1001marathiessay.blogspot.com
माझ्या स्वप्नातील शाळा | Mazya swapnatil Shala Marathi nibandh
मित्रांनो तुमच्यासाठी मी आज माझ्या स्वप्नातील शाळा हा निबंध लिहिलेला आहे.निबंध मोठा आहे परंतु तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यामधील काही भाग वापरू शकता. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सुचवू इच्छितो की तुम्ही निबंध वाचून स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा.
स्वतः लिहिण्याच्या सरावामुळे निबंध लेखनाची कला आपोआपच विकसित होते.त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आता वाचू या एक छानसा निबंध "माझ्या स्वप्नातील शाळा".
लोक खालील प्रमाणे ही शोधतात.
1) |Majhya swapnatil Shala essay in Marathi|
2) |Majhya swapnatil Shala nibandh in Marathi |
3 )|Me Shala boltey essay in Marathi
माझ्या स्वप्नातील शाळा मराठी निबंध
Mazya swapnatil Shala Marathi nibandh
शाळा म्हणजे बालकाचे चारित्र्य घडवणाऱ्या संस्था होय. यशस्वी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवन मूल्य शिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शाळेच्या माध्यमातून केला जातो.
सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा वाढल्याचे चित्र मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. पाठ्यपुस्तकांची गुणवत्तादेखील वाढलेली आपल्याला बघायला मिळते. परंतु शिक्षण गुणवत्तापूर्ण होईलच याची शाश्वती पूर्णपणे देता येत नाही.
माझ्या स्वप्नातील शाळा मात्र या सर्व गोष्टींच्या विरुद्ध असेल. भौतिकतेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वंकष आणि सर्वांगीण विकासाला चालना देणारी माझ्या स्वप्नातील शाळा असेल. ज्या ठिकाणी फक्त ध्येयाने पछाडलेले विद्यार्थी जगाच्या विकासासाठी सतत प्रयत्न करतील. हे ध्येय विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवण्याची त्यांना मुभा असेल. माझ्या स्वप्नातील शाळा विद्यार्थ्यांना स्वतःचे ध्येय कसे ठरवावे आणि स्वतः आतील गुणवत्ता व क्षमता कशा ओळखाव्यात आणि त्या कशा विकसित कराव्यात याचे मार्गदर्शन मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.
जडत्वाचा शोध घेणाऱ्या विज्ञानाच्या संशोधनाबरोबरच भाव-भावना असणाऱ्या हाडा मासांच्या माणसांच्या मानसिक आणि शारीरिक उत्थानासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या युवकांची निर्मिती माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये होईल. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला पूर्ण वाव असेल. विद्यार्थ्यांना सूचनाऱ्या नवनवीन कल्पना प्रत्यक्ष कृतीद्वारे बघण्याची सुविधा माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्कार रुजवण्यासाठी नियमितपणे संस्कारांचे धडे दिले जातील. कृतिशील उपक्रमांची नियोजनबद्ध गुंफण करून विद्यार्थी अध्ययन अनुभव जास्तीत जास्त प्रमाणात कसे संपादन करु शकतील यावर भर दिला जाईल.विद्यार्थ्यांना सतत नवनवीन अध्ययन अनुभव कसे मिळतील अशा वातावरणाची निर्मिती माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये सतत केली जाईल.
माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी आणि नियोजन करण्यात येईल.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभिवृत्ती आणि कल चाचण्या घेण्यात येतील . त्यातून निष्पन्न होणाऱ्या निकालाद्वारे विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी जाणून घेऊन त्यांना त्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये सर्वाधिक भर दिलेला असेल.
शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी माझी शाळा कल्पवृक्ष ठरली पाहिजे. विद्यार्थी शाळेत येण्यासाठी अगदी उतावीळ झाला पाहिजे. शाळेत आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आईच्या कुशीत आलो आहोत इतके प्रेम प्रत्येक शिक्षकाकडून व गुरु जणांकडून मिळेल.
प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडी-निवडी जपण्याचे स्वातंत्र्य असेल. आपल्या कल्पना मांडण्यासाठी प्रत्येकाला व्यासपीठ उपलब्ध होईल अशी व्यवस्था या शाळेमध्ये असेल. चित्रकला ,नृत्य कला, संगीत विविध क्रीडा प्रकार या सर्वांमध्ये नावलौकिक मिळवणारे जागतिक कीर्तीचे खेळाडू माझ्या स्वप्नातील शाळेमध्ये आकारास येतील.
माझ्या स्वप्नातील शाळेला एक सुंदर बाग असेल. या बागेमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड विद्यार्थ्यांनी द्वारे करून घेतले जाईल. प्रत्येक वनस्पतीचे महत्त्व त्यांचे वैज्ञानिक नाव विद्यार्थ्यांना माहित असेल. प्रत्येक विद्यार्थ्यांना कमीत कमी एक झाड दहा वर्षांपर्यंत जगवणे सक्तीचे असेल.
शिक्षक वृंद:
माझ्या स्वप्नातील शाळेतील शिक्षक सतत विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारे असतील. त्यांच्या मनात विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी नवनवीन कल्पना कशा राबवता येतील याच विचारात तेेे सदैैैैव राहतील. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या उक्तीप्रमाणे सतत स्वतःचा विकास साधण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतील.
या शाळेतील शिक्षक सध्याच्या युगात जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व क्रिया कौशल्य संपादित केलेले असतील. प्रत्येक विद्यार्थ्याला ना शिक्षक म्हणजे आपल्या या प्रगतीसाठी झटणारे दीपस्तंभच वाटतील. उत्तम चारित्र्य संवर्धन त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा गुण असेल. त्यांच्या हाताखालून शिकून तयार झालेले विद्यार्थी जगाच्या बाजारात कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाहीत हाच एक एक ध्यास मनात घेऊन ते सतत काम करतील. शिक्षकांनी फक्त काशिकवणे एवढेच अपेक्षित नसते. शिक्षकांनी मार्गदर्शन करणे व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करून देणे यांच्या कार्यपद्धतीचे सूत्र असेल.
शालेय परिसर व वातावरण:
शाळेचे वातावरण अगदी प्रसन्न असेल. प्रत्येक वर्ग खोलीत भरपूर सूर्यप्रकाश येईल अशा पद्धतीने शाळेच्या वर्गखोल्यांची रचना करण्यात येईल.
- माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
- माझे गाव
- दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
- माझा भाऊ
- आमचे वनभोजन
- माझे वडील मराठी निबंध
- मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
- मी पाहिलेला अपघात
- पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
- झोपडपट्टीचे मनोगत किंवा झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा
- एका शेतकऱ्याचे मनोगत
- आमचे श्रमदान मराठी निबंध aamche shramdan marathi essay
- माझा आवडता ऋतू मराठी निबंध , maza aawadta rutu marathi nibandh
- माझे आजोबा मराठी निबंध Majhe ajoba marathi nibandh/
- वृक्षदिंडी
- माझी ताई मराठी निबंध My sister essay in marathi
- माझा प्रिय मित्र मराठी निबंध , 3 निबंधMy best friend essay in marathi
- घड्याळ बोलु लागले तर,घड्याळाचे मनोगत ,ghadyal bolu lagle tar,ghadyalache manogat marathi nibandh
- मी वृक्ष बोलतोय
- आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन
- माझी आई, majhi aai marathi nibandh
- कोरोना व्हायरस, corona,covid-19
- मी कोरोना वायरस बोलतोय.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.