1001marathiessay.blogspot.com
बालपणीचा काळ म्हणजे माणसाच्या जीवनातील स्वच्छंद पणाचा आणि आनंदाचा कळस होईल. बालपणा मध्ये जीवन फक्त आनंदाचा वास असतो. या काळामध्ये एकही शत्रू नसतो सर्वच मित्र असतात. हे या बालपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
बालपणालाच रोखठोक काळदेखील म्हणता येईल. बालपणा मध्ये आपल्या मनाला आवडेल ती गोष्ट " खूप आवडते "असं म्हणायची आणि जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट "अजिबात आवडत नाही "अशी म्हणायची कोणतीही लाज वाटत नाही. बालपण इतक स्वच्छंदी असते की, मनातील भावना कोणताही विचार न करता अगदी रोखठोकपणे व्यक्त केली जाते.
बालपणात आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी या भविष्यातील आपल्या व्यक्तिमत्त्वावर फार मोठा परिणाम टाकत असतात. प्रत्येकाच्याच वाट्याला आनंदमय आणि सुखमय बालपण येते असे अजिबात नाही. काहींच्या वाट्याला काट्याने पेरलेले बालपण देखील येते. असे असूनही बालपणाची गंमत अशी आहे की, आपल्या आयुष्यात काटे आहेत की फुले आहे हे देखील या काळात समजत नाही. समोरचे जे आणि जसे आहे त्याला भिडायचं घाबरायचं नाही इतका हा काळ निधडा असतो.
|बालपणीच्या कविता |...
बालपणीच्या कविता आजही जशाच्या तशा मनात घर करून आहेत. जेव्हा कधी बालपणा सारखे अल्हाददायक आनंदी वातावरण म्हणून होण्याचा प्रसंग येतो त्यावेळी आपोआपच ओठांवरून या कवितेच्या ओळी हळूच बाहेर येतात... नकळत...
बालपणीच्या कविता आज आठवतात त्यावेळी त्यांची यादी तयार होते.
- माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
- गे माय भू तुझे मी मी फेडीन पांग सारे
- केशवा माधवा
- खरा तो एकची धर्म
- येता तरी सुखे या
- रोज वाटे एका फुला
- आई मला छोटीशी बंदूक दे ना
- झुक झुक झुक आगीनगाडी
- मंदिरात अंतरात
- आई
- संतांचे अभंग
अशी फार मोठी यादी आपोआपच मनामध्ये तयार होते.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.