1001marathiessay.blogspot.com
गोधडीचे मनोगत |
| गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध
Autobiography of godhadi in Marathi
मित्रांनो, आपल्या सगळ्यांना हल्लीच्या काळातील चांगल्या रंगीत पांघरुणाची. सवय झालेली आहे. रस्त्याच्या काठाने छान-छान शाली आणि चादरी विकणारे आपल्याला जागोजागी दिसतात. परंतु घरात असणाऱ्या गोधडी च्या उबेमध्ये लागणारी झोप ही काहीतरी वेगळीच असते. असेच एक दिवस बसलेलो असताना माझ्या मनात विचार आला गोधडी बोलू लागली तर..
असा मनात विचार येताच निबंध लिहायला सुरुवात केली आणि तुमच्या समोर मांडतो आहे. निबंध नक्की वाचा ,,, तुमचे विचार देखील कमेंटमध्ये कळवा.
चला तर मग बघुया एक छानसा निबंध |गोधडी बोलू लागली तर किंवा |गोधडीचे मनोगत|
|गोधडी चे मनोगत
|गोधडी बोलू लागली तर
|Godhadichi atmakatha
|Godhadiche manogat
|Autobiography of Godhadi in Marathi
रविवारचा दिवस होता. सुट्टी असल्यामुळे रविवारच्या दिवशी मी अगदी आरामात उशिरा उठतो. आई-वडीलही मला त्यामुळे रागवत नाहीत. माझी छान झोप झालेली होती, तरीदेखील मी अंथरुणातच पडलेलो होतो.
आमच्या घरामध्ये आजीच्या साडी पासून आईने अनेक गोधडी बनवलेल्या आहेत. त्यातील एक हिरव्या रंगाच्या साडी पासून बनवलेली एक गोधडी आहे. माझ्या अगदी लहानपणापासून मी माझीी हीच गोधडी वापरता आलेलो आहे.
माझी आजी आता या जगामध्ये नाही. आजी जिवंत असताना ती माझी खूप काळजी घेत असे. कजली परंतु या गोधडी मध्ये ज्या वेळेस मी झोपतो त्यावेळी आजीच्या कुशीत झोपलो आहे असे मला वाटते.
आज झोपलेलो असताना अचानक गोधडी माझ्याशी बोलू लागली. सुरुवातीला मी घाबरलो आवाज कुठून येतो आहे , परंतुुु गोधडीी मलाा म्हणालीी, अरे घाबरू नकोस मी तुझी आवडती गोधडी बोलते आहे. आताा मला थोडा धीर आलाााा आणि मी त्या गोधडी चे बोलणेेे शांततेने ऐकू लागलो.
गोधडी शांत स्वरांमध्ये बोलत होती. तू लहान होतास तेव्हा पासून माझ्या कुशीत अगदी आरामात झोपतो आहेस. मला आजही तुझ्या बालपणातील गोंडस चेहरा जसाच्या तसा आठवतो. तू रडत असताना आई तुला झोक्यात टाकत असे परंतु जर मला तुझ्याजवळ ठेवले नाही तर तू खूप रडायचा.
|गोधडीचे मनोगत मराठी निबंध
माझी निर्मिती तुझ्या आजीच्या हिरव्या साडी पासून झाली होती. ही साडी देखील तुझ्या आजीला खूप आवडत असे. आता इतक्या वर्षांमध्ये माझी अवस्था थोडी जीर्ण झालेली आहे परंतु तुझ्या आईने माझी खूपच काळजी घेतली आहे. ज्या ठिकाणी मी थोडीफार फाटलेली असते त्या ठिकाणी तुझ्या आई लगेच टाके घालते आणि दुसरा एखादा छानसा कापड त्याठिकाणी लावते.
नवीन छानसा कापड लावल्यामुळे एकेकाळी पूर्ण हिरव्या रंगाची असणारे मी आता विविध रंगांनी भरलेली आहे. जसा तू मोठा होत आहेस आणि तुझ्या रंग रूपांमध्ये देखील फरक होतो आहे त्या पद्धतीनेच माझ्या हे रंग रूपामध्ये फरक होतो आहे. तुझ्या बरोबर मीही बदलते आहे. आपल्या शरीरात कितीही बदल घडले तरी देखील एक गोष्ट मात्र तशीच आहे, ती गोष्ट म्हणजे आपल्या मध्ये असलेले प्रेम.
तू आजारी असताना आई माझ्याच कुशीत सतत तुला ठेवते. माझ्या कुशीत तो अगदी सहज झोपी जातोस. आता तर माझ्या कुशीत झोपल्यावर तुला तुझ्या आवडत्या आजीच्या कुशीतच झोपल्या सारखे वाटते. तू झोपल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद आणि ते समाधान मी अगदी सहज ओळखू शकते.
Autobiography of Godhadi in Marathi
पूर्वी मी मळाली की मला धुण्यासाठी नदीवर घेऊन जात असत. आता मात्र घरातच माझी चांगल्या पद्धतीने आंघोळ घातली जाते. नदीवर आंघोळ करताना खूपच मजा येत असे. आता कपडे धुण्याच्या यंत्रामध्ये गरगर फिरत असताना कधी कधी चक्कर आल्याचा भास होतो.
आता मी जीर्ण झालेली आहे आणि कधी काळी फाटूनही जाईल. पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या सहवासातच राहण्याची माझी खूप इच्छा आहे आपल्यातील हे प्रेमाचे नाते असेच अबाधित राहू दे एवढेच मी तुझ्याकडे प्रार्थना करते. आणि थांबते. आज तुझ्याकडे माझे मन मोकळे करून मला खूप आनंद वाटतो आहे. तुला पुन्हा माझ्या कुशीत घेण्यासाठी मी आतुरलेली आहे. आता उठ आणि आंघोळ वगैरे आवरून घे थोडा अभ्यास कर भरपूर खेळून घे आणि आपली भेट आता रात्री बिछान्यावर होईल तोपर्यंत काळजी घे.
एवढे बोलून गोधडी शांत झाली. माझ्या मनात मात्र त्र भावनांचे अनेक आंदोलन निर्माण करून गेले होते. तितक्यात आईचा अंघोळीसाठी आवाज आला आणि गोधडी चे शब्द मनात घोळत मी आंघोळीसाठी गेलो. एक गोष्ट मात्र मनात पक्की ठरवली. जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत त्या गोधडीची काळजी घ्यायची.
तर अशाप्रकारे आम्ही तुमच्यासाठी या लेखामध्ये गोधडीचे आत्मवृत्त, गोधडीचे मनोगत ,गोधडीची आत्मकथा या विषयावर निबंध,भाषण दिलेल्या आहे जर तुम्हाला निबंध भाषण आवडला असेल तर नक्की कमेंट करून तुमचं मत कळवा. धन्यवाद.
हा निबंध लोक खालील नावानेही शोधतात.
- | गोधडीची कैफियत
- | गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध
- | गोधडी ची आत्मकथा मराठी निबंध ,भाषण
- | मराठी निबंध गोधडीची आत्मकथा
- | गोधडीचे आत्मकथन निबंध
- | गोधडीचे आत्मकथन या विषयावर निबंध
- | गोधडीचे आत्मवृत्त मराठी निबंध
- | गोधडीचे आत्मकथन या विषयावर निबंध दाखवा
- | गोधडीचे आत्मकथन इन मराठी
- | गोधडीचे आत्मकथन in Marathi
- |Autobiography of Godhadi in Marathi
तुम्हाला खालील Marathi निबंध वाचायला नक्की आवडतील .
- माझी अभयारण्यास भेट.
- चहा बोलू लागला तर. किंवा मी चहा बोलतो आहे. किंवा चहा चे मनोगत.chaha
- ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे
- शिक्षक दिन ,varnanatmak nibandh
- माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
- पंडित नेहरुंचे मुलास पत्र
- माझे गाव
- स्वामी विवेकानंद
- झाडे लावा झाडे जगवा
- मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat in marathi nibandh
- दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
- मी पाहिलेला अपघात
- माझी शाळा .
- महात्मा ज्योतिबा फुले
- माझा भाऊ
- आमचे वनभोजन
- माझे वडील मराठी निबंध
- मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
- मी पाहिलेला अपघात
- निसर्गाचे मनुष्यास पत्र
- माझे आवडते संत एकनाथ महाराज
- जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
- माझा बस प्रवास/maza bus pravas
- माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
- पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
- सुंदर मराठी सुविचार
- छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
- स्वामी दयानंद सरस्वती
- राजा राममोहन रॉय
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
- रम्य पहाट
- दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी/Diwali status Marathi
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
- कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
- व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
- पर्यावरणाचे महत्व.. environment
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या. Tips for personality development in Marathi.
- पैंजण
- भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार,, inspirational and motivational thoughts of Shahid bhagat Singh
- मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
- रम्य पहाट
- दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी/Diwali status Marathi
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.