1001marathiessay.blogspot.com
वर्षभर अभ्यास करून शेवटी परीक्षा देऊन उत्तीर्ण होणे हा आपल्या शैक्षणिक जीवनाचा ठरलेला मार्ग आहे. आपणही आज पर्यंत अशाच पद्धतीने शिक्षण घेत आलेलो आहोत .आधीच्या लोकांनी देखील असेच शिक्षण घेतले.
जे लोक वर्षभर नियमितपणे अभ्यास करतात परीक्षा म्हणजे हाताचा मळ वाटतो. त्यांच्यासाठी परीक्षा म्हणजे कारल्याचा कडू रस पिण्यासारखे आहे. त्यांना परिक्षा कधीही नकोशा वाटतात. मग माझ्या मनात विचार आला की,| परीक्षा नसत्या तर | किंवा |परीक्षा बंद झाल्या तर | किती मजा येईल.
यावर आधारित एक छानसा निबंध बघूया परीक्षा नसत्या तर मराठी निबंध .
| परीक्षा नसत्या तर मराठी निबंध |
|Pariksha nastya tar, |Pariksha nasti tar, Pariksha
परीक्षा नसत्या तर शाळेमध्ये नेमके कशासाठी शिकायचे आहे याचा अंदाज कुणालाच आला नसता. तसे शाळेमध्ये मुली शिक्षण किंवा चांगला सुजान नागरिक घडवणे हे महत्त्वाचे कार्य केले जाते आणि ते केले गेलेच असते. परीक्षा असल्या किंवा नसल्या तरी देखील.
ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा कंटाळा येतो ,त्यांच्यासाठी ही कल्पना तर अगदी अमृत मिळाल्यासारखी आहे. याउलट चे विद्यार्थी खरोखर खूप अभ्यास करतात त्यांना मात्र हे अजिबात आवडणार नाही.
परीक्षेची भीती नष्ट होऊन जाईल त्यामुळे काही विद्यार्थी चांगला अभ्यास देखील करतील. तर काही विद्यार्थी अजूनच अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील.
दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी तर आकाश ठेंगणे होईल. वर्षभर अभ्यास करून घाम गाळणे. पालकांच्या अपेक्षांचे ओझे डोक्यावर बाळगून मनापासून अभ्यास करणे. या गोष्टींचे दडपण निघून जाईल.
एक गोष्ट मात्र घडेल. वर्षभर मनापासून कष्टपूर्वक अभ्यास करून शेवटी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यावर कष्टाला फळ आल्याचे समाधान अजिबात मिळणार नाही. दहावी-बारावी बोर्डामध्ये येऊन सर्वांच्या मनामध्ये आदर मिळवण्याची संधी मात्र नक्की गमावून बसणार.
प्रिय मित्रांनो तुम्हाला निबंध आवडला कमेंट करा. परीक्षा बंद झाल्या तर किंवा परीक्षा नसत्या तर काय काय गम्मत घडेल याविषयी तुमच्या मनात काही कल्पना असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. तुमच्या कल्पना आणि युक्त्या ऐकायला आणि वाचायला आम्हाला नक्की आवडेल.
निबंध वाचून झाल्यानंतर तुमच्या प्रियजनांना वाचण्यासाठी शेअर करायला अजिबात विसरू नका.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.