1001marathiessay.blogspot.com

मी सायकल बोलते आहे.


   
        प्रिय मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सायकलचे मनोगत मराठी निबंध घेऊन आलेलो आहे. ज्याने सायकल बघितलेली नाही किंवा ज्यांना सायकल माहित नाही असे लोक तुम्हाला क्वचितच भेटतील. या लेखामध्ये आपण सायकल बोलू लागली तर अशी कल्पना करून छानसा कल्पनात्मक
निबंध लिहू .
या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
  1.  |सायकल बोलू लागली तर
  2.  |सायकल चे मनोगत
  3.  |सायकलचे आत्मकथन
  4.  |मी सायकल बोलते आहे
  5.  |सायकल म्हणते, मी आहे ना
   चला, भरपूर चर्चा करून झाली आता आपण प्रत्यक्ष निबंध बघूया..

    सायकलचे मनोगत ,|सायकलचे आत्मकथन|सायकल माहिती
Essay on bicycle in Marathi.

      बाबांनी मला नवीनच सायकल घेऊन दिली होती. दादा ती सायकल दररोज फिरवत असे. सायकल फारच सुंदर होती. दादा सायकल फिरवत असताना मी घराच्या पायऱ्यांवर बसून त्याची गंमत बघत असे. मलाही सायकल फिरवण्याची खूप इच्छा होती परंतु मला सायकल येत नाही. 
     एक दिवस मी शांतपणे सायकली कडे बघत बसलेली होती. तितक्यात मला आवाज आला," अगं फक्त माझ्याकडे बघून तुला सायकल चालवता येणार आहे का? नुसती बसून राहिलीस आणि सायकल चालवण्याचा प्रयत्न केला नाहीस, तर आयुष्यभर तू सायकल चालवू शकणार नाहीस."
       मी गडबडून इकडेतिकडे बघू लागले. पुन्हा आवाज आला ,"अगं घाबरू नकोस मी सायकल बोलते आहे". मी घाबरले परंतु तिथेच बसून राहिले. सायकल पुन्हा माझ्याशी बोलू ना.
     नमस्कार. मी आहे सायकल, मला दोन चाके आहेत .त्यामुळे  लोक मला दुचाकी असेदेखील म्हणतात. माझा जन्म कारखान्यांमध्ये झालेला आहे. माझे वेगळे भाग जोडून , मग माझे या तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या सायकल मध्ये रूपांतर झालेले आहे. सायकलींचा इतिहास तुला जाणून घ्यायचा आहे का? असा प्रश्न मला विचारल्यावर मी सायकलीला म्हटले," हो मला सायकलींचा इतिहास ऐकायला खूप आवडेल."सायकल मला त्यांचा इतिहास सांगू लागली.


        तसं बघितलं तर सायकलींचा जन्म 1690 साली फ्रान्समध्ये झाला. फ्रान्स देशांमधले एम.डी. सीवर्क यांनी सायकलचा शोध लावला. त्यानंतर 1876 साली एच. जे. लॉसन यांनी सायकलला गती मिळण्यासाठी पेडलला साखळी असलेली दंत तबकडी बसवली. यामुळे माझ्या गतीत बराच फरक पडला.1887 साली जॉन बोईड डनलॉप यांनी टायर चा शोध लावला आणि टायर मुळे मला खरा वेग प्राप्त झाला.
      माझा वेग वाढल्यामुळे लोकांनीही मला पसंती दर्शवली. पहिले अनेक वर्ष मी रखडत आणि हळू चालले, परंतु मला टायर ची जोड मिळाल्यानंतर मात्र मी आज पर्यंत थांबलेली नाही. माझा प्रचार आणि प्रसार खूपच वेगाने झाला. मोठ्या प्रमाणात माझा वापर सुरू झाला.सध्या संपूर्ण जगामध्ये माझा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. लहान मुले तर दिवसभर माझी साथ सोडत नाहीत. फक्त लहान मुलीच नाही तर मोठी माणसे देखील मला चालवण्याचा मोह आवरू शकत नाहीत.
       इतर दुचाकी वाहनांच्या तुलनेत माझी किंमत फारच कमी आहे. मुळे त्यामुळे जसे तुम्ही खेळणे घेतात त्यामध्ये हत्ती, घोडा ,गाड्या यांचा समावेश होतो .त्याच पद्धतीने सायकल देखील सहजरित्या लहान मुलांना घेऊन दिली जाते. पालक देखील माझी किंमत कमी असल्यामुळे आपल्या मुलांना सायकल घेऊन देण्यास जास्त विचारात पडत नाही.
       फक्त किंमतच नाही तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पासून अपघात होणे फारच दुर्मिळ. आणि झालाच अपघात तरी देखील जास्त दुखापत होत नाही थोडफार खर्च पडेल खरचटेल किंवा थोडीशी दुखापत होईल. दुखापत लगेच बरी देखील होईल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग आपली मैत्री कायमचीच जुळते.
      एकदा तुम्हाला माझा वापर कसा करायचा हे समजले की मग तुम्ही मला विश्रांती घेऊ देत नाही. आईने किंवा इतरांनी सांगितलेली इतर कामे करताना तुम्हाला अजिबात कंटाळा येत नाही. बाजारातून काही आणायला सांगितले की लगेच माझ्यावर स्वार होता आणि  ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत निघतात मोहिमेवर. सगळी कामे कशी झटपट होतात की नाही?
     तसाच सायकल चालवताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या परवान्याची गरज नाही. तुझ्यासारख्या लहान मुला- मुलीपासून म्हाताऱ्या झालेल्या आजी-आजोबांपर्यंत  कुणीही माझा उपयोग करू शकतो. माझ्यावर फिरण्याचा आनंद घेऊ शकतो. माझे चाक पंक्चर झाले तर वजन कमी असल्यामुळे मला उचलूनही घेऊन जाता येते.
      कार बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मला मान्य आहे परंतु छोट्या छोट्या कामांसाठी इतक्या वेगाची काहीच गरज नाही.जसे तुम्हाला शाळेत जायचे असेल , गावातच एखाद्या दुकानावर जायचे असेल, मित्राकडे भेटायला जायचे असेल तर अशा कामांसाठी कार आणि बाईक घेऊन जाण्याची काहीच गरज नाही. अशा कामांसाठी सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावर चा प्रवास मजेने आणि आनंदाने करा.
       माझ्या वापराने तुम्हाला दोन पद्धतीने फायदा होतो. एक म्हणजे वैयक्तिक आणि दुसरा आहे सामाजिक. सायकलचा वापर केल्यामुळे तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची काहीच आवश्यकता नाही. चांगला दरदरून घाम येईपर्यंत मला चालवल्याने तुमची कार्यक्षमता खूपच वाढेल. माझा जेवढा अधिक उपयोग करणार तितकेच तुमचे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतील. मास पेशी तंदुरुस्त राहतील.  घाम निघाल्यामुळे ज्यादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते.पायांच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि ते बळकट होतात.इतके फायदे आहेत आणि माझी किंमत ही फारच कमी आहे त्यामुळे तुमचे पैसे देखील वाचतात. 
      माझ्या मध्ये काही बिघाड झाला तर मला दुरुस्त करण्यासाठी फारसा खर्चही येत नाही.  मला चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेल सारखे पदार्थही लागत नाही त्यामुळे देखील तुमच्या पैशांची बचत होते.पार्किंग करताना देखिल छोट्या जागेमध्ये मी आरामात उभी राहते. त्यामुळे विशेष जागा शोधण्याचेही कष्ट वाचतात. माझा वापर कितीही केला तरी देखील कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. पेट्रोल-डिझेल सारखे पदार्थ आपण इतर देशांकडून विकत घेतो त्यामुळे आपल्या देशाचे चलन दुसऱ्या देशांमध्ये जाते. हे चलन  वाचवण्यामध्येही माझी महत्त्वाची भूमिका आहे.
        माझे हे फायदे लक्षात घेता जर्मनी जपान चीन यासारख्या देशांमध्ये माझा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. पॅरिस सारख्या प्रसिद्ध आणि मोठ्या शहरात हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात.
      काळ बदलत चाललेला आहे. आधुनिक युगामध्ये माझ्या रूपातही मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. आधी मी बिनगिअरची होती. आता मला गिअर पण आलेले आहेत. विविध प्रकारच्या शर्यतींसाठी माझ्या रचनेमध्ये ही बदल केलेले असतात. काही वेळा माझी चाक जाड असतात तर काही वेळा बारीक असतात. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवी तशी माझी निवड करा आणि चला आता एक छान चक्कर मारून येऊया.  
       आता सायकल बोलून बोलून दमलेली होती आणि मीही सायकलवर स्वार झालेली होती.सायकलीच्या बोलल्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला होता.  आता सायकल चालवणे शिकले शिवाय मला काही शांतता लागणार नाही.  .....
                     .... विजय साळवे.
.......... समाप्त..........

      प्रिय मित्रांनो तुम्हाला निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.

हे निबंध वाचायला ही विसरू नका.


         
      
       
      
         
|

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने