1001marathiessay.blogspot.com




|2020 हे वर्ष शाप की वरदान|

      आज रेडिओवर एक सुंदर गाणे ऐकू आले. गाण्याचे बोल फारच सुंदर होते .

" दिस जातील
 दिस येतील 
भोग सरल 
सुख येईल ."

     सध्याच्या कोरोणा काळातील परिस्थिती बघता हे गाणे अतिशय योग्य आणि परिस्थितीला साजेसे वाटत होते.
       2020 या वर्षाने सर्वांच्या डोळ्यांमध्ये अंजन घातले. माणसाच्या प्रगतीच्या मर्यादा या वर्षामध्ये अगदी स्पष्ट झाल्या. डोळ्यांनाही दिसू न शकणार्‍या या छोट्याशा विषाणूने संपूर्ण जगाच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लावल्या. मंगळ ग्रहावर राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या माणसांना पृथ्वीवरच व्यवस्थित निसर्गाची काळजी घेत जगण्याचे चांगले शिक्षण या 2020 वर्षाने दिले.
         या वर्षामध्ये सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या अधिक काळजीपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न केला. तर ज्यांना समाजहित व देश हिताचे भान नव्हते त्यांनी आपल्या बेजबाबदार वागणे काही सोडले नाही. अर्थात त्यांच्या या बेजबाबदार वागण्याची किंमत त्यांना स्वतःला व त्याबरोबरच त्यांची काही चूक नव्हती त्यांनाही भोगावी लागली.
        2020 या वर्षामध्ये सामाजिक आर्थिक व राजनैतिक इत्यादी कोणतेही क्षेत्र परिणाम झाल्यावाचून राहिले नाही.
        देशाच्या अगदी कानाकोपऱ्यात छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या गरीबा पासून वातानुकूलित आलिशान घरांमध्ये राहणाऱ्या श्रीमंतांपर्यंत सर्वांनीच या कोरोनाविषाणू चे दास्यत्व पत्करलेले दिसते. संसद भवनातील बड्या नेत्यांचाही  या विषाणूने जीव घेतला.
        बेरोजगारी, चोरी, मूल्यांचा ऱ्हास तर काही ठिकाणी मूल्यसंवर्धन या सर्व गोष्टी एकाच वेळी 2020 या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळाल्या. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे त्यांचे कर्तव्य बजावत असतानाच माणुसकीचे नवनवीन उदाहरणेही सगळ्यांसमोर प्रस्थापित केले.
        सर्व आरोग्य कर्मचारी, शिक्षण विभागातील शिक्षक, स्वच्छता कर्मचारी या सर्वांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता लोकांमध्ये जागृती करण्याचा व कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा घालण्याचा खूप प्रयत्न केला .
        कोरोनाविषाणू चे संकट 2020 या साला मध्ये मृत्यूचे तांडव करून गेले. अनेकांनी आपले जिवलग गमावले. तर या दुःखाच्या काळामध्ये कोण आपले सगेसोयरे आहेत याचीही प्रचिती आली. मानवाने कितीही प्रगती केली तरीदेखील मनुष्य निसर्गावर विजय मिळवू शकत नाही हे 2020 वर्षाने उदाहरणासह दाखवून दिले.
       आता तरी संपूर्ण मानव समाजाने जागे व्हावे व आपल्या वागण्याची पद्धत बदलावी. नाही तर अशी परिस्थिती निर्माण होईल की आपली इच्छा नसतानाही आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध जावे लागेल.
(|which topics can be included to write an essay on the topic India in 2020|)
  1. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.





Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने