1001marathiessay.blogspot.com
सशाचे मनोगत ,
maza avadta prani sasa
| sasache manogat
maza avadta prani sasa | sasache manogat |
सशाचे मनोगत ,
maza avadta prani sasa
| sasache manogat
नमस्कार मित्रांनो .मी ससा बोलतो आहे. तुम्ही लहानपणी माझी गोष्ट ऐकली असेलच. कासवा सोबत शर्यतीमध्ये मी कसा हारलो हे तुम्हाला माहीत असेलच. माझी ही गोष्ट ऐकल्याशिवाय तर मुलांचे बालपण पूर्णच होत नाही. तो शर्यतीत हरलेला ससा म्हणजे मी तुमच्याशी बोलतो आहे.
मला माझ्या वेगाचा खुपच गर्व होता. गर्व का असू नये. मी वेगाने धावतो हे सगळ्यांना माहीत आहे. त्यादिवशी माझा घात केला तो माझ्या अति आत्मविश्वासाने. समोरच्या व्यक्तीला कधीही कमजोर समजू नये हा धडा मी त्यादिवशी शिकलो. माझ्या माध्यमातून तुम्हालाही ही गोष्ट समजून आलीच असेल.
त्या दिवशी मी फार वेगाने पळायला सुरुवात केली होती आणि मी खूप पुढे पोहोचलेलो होतो. पण वेगाने पळण्यामुळे मला भूक लागली होती. नेमका त्याच ठिकाणी रसरशीत गाजर आणि मुळे यांचा मळा होता. ते बघून तर मला माझी भूक अनावर झाली आणि भराभर भराभर खायला सुरुवात केली. त्यावेळी किती खाल्ले गेले याचे भानच राहिले नाही. इतके जेवण झाल्यामुळे व्हायचे ते झाले माझे डोळे कधी लागले ते मला कळलेच नाही.
मी माझ्या ध्येयापासून विचलित झालो हे मी मान्य करतो. माझी चूक नाही , असे मी अजिबात म्हणणार नाही. कासव मात्र न थांबता हळूहळू चालतच राहिले. कासवाने मनात न थांबण्याचे ठरवले होते. कासव ठरल्याप्रमाणेच वागले, त्यामुळे शरद जिंकले.
या स्पर्धेमुळे आमच्यामध्ये शत्रुत्व निर्माण झाले असेल असे तुम्हाला वाटेल. उलट या शर्यती मुळे आमच्या मध्ये मैत्री निर्माण झाली. एकेदिवशी कासवाला कुठेतरी पटकन जायचे होते त्यादिवशी मी कासवाला माझ्या पाठीवर घेतले आणि वेगाने त्याला त्याच्या इच्छित ठिकाणी पोहोचवले. तसेच खाण्याच्या नादात एके दिवशी मी तलावात पडल आलो त्यावेळी कासवाने मला पाठीवर घेतले आणि काठावर नेऊन सोडले.
- हे ही नक्की वाचा - सशाविषयी माहिती जाणून घ्या .
या सर्व प्रसंगांमधून एक गोष्ट आम्हाला शिकायला मिळाली की, देवाने प्रत्येकामध्ये काही तरी गुण दिलेला असतो. त्यामुळे एकमेकांचा आदर करा आणि मिळून मिसळून राहा. चला मला आता पुन्हा भूक लागलेले आहे मला मऊ लुसलुशीत हिरवेगार गवत खाण्याची इच्छा झालेली आहे. पुन्हा भेटू कधीतरी आणि भरपूर गप्पा मारू.
प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा माझा आवडता प्राणी ससा किंवा सशाचे मनोगत निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
१) मी ससा बोलतो आहे.
२) ससा बोलू लागला तर..
३) सशाचे मनोगत
४) सशाचे आत्मवृत्त
५)सशाचे आत्मकथन
६) सशाची कैफियत
तुम्ही तुमच्याशी एखादा प्राणी बोलत आहे असा विचार करून निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. या ब्लॉगवर तुम्ही आम्हाला विविध विषयावर आधारित मराठी निबंध बघायला आणि वाचायला मिळतील.हे निबंध तुम्ही वाचा आणि स्वतःही लिहिण्याचा प्रयत्न करा.
तसेच हा निबंध कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मला निबंध लिहिण्याची प्रेरणा मिळते.
तुम्हाला अजून एखाद्या निबंधावर विषय हवा असेल तर ते आम्हाला सांगा आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा निश्चित प्रयत्न करू.
- वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
- Quotes used in essays in Marathi and Hindi
- माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
- मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
- मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
- माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
- मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
- आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
- इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
- आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
- विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
- मराठी प्रेरणादायी वाक्य, Best Marathi motivationalquotes.
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- माझे घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.