध्ये विविध प्रकारचे गेम्स खेळता येतात.प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड ही वेगवेगळे असते. असे म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती याच आवडीनुसार विविध प्रकारचे खेळ मोबाईल मध्ये उपलब्ध असतात.या खेळामुळे मनोरंजन जरी होत असले तरी देखील वेळेचा फार मोठा अपव्यय देखील या मुळे होतो.

        भारताला तरुणांचा देश असे म्हटले जाते आणि यातीलच असंख्य तरुण खूप सारा वेळ मोबाईलवर गेम्स खेळण्यामध्ये वाया घालतात. काही गेम्स मुळे तर अनेक ठिकाणी युवकांनी जीव गमावल्याचे  ऐकिवात आहे.
मोबाईलवर खेळले जाणारे गेम इतके आकर्षक असतात की, आपण कधी त्यांच्या आहारी जातो हे आपल्याला कळत देखील नाही. मोबाईल वापर करणाऱ्यांवर भानामतीच करतो. इतका मोठा जादुगार आहे तो. इथे पुन्हा एक प्रश्न येतो की साखरे मध्ये गुंडाळून विष दिले तर आपण खाऊ का? तसेच अगदी कितीही चांगले गेम असले तरी देखील आपण त्याच्या आहारी जावे की नाही? हे ठरवण्याचा पूर्ण निर्णय आपल्या हाती आहे. 

         मोबाईल मुळे पैशांचे अनेक व्यवहार करण्यामध्ये सुलभता निर्माण झालेली आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये इतका वेग आणि साधेपणा यापूर्वी कधीही आला नव्हता. घरी बसल्या आपण हजारो रुपयांच्या वस्तू ऑनलाईन खरेदी विक्री द्वारे घरात आणू शकतो.  खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला हव्या त्या ठिकाणी घरबसल्या मिळतात व आवडल्या नाही तर ,आपण त्या लगेच परत देखील करू शकतो.

          घरातून बाहेर पडल्यावर आपण पैसे सोबत घ्यायचे विसरलो परंतु आपल्याजवळ मोबाईल असेल तर आपण लाखो रुपयांचे व्यवहार कोणतीही अडचण न येता करू शकतो. ही सगळी मोबाईलची जादू आहे. मोबाईल म्हणजे खरोखर जादूचा दिवाच आहे.

          मोबाईल वरून आपण चित्रपटासाठी लागणारे तिकीट, प्रवासाचे आसन आरक्षण, विजेची बिल भरणे, घरगुती वापरासाठी लागणारे गॅस बुकिंग करणे, एखाद्या संस्थेला पैसे दान करणे, गरजवंताला पैसे पाठवणे यासारखे कामे क्षणार्धात होऊन जातात.

|मोबाईल रिंगटोन


      मोबाईल मध्ये फार सुंदर आणि ऐकण्यासाठी फारच छान वाटणाऱ्या विविध प्रकारच्या रिंगटोन्स ठेवता येतात. प्रत्येक मोबाईल वापरकर्ता त्याच्या आवडीनुसार आणि त्याच्या स्वभावानुसार रिंगटोन्स ठेवू शकतो. या रिंगटोन्स ऐकताना आपण एखाद्या अडचणीत असलो तरीदेखील मनाला काही क्षणापुरता आनंद होऊन जातो. काहीशी मनस्थिती ही बदलून जाते.

      अलीकडे तर रिंगटोन्स बरोबर कॉलर ट्युन्स वर देखील लोक मनापासून लक्ष देताना दिसतात. आपल्याला संपर्क करणाऱ्या अन्ना आणि पैकी गाणे किंवा संगीत ऐकू जावे यासाठी अशा प्रकारच्या कॉलर ट्यून्स ठेवल्या जातात. यामुळे मुळे आपल्याला संपर्क करणाऱ्या लोकांना आपल्या आवडीनिवडी व काही प्रमाणात आपला स्वभाव देखील कळू शकतो.

        मोबाईल मध्ये आता अशा प्रकारचे ॲप्स देखील आलेले आहेत की ,आपण स्वतः आपल्या आवडीच्या गाण्यापासून रिंगटोन तयार करू शकतो.  ती आपल्या मोबाईलसाठी वापरू शकतो.

      मोबाईल मुळे आपल्या क्रिया शक्तीला व कल्पनाशक्तीला देखील काही प्रमाणात वाव मिळतो.मोबाईल मध्ये काही ॲप्स असे असतात की त्यामुळे आपण विविध प्रकारचे नक्षीकाम काढू शकतो.



  प्रिय मित्रांनो तुम्हाला हा [मोबाइल शाप की वरदान] मराठी निबंध  | mobile shap ki vardan essay in marathi   निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
        हा निबंध इयत्ता पहिली ,दुसरी, तिसरी चौथी, पाचवी ,सहावी ,सातवी ,आठवी साठी उपयोगी पडू शकतो.


  1. विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
  2. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  3. माझे आवडते शिक्षक my favourite teacher Marathi essay
  4. फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
  5. भग्न देवालयाचे मनोगत Bhagn devalayache manogat
  6. जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी पालकांच्या समर्थनावर निबंध ,Essay on the support of parents in overcoming hardships of life
  7. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  8. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  9. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
  10. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  11. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  12. थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
  13. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
  14. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  15. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  16. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  17. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  18. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  19. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  20. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  21. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  22. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  23. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  24. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  25. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  26. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  27. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.



      
       
         
       


     

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने