1001marathiessay.blogspot.com

          नमस्कार आज आपण जो निबंध बघणार आहोत त्याचे नाव आहे, "आमचे शेत " .चला तर पाहूया मग.

|आमचे शेत निबंध मराठी |




    
      "    | आमचे शेत निबंध मराठी  | aamche shet marathi essay "  
        
        शेतांमध्ये शेतकरी फळे पिकवतो . भाज्या पिकवतो व ते आपल्या पर्यंत अनेक माध्यमातून येते. आपल्या या भारत देशात सर्वात जास्त चालणारा व्यवसाय असेल तो म्हणजे शेती .अनेक गरीब लोक या शेतीच्या व्यवसायावर जगतात .
          आमच्या शेतातही कधीकाळी खूप चांगल्या प्रमाणामध्ये शेती केली जात असे. माझे दोन नंबरचे काका संपूर्ण शेती करत असत .माझे वडील मोठे आहेत आणि हे काका माझ्या वडिलांपेक्षा लहान . वडील नोकरीमुळे बाहेरगावी असतात आजी-आजोबा म्हातारे झाले आहेत.
            दोन वर्षांपूर्वी एका अपघातात माझ्या या कष्टकरी काका यांचे निधन झाले. त्या यामुळे आमचे शेत आता पडूनच असते. शेताचे फार दुरावस्था झालेली आहे. ज्या शेतामध्ये छान हिरवेगार पीक आनंदाने डोलत असे त्या आमच्या शेतामध्ये आता रानगवत माजलेले आहे.
          आमच्या शेतात फारच सुंदर आणि आकर्षक होते. शेताच्या चारही बाजूंनी सुंदरशी अनेक फळांची झाडे लावलेली आहेत.आमच्या शेतात आम्ही आंब्याची, पेरूची, अंजिराची व लिंबूची देखील झाडे लावले आहेत. काकांनी मोठ्या प्रेमाने ही झाडे जतन केलेली होती परंतु काका  गेल्यानंतर शेतात जावे असेच वाटत नाही.
         आमच्या शेताच्या बाजूच्या शेतातील माणसे या झाडांना गेल्या दोन वर्षापासून नियमित पाणी घालत आहेत. आमचे शेत आम्हा सर्वांची आतुरतेने वाट पाहत असते. ज्यावेळी मी शेतात जातो त्यावेळी ते शेत आमच्याकडे आशाळभूत नजरेने बघत आहे असेच मला वाटते.
          आता वडिलांची बदली जवळच्या गावातच झालेली आहे त्यामुळे वडिलांनी आणि आजोबांनी पुन्हा आमच्या शेतीचे जुने रूप परत आणण्याचे ठरवले आहे. लवकरच आमचे शेत पुन्हा हिरवा शालू पांघरून तयार होईल. आणि या सजलेल्या शेताकडे माझे काका दुरूनच बघून आनंदी होतील असे मला नक्की वाटते.




      प्रिय मित्रांनो ,तुम्हाला आमचे शेत हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमचे शेत कसे आहे ? तुमच्या शेता विषयी तुमच्या काय भावना आहेत ? तुमच्या शेतातील चांगले पीक, सुविधा याविषयी जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल .तर त्याविषयी देखील लिहायला अजिबात विसरू नका.
         
        









      





        

1 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने