1001marathiessay.blogspot.com
" आपण ज्या ठिकाणी वारंवार भेट देऊ इच्छित आहात अशा ठिकाणाचे वर्णन करा 300 शब्दांमध्ये"
"ESSAY ON describe a place where you often like to visit in 300 words"
| mi pahilele paryatan sthal |
|Holidays information in Marathi|
आमच्या गावाजवळच गावाच्या समृद्धीचे मुख्य कारण असलेले धरण आहे. या धरणाचे नाव लाटीपाडा असे आहे. मला लाटीपाडा धरणावर जायला खूप आवडते. मी दिवसातून एकदा तरी धरणावर फिरायला जातो. सुट्टीच्या दिवशी तर दिवसातून दोन वेळा सुद्धा जातो.
लाटीपाडा धरण आमच्या गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. गावाची जीवनदायिनी नदी पांझरा नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. लाटीपाडा धरण म्हणजे मध्यम स्वरूपाचा प्रकल्प आहे.
धरणाकडे जाण्याचा रस्ता फारच सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती केली जाते .गावातून बाहेर पडताना एक हॉटेल आहे. त्या हॉटेल जवळून उजव्या बाजूला वळले की धरणाकडे जाता येत. रस्ता थोडा वळणावळणाचा आहे.
आम्ही घरून ज्यावेळी धरणा वर जाण्यासाठी निघतो तेव्हा सकाळीच छान पैकी डबे बनवून घेतो आणि मग चालतच जातो. कधीकधी गाडीनेही जातो. पण पाहिजे जात असताना भरपूर गप्पा रंगतात. त्यामुळे जास्त मजा वाटते. गप्पा मारत मारत कधी धरणावर पोहोचतो समजत देखील नाही.
धरणाजवळच शासकीय रोपवाटिका आहे. रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारची झाडे आणि रोपे लावलेले आहेत. सामाजिक वनीकरणाच्या साठी विविध प्रकारची रोपे याठिकाणी तयार केली जातात. धरणावर जाताना रोपवाटिकेमध्ये जाणे हा कार्यक्रम ठरलेलाच असतो. रोपवाटिकेतील झाडांची रचना फारच सुंदर केलेली आहे. तिथूनच धरणातून निघालेला एक छोटा कालवा जातो .त्यामुळे कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाचा आस्वाद घेण्याचा वेगळाच आनंद मिळतो.
कालव्याचा खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू येतो. तिथेच छोटीशी झोपडी आहे. मोठ्या झाडांचे वाळलेली लाकडे गोळा करून आम्ही छोटीशी चूल मांडतो व जेवण बनवण्याचा कार्यक्रमही कधीतरी करतो. निसर्गाच्या सानिध्यात बनवलेल्या जेवणाची चव काहीतरी अलौकिकच असते.
काही पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दिसतो मोठा जलाशय. वाऱ्या बरोबरच हेलकावे घेत अनेक लाटा धरणाच्या मध्यभागापासून तर काठापर्यंत येतांना दिसतात . ते दृश्य फारच छान वाटते. खरंच निसर्गासारखा कलाकार दुसरा अन्य होणे नाही. या लाटा जेव्हा काठावर असलेल्या खडकांवर आदळतात, तेव्हा छान छान मंद ध्वनी निर्माण होतो.
मी संगीत विषय शिकत असल्यामुळे माझ्या मनाला हा ध्वनी फार सुखावून जातो. संध्याकाळच्या यावेळी अस्ताच्या दिशेने निघालेला भास्कर संपूर्ण वर आपल्या भगव्या रंगाची शाल पांघरून कवेत घेतो.
संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचे दृश्य फारच मनोहर वाटते. सगळे जग निशब्द आणि स्तब्ध वाटते. सूर्याचे बिंब हळूहळू क्षितीजाच्या आड जात असते. पक्षांचे थवे आपापल्या घरट्याकडे परतत असतात. त्यांच्या थव्यांची नक्षी फारच आकर्षक वाटते.
पक्ष्यांच्या अंगी असलेली शिस्त बघून र्याचदा माणूस किती बेशिस्त वर्तन करतो याची जाण येते.
दिवसभराचा डोक्यातील विचारांचा कल्लोळ या प्रेक्षणीय स्थळी गेल्यानंतर शांत होऊन जातो. त्यामुळे आमच्या गावातील हे प्रेक्षणीय स्थळ मला खूप खूप आवडते आणि मी त्या ठिकाणी वारंवार जातो.
.........
या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
१)"मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध"
२) "आमच्या गावातील प्रेक्षणीय स्थळ"
३)" माझे आवडते प्रेक्षणीय स्थळ"
४) "मी पाहिलेले पर्यटन स्थळ"
५) "आमच्या गावातील पर्यटन स्थळ"
६) "माझे आवडते पर्यटन स्थळ मराठी "
प्रिय मित्रांनो तुम्हाला " माझे आवडते पर्यटन स्थळ"हा लेख कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमचे आवडते प्रेक्षणीय स्थळ कोणते ते देखील आम्हाला सांगा आणि त्याचे वर्णन वाचायला आम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला शक्य झाल्यास ते आम्हाला पाठवा
- वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
- Quotes used in essays in Marathi and Hindi
- माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
- मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
- मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
- माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
- मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
- आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
- इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
- आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
- विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
- मराठी प्रेरणादायी वाक्य, Best Marathi motivationalquotes.
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- माझे घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.