1001marathiessay.blogspot.com


मी पाहिलेले शेत  निबंध मराठी
 | mi pahilele shet marathi nibandh 


मी पाहिलेले शेत  निबंध मराठी
 | mi pahilele shet marathi nibandh 

   
           माझे वडील मुंबईसारख्या विभागात आरोग्य विभागामध्ये वरिष्ठ पदावर नोकरीला असल्यामुळे गावी येण्याचा प्रसंग फारच क्वचित प्रमाणात येतो. त्यामुळे आजी-आजोबांची भेट फारच क्वचित वेळा होते. यावेळी मात्र फारसे चांगले झाले.म्हणजे या घटनेला चांगले म्हणावे की वाईट  हे मला सांगता येणार नाही, परंतु या घटनेच्या कारणामुळे मला जो अनुभव मिळाला तो माझ्या कायम लक्षात राहील.
        हिरणा म्हणजे लॉकडाऊन.. लोक डॉन मुळे वडिलांना कामाचा खूपच वाढलेल होता
. त्यातच वडील कायम कोरोनाग्रस्त लोकांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणात येत होते. त्यामुळे पप्पांनी आम्हा सगळ्यांना आमच्या आजोळी पाठवून दिले होते.
         आजोळी आल्यानंतर मी पहिल्यांदाच आमच्या शेतामध्ये गेलो.राहताना शेत बघण्याचा प्रसंग कधी आलाच नाही. मी एक संपूर्ण शहरे आयुष्य जगत होतो. त्यामुळे खेड्यातील आयुष्य आणि त्यातील सौंदर्य हे मला परिचित नव्हते.
        आजोबांबरोबर शेतात गेलो. शेताला जाण्याचा रस्ता थोडा खराब होता. मातीचा रस्ता असल्यामुळे जागोजागी खड्डे ही पडलेले होते. रस्त्याच्या आजूबाजूला मात्र काहीही लाल ,पिवळी ,निळ्या रंगाची फुले भरपूर प्रमाणात फुललेली होती.
       बैलगाडीत बसून गप्पा मारत आम्ही सगळे आमच्या शेतामध्ये पोहोचलो.शिवार म्हणजे काय ? हे मला आजोबांनी समजावून सांगितले. आमचे शेत  शिवाराच्या सुरुवातीलाच असल्यामुळे लवकरच शेतात पोहोचलो.
        शेतात पोहोचल्यावर तर मी माझे भानच हरपून गेलो. शेतामध्ये काही भागात मक्याचे पीक घेतले होते. तर काही भागांमध्ये गहू वाऱ्याबरोबर स्वतःच्या मस्तीत आणि धुंदीत डोलत होता. सगळीकडे हिरवळीचे साम्राज्य पसरलेले होते. मक्याच्या रोपांना मक्याची कणसे लागलेली होती. मक्याच्या झाडाची लांबट आणि थोडी पसरट पाने वाकून जमिनीच्या दिशेने झुकलेले होते.ही पाने जणू कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या नर्तकाप्रमाणे वाटत होती. अगदी पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती जशी कमरेवर हात ठेवून उभी आहे तसेच दर्शन त्या झाडामध्ये दिसत होते. अशावेळी मला आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील संत सावता माळी यांचा एक अभंग आठवला
 
   " कांदा मुळा भाजी 
अवघी विठाबाई माझी"

    त्यांनाही अशाच पद्धतीने शेतामध्ये पांडुरंगाचे दर्शन झाले असावे असे मला काही क्षणापुरता वाटले. 
    
       माझी नजर एका जागी स्थिर राहतच नव्हती. चहुकडे गरगर फिरणाऱ्या डोळ्यांना सर्वत्र हिरवळीचे साम्राज्य दिसत होते .एखाद्या कुशल चित्रकाराने आपले सर्व रंग सांडून फक्त हिरवा रंग सगळ्या चित्रावर आपल्या कुंचल्याने प्रमाणबद्ध पद्धतीने ओतून द्यावा असेच ते दृश्य होते.मी पाहिलेले शेत आता माझ्या कायम स्मरणात राहील याची मनात पक्की खात्री पटली होती.
       आजोबा आम्हाला शेतात बांधलेल्या एका झोपडीत जवळ घेऊन गेले. व त्यांनी सदा भाऊ म्हणून कोणाला तरी जोरात हाक मारली.हाकेसरशी झोपडीतून एक उतारा वयाचा माणूस बाहेर आला. सदाभाऊ चे वय चेहऱ्यावरून दिसत होते परंतु त्याची अंगकाठी मात्र त्याचे वय लपवत होती.आजोबांनी सदाभाऊ ला पाण्याच्या मोटारीचे बटन सुरु करायला सांगितले आणि आम्ही सगळे झोपडीच्या मागच्या बाजूला निघालो.
       झोपडीच्या मागे फार सुंदर विहीर होती. विहिरीमध्ये डोकावून बघितल्यानंतर त्यात निळ्याशार आभाळाचे प्रतिबिंब आपल्या कुशीत घेऊन हलणारे विहिरीचे पाणी दिसले.बाजूलाच असलेल्या पाईप मधून पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला. आम्ही दोघे भावंड पाणी बघून हरखून गेलो आणि त्यामध्ये जोरजोरात उड्या मारू लागलो.आमच्या आनंदाच्या सर्व सीमा  व त्या पाण्याबरोबर वाहून गेलेल्या होत्या.
         शेतामध्ये असलेल्या रेषांमधून  वाहत जाणारे पाणी बघून माझे मन देखील त्याच्याबरोबर वाहत जात होते. मी अंगात वार भरल्यासारखा सगळ्या शेतातून पळू लागलो. आजोबांनी लगेच मला पिकातून पळू नको असे सांगितले व त्यामुळे पिकाचे नुकसान होते हे समजावून देखील सांगितले.
        थोड्या वेळा नंतर आम्ही शेतातील आंब्याच्या झाडाखाली जेवणासाठी बसलो. आईने घरातून छान पैकी डबा तयार करून आणला होता.शेतातल्या स्वच्छ सुंदर वातावरणामध्ये प्रथमच मी जेवणाचा आनंद घेत होतो. नेहमीपेक्षा खूपच जास्त जेवण केले तरीदेखील काहीही त्रास जाणवत नव्हता.स्वच्छ सुंदर निसर्गाचा माणसाच्या प्रकृतीवर इतका चांगला परिणाम होतो याचा प्रत्यक्ष अनुभव मी तेव्हा घेत होतो.
       आजोबांनी शेतामध्ये असलेल्या विविध झाडांचे औषधी गुणधर्म देखील सांगितले.काही सुंदर फुलांचे फोटो ही आईच्या मोबाईल मध्ये मी काढले. खूप खेळून झाल्यानंतर आजोबांनी आवाज दिला आणि आम्ही घराच्या दिशेने निघालो.
      मनामध्ये अनंत सुखद आठवणींचा ठेवा घेऊन  घराच्या दिशेने आम्ही निघालो. बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा तालबद्ध आवाज शांत वातावरणामध्ये घुमत होता. मधेच घोंगावणारा वारा यायचा आणि निसर्गाचे संगीत वेगवेगळे आयाम दाखवायचा. हे सर्व निसर्ग सौंदर्य मनाच्या आणि हृदयाच्या कुपिमध्ये बंदिस्त करून आज पर्यंत जपून ठेवले आहे आणि ते कायम तसेच राहील .


    प्रिय विद्यार्थी मित्र आणि वाचक मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा. तुमच्या मनातील आनंददायक कल्पना आम्हाला नक्की कळवा.

         
लोक हा निबंध असाही शोधतात.

  1. मी पाहिलेले शेत  निबंध in marathi
  2. mi pahilela shet.in marathimi 
  3. pahilela shet निबंध in marathi
  4. mi pahilela shet निबंध in English with example
  5.  marathi essay on me pahilela shet 
  1. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.




4 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने