1001marathiessay.blogspot.com

ekant-vachaniy marathi lekh
ekant-vachaniy marathi lekh


    
       बऱ्याच दिवसांनी आज शांत बसण्यासाठी काही वेळ मिळाला. धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात स्वतःसाठी देण्यासाठी वेळ मिळणे म्हणजे उंबराचे फूल बघण्यासारखे आहे. थोडासा विचार करून बघा आणि आठवा की यापूर्वी कधी तुम्ही स्वतःसाठी वेळ दिलेला होता?तुम्हाला निश्चितच लगेच अजिबात आठवणार नाही. पण सध्या माणसाने स्वतःला वेळ देणे जवळजवळ बंदच करून दिलेले आहे.
          एकांतात असलेले सामर्थ्य एकांतात गेल्याशिवाय समजत नाही. एकांतात मनुष्य स्वतःशीच गप्पा मारू शकतो. आठवणी आणि अनुभवांच्या शिदोरीच्या तळाशी जाऊन खरे ज्ञान घेऊ शकतो. एखादी गोष्ट आपल्याला फक्त माहीत होणे म्हणजे ज्ञान होणे. त्या ज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने आपण करतो म्हणजे त्या ज्ञानाचे आकलन होणे. झालेल्या ज्ञानाचा उपयोग आणि उपयोजन माहित झाल्यानंतर ते कोणत्या गोष्टी मध्ये वापरावे,, चांगल्या किंवा वाईट हे ठरवणे म्हणजे विवेक होय.
        जीवन जगत असताना आपल्याला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. मुलाची , मुलीची, सासूची, सासर्‍याची , नोकराची, भावाची, बहिणीची, पतीची , पत्नीची. या विविध भूमिका पार पाडताना प्रत्येक भूमिकेशी संबंधित अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत. एकदा एकाच पुरुषाला किंवा स्त्रीला या सर्व जबाबदाऱ्या एकाच वेळी देखील पार पाडाव्या लागतात. जबाबदारी आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली स्वतःकडे स्वतंत्रपणे बघण्यासाठी वेळ आहे तरी कुणाला.
           जगातील अध्यात्मिक भौतीक वैज्ञानिक कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोहोचलेली माणसे तुम्ही बघा. प्रत्येकाला साक्षात्कार हा एकांतामध्ये झालेला आहे. मग तो साक्षात्कार ज्ञानाचा असो प्रेमाचा असो की भगवंताचा असो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ देत नाही तोपर्यंत तुम्ही खरे आनंदी आणि समाधानी होऊच शकत नाही.
  1. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  2. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  4. परीक्षा .. छान मराठी लेख.
  5. उपकार ...छान कथा वाचा.
  6. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  7.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  8. रम्य पहाट
  9. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  10. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  11. सुंदर विचार
  12. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  13. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने