1001marathiessay.blogspot.com

Pioneers have helped the world to Progress Essay




        गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते.गरज निर्माण झाल्यानंतर  मात्र सर्वच त्याच्यावर मात करतात असे अजिबात नाही. शोध लागल्यानंतर त्याचा वापर सगळेजण स्वतःचे कष्ट वाचवण्यासाठी मोठ्या आनंदाने करतात. पण हा आनंद त्यांच्या पदरात टाकणारे असतात तरी कोण तर ते असतात आद्यप्रवर्तक (pioneers).
        Pioneers दिसायला सामान्य माणसं जरी वाटत असले परंतु हे मात्र ध्येयाने आणि हा विशिष्ट वेडाने पिसाटलेली माणसं असतात. यांनी जणू संपूर्ण जग बदलण्याचा वसाच उचललेला असतो.
    हे शोध लावण्यासाठी त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक कष्ट झालेले असतात, परंतु कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही .अशा दुर्दम्य इच्छाशक्तीने ही माणसे कष्टांची चिंता आणि परवा न करता सतत कार्यमग्न रहातात.
       अहिंसेच्या सिद्धांताने त्याच्यामधील ताकत संपूर्ण जगाला दाखवून देणाऱ्या गांधीजींचे या ठिकाणी वर्णन करावे असे मला वाटते. कोणत्याही प्रकारचे शस्त्र हाती न घेता केवळ शांततेच्या मार्गाने अशक्य ते कार्य शक्य करून दाखवण्याची किमया या महान राष्ट्रपुरुष यांनी करून दाखवली. भारतातील जनतेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध प्रचंड मोठे मनुष्यबळ त्यांनी या साध्या भारतातून मिळवले.
        गणेशोत्सवाची सुरूवात करणारे लोकमान्य टिळक देखील आद्य प्रवर्तक असेच म्हणावे लागतील.
      कोणतेही आद्य प्रवर्तक हे धाडसी आणि धडाडीचे असतात प्रसंग समोर किंवा संकटा समोर हार मानणे ही त्यांच्या रक्तातच नसते.
        स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्री शिक्षणाला एवढा विरोध होत असताना देखील माघार न घेता महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. विशेष म्हणजे या कामांमध्ये त्यांना सर्वात जास्त सहकार्य मिळाले ते त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्याकडून. ज्यांच्या शिक्षणाला विरोध त्यांचेच शिक्षण त्यांच्याच मदतीने सुरू करणे हे केवढे मोठे विलक्षण कार्य आहे.
         गॅलेलियो, थॉमस अल्वा एडिसन, निकोला टेसला यांनी तर अगदी कठीण परिस्थितीतून जग बदलण्याचा निर्धारच जणू पूर्ण केला.
       अलीकडच्या काळातील असे ध्येयवेडे आद्यपवर्तक सांगायचे झाले तर जेफ बेझोस, एलोन मस्क, जॅक मा, बिल गेट्स यांची नावे घेता येतील.
          या सर्व आद्य प्रवर्तक यांनी आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम केले.त्या सर्वांच्या कामातून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे त्यांनी सदैव मानव समाजाच्या उत्कर्षासाठी व उन्नतीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करण्यावर जास्तीत जास्त भर दिला.
        ज्या गोष्टी केल्यामुळे माणसाचे कष्ट आणि श्रम वाचतील व त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान येईल अशा गोष्टी करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.

 
Pioneers have helped the world to Progress Essay


         Need is said to be the mother of invention. However, it is not uncommon for everyone to overcome the need. After the discovery, everyone happily uses it to save their own hard work. But they are the pioneers who bring this happiness to their place.
     Pioneers may look like ordinary people, but they are people who are driven by purpose and this particular madness. It is as if he has taken the challenge to change the whole world.
     They have to go through a lot of physical and mental hardships to find out, but under no circumstances do they want to give up.
       I think I must have to tell you about Gandhiji here . Gandhiji who showed his strength to the whole world through his theory of non-violence. The great national hero performed the trick of making the impossible possible only through peace without taking up any kind of weapon. He got huge manpower from this simple India against the British Empire to liberate the people of India from capitalism.
        Lokmanya Tilak, who started Ganeshotsav, is also said to be the pioneer. opioneers are brave and courageous.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने