1001marathiessay.blogspot.com

"भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे"

       संत ज्ञानेश्वर महाराज रचित पसायदान यामध्ये या काव्यपंक्ती आहेत. पसायदाना मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी अनंत परमात्म्याकडे सर्व विश्वाचे कल्याण होवो अशा भावनेने मागणे मागितले आहे.सर्व सजीवांच्या अंतःकरणा मध्ये सात्विक भाव व मनोवृत्ती निर्माण व्हावी अशी प्रार्थना करतात.






            संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण विश्वामध्ये माऊली या नावाने ओळखले जातात . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या जवळ असलेले मातृहृदय ,... प्रेमाने भरलेले  हृदय. ज्ञानेश्वर महाराजांचे जी ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये सर्वोच्च स्थान लाभलेले आहे ते "ज्ञानेश्वरीला".
        भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगून  अमृत पाजले.त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की अर्जुना ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म वाढतो त्या वेळी मी स्वतः अवतार घेऊन आधार मी  अधर्मी  लोकांचा नाश करतो. माऊली ज्ञानेश्वर मात्र अधर्मी लोकांचा नाश करण्यापेक्षा व्यक्तीमधील अधर्मी वृत्तीचा नाश करण्यावर भर देतात.
      माऊलींच्या मते ज्यावेळी व्यक्तीची वृत्ती बदलते त्यावेळी व्यक्ती आपोआपच बदलतो आणि त्याच्या हातून घडणाऱ्या कृतीही आपोआप विधायक स्वरूपाच्या घडतात. या उद्देशाने ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात की,
      जे खळांची व्यंकटी सांडो,
       तया सत्कर्मी रती वाढो
       भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे
       यामध्ये ज्ञानेश्वर माऊली सर्व सजीवांना भूत असे संबोधतात. यामध्ये पशूपक्षी वनस्पती सर्वांना समान दृष्टीने ते बघतात. कोणत्याही सजीवा कडून दुर्बुद्धी ने कोणतीही क्रिया होऊ नये. कोणत्याही सजीवाची हत्या करण्यापेक्षा सजीवातील दुर्गुण काढून टाकण्यावर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे माऊली विश्वास दाखवतात.
        सर्व भूतांची म्हणजे प्राणिमात्राची सत्कर्मा करण्यामध्ये  आवड निर्माण व्हावी असे त्यांना वाटते. सर्व सजीवांना एकमेकांविषयी सहृदय तेची भावना वाटावी. आणि त्यातूनच एकमेकांशी प्रेमपूर्वक संबंध प्रस्तावित व्हावे.


  1. वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.


         

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने