www.upkarmararhi.com
सर्व प्रिय वाचक मित्रांचे मी आज पुन्हा स्वागत करतो. प्रत्येकाच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने आणि सुखाने भरलेला जावा अशी सर्वांना शुभेच्छा देतो आणि देवाकडे प्रार्थना ही करतो. आज मनात एक छानसा निबंध लिहिण्याची कल्पना आली आणि मग केली सुरुवात .
निबंध कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्या आधी आपण बघुया एक छानसा मराठी निबंध.. आज आपण बघूया मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध.
मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध |
मला सैनिक व्हायला आवडेल
| Mala Sainik vhayala aavdel Marathi nibandh.
आपल्या जीवनाविषयी प्रत्येकाच्या काहीतरी अपेक्षा असतात .जीवन जगताना कोणते ध्येय साध्य करायचे हे अनेकांनी ठरवले असते, तर बऱ्याच जणांना जीवन संपून गेल्यावर देखील या गोष्टीचे भान येत नाही. मला मात्र फारच लवकर ह्या गोष्टीचे भान आले आहे. जीवणात मला काय करायला आवडेल? किंवा काय व्हायला आवडेल? याचा विचार करत असताना माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून एक उत्तर लगेच समोर आले. मला सैनिक व्हायला आवडेल.
सैनिकांचा रुबाब फारच छान असतो. सैनिकांचे चालणे ,बोलणे ,वागणे सर्व गोष्टींमध्ये एक वेगळेपणा असतो. सैनिकांचा पेहराव फारच सुंदर दिसतो.
सैनिकांच्या डोक्यावर असणाऱ्या टोप्या फारच आकर्षक वाटतात. प्रत्येकाला त्यांच्या पदानुसार वेगवेगळ्या दिसणाऱ्या टोप्या देखील दिल्या जातात. मलाही त्यातील पुढे टोक असणारे टोपी खूप आवडते.
सैनिकांचे जीवन अगदी शिस्तप्रिय असते. त्यांची शिस्त त्यांच्या वागण्यातून आणि चालना बोलण्यातून प्रत्येक वेळा दिसत असते. टीव्हीवर ज्यावेळी सैन्य दलाशी संबंधित कोणताही कार्यक्रम सुरू असतो, तो कार्यक्रम मी अत्यंत आवडीने बघतो. हे कार्यक्रम बघताना मी एका वेगळ्या विश्वात निघून जातो.
मला सैनिक व्हायला आवडेल होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सैनिकांचे देशावर असत असलेली नितांत प्रेम.देशावर प्रेम तर सगळेच करतात परंतु देशासाठी स्वतःचा जीवही द्यायला सदैव तयार असतात ते म्हणजे सैनिक. त्यांची ही त्यागवृत्तीच मला त्यांच्याविषयी अधिक आदर करण्यास भाग पाडते.
ज्या वेळी संपूर्ण देशामध्ये कुठे आणीबाणीची किंवा कठीण परिस्थिती निर्माण होते त्यावेळी सैनिकांना पाचारण केले जाते. सैनिक त्या ठिकाणी पोहोचले की संपूर्ण परिस्थिती काही क्षणातच नियंत्रणाखाली आणतात . त्यांची ही कर्तव्यतत्परता देखील मला खूप आवडते.
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दूरदर्शनवर संचलन बघताना मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. विविध शस्त्रे आणि उपकरणे त्यांच्या मागे मागे एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने चालणारे सर्व सैनिक म्हणजे शिस्तीचे उत्तम उदाहरण होय.
त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून सैनिकांकडे बघता येईल. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सैनिक रात्रंदिवस देशाच्या सीमेवर उभे असतात. ऊन वारा पाऊस थंडी कोणताही ऋतू असला तरी देखील मोठमोठ्या पर्वता सारखे हे आपले भारतीय सैनिक सीमेवरती ताठ मानेने उभे असतात.खरोखर प्रामाणिकपणे देशाची सेवा करणारे कोणी नसतील तर ते सैनिकच आहेत म्हणूनच सैनिक देशाचा खरा संरक्षक आहे असे म्हणावेसे वाटते.
|मी सैनिक झालो तर|
भारताच्या आजूबाजूला ाकिस्तान सारखा आतंकवादाला खतपाणी घालणारा देश आहे तर दुसरीकडे चीन सारखा सतत दुसर्याची जमीन बळकाऊ पाहणारा आक्रमक देश देखील आहे. जम्मू- काश्मीर ,लेह-लडाख या भागात सतत सैनिकांना जागृत पहारा ठेवावा लागतो.सियाचीन सारख्या रक्त गोठवून टाकणाऱ्या थंडीत देखील भारतीय जवान देशभक्तीच्या ऊर्जेने सतत उभा असतो. या खंबीर भारतीय सैनिकाला माझा मानाचा मुजरा.
मला इथं असे नमूद करावेसे वाटते की , विषय गंभीर तिथे भारतीय सैनिक खंबीर. त्यांना खंबीर रहावेच लागते कारण की ते ज्या ठिकाणी काम करतात त्याठिकाणी चुकीला माफी नाही,आणि वावही नाही . एका छोट्याशा चुकीमुळे अनेक सैनिकांना आपला प्राण गमवावा लागू शकतो. तसेच युद्धामध्ये हार देखील पत्करावी लागू शकते. त्यामुळे सैनिकांना कोणतेही निर्णय घेताना अगदी काटेकोरपणे व सर्व बाजूंचा विचार करूनच घ्यावे लागतात.
फार कठीण परिश्रम केल्यानंतर शरीर तयार करणारे तरुण मोठ्या कष्टाने सैन्यामध्ये भरती होतात. भरती झाल्यानंतर त्यांना कठीण प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते .प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग डोंगराळ आणि अवघड क्षेत्रामध्ये काही महिने राहून देशाचे सेवा करावी लागते. देश रक्षणाचे महान पण खूप कठीण काम करताना सतत त्यांच्या जिवितावर मृत्यूची टांगती तलवार असते. पण मृत्यूला घाबरेल तो सैनिक कसला. मृत्यूलाही डोळ्यात डोळे घालून आलिंगन देणारी सैनिकाची जात असते.
जोपर्यंत सैनिक डोळ्यात तेल घालून प्राणपणाने देशाचे रक्षण करत आहेत तोपर्यंत देशाच्या आतील सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू राहणार.
भारतामध्ये विविध सण उत्सव साजरे केले जातात. ज्यावेळी आपण दिवाळी, दसरा, होळी, रंगपंचमी साजरी करत असतो त्यावेळेस सीमेवरती जवान रक्तरंजित रंगपंचमी खेळत असतो. दिवाळीसारख्या सणांमध्ये आपण दिवे लावून उजेड करतो , त्याच वेळी अचानक कोणत्यातरी घराचा दीपक विझलेला असतो.
असे अनेक वेदनादायी प्रसंग मी बघितलेले आहे त. देशासाठी का त्याग करण्याची संधी मिळते यामुळे मला सैनिक व्हायला नक्की आवडेल.
प्रिय मित्रांनो, तुम्हाला हा मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध कसा वाटला हे हे कमेंट करून नक्की कळवा. तुमचा प्रेरक प्रतिसाद आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.
वरील निबंध मला सैनिक व्हायला आवडेल हा तुम्ही विविध परीक्षांमध्ये वापरू शकतात. तसेच तुम्हाला अजून कोणता आहे निबंध हवा असेल तर तर तसेही कमेंटमध्ये नक्की कळवा.किंवा contact us पेजला जाऊन आमच्याशी संपर्क साधा.
धन्यवाद....
तुम्हा सर्वांना आरोग्यमय आयुष्याच्या शुभेच्छा.
- स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी माहिती वाचा .
- राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .
हे वाचायला विसरू नका.
- मी मासा बोलतोय
- मी शेतकरी बोलतोय
- झाडे आपले मित्र
- पैंजण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- उपकार कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे निबंध वाचायला विसरू नका
- आजची स्त्री मराठी निबंध
- Which topics of essays can come in board exam 2020
- शालेय जीवनात खेळाचे महत्व
- या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi
- माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
- माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
- बालपण /रम्य ते बालपण
- माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay
- माझी आई - माझा छोटासा निबंध
- संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
- बैल
- नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
- माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.