1001marathiessay.blogspot.com
जून महिना सुरू झाला की शाळेत न जाण्यासाठी रडणारी मुले आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. खरे तर मी सुद्धा लहान असतांना असा बऱ्याचवेळा रडलो आहे. त्या वेळी मला सारखे वाटायच नको या शाळा, शाळा बंद झाल्या तर किती मज्जा येईल.
आत्ता चालू असलेल्या कोरोणा महामारी मुळे दीड वर्षापासून सर्व शाळा व कॉलेज बंद आहेत. शाळेत जाण्याकरिता मुलेही रडत आहेत. शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शिक्षण देखील मागे पडले. सर्व परीक्षा रद्द झाल्या. काही मुलांना हे चांगलं वाटत असेल पण जिज्ञासू वृत्ती असलेल्या मुलांसाठी ही खूप वाईट बातमी आहे . आताही तिसरी लाट लहान मुलांसाठी देखील घातक आहे. आता शाळा उघडणे अवघड वाटत आहे, कारण पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत .
शाळा बंद झाल्या तर काय होईल याचा अनुभव गेल्या दोन वर्षांपासून आम्ही घेत आहोत.
शाळा जर कायमच्या अशा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अंधकार झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही.
Good
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.