www.upkarmarathi.com

     mala Pankh aste tar Marathi nibandh, प्रिय मित्रांनो आज आपण आपल्या हक्काच्या उपकार मराठी ब्लॉग वर मला पंख असते तर , मराठी निबंध बघूया.

|marathi nibandh|

      निसर्ग अनेक सुंदर गोष्टींनी नटलेला आहे. त्यातील एक अत्यंत सुंदर बाब म्हणजे पक्षी. आकाशात पक्षी जेव्हा उडू लागतात तेव्हा ते फारच सुंदर दिसतात. त्या सुंदर पक्षांना बघून माझ्या मनात एक दिवस प्रश्न आला मला पंख असते तर.. या प्रश्नाचे उत्तर शोधत असतानाच विचारांच्या एका दुनियेत गेलो आणि हा सुंदर निबंध तयार झाला मला पंख असते तर.. चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता बघुया एक सुंदर निबंध मला पंख असते तर यालाच तुम्ही मला उडता आले तर असे देखील म्हणू शकता.

मला पंख असते तर
मला पंख असते तर



मला पंख असते तर मराठी निबंध |
Mala Pankh aste tar Marathi nibandh

         मला पंख असते तर फारच मजा आली असती. हवे तिथे हवे  तेव्हा मला जाता आले असते. आमच्या गाडीचा पेट्रोल साठी होणारा खर्च बराच कमी झाला असता. कारण पप्पा मला दररोज संध्याकाळी गाडीवर फिरायला घेऊन जातात . त्यामुळे पेट्रोल खूप नास होते, पण मला पंख असते तर, मी स्वतःलाच पाहिजे तिथे फिरून आले असते आणि आमचे पेट्रोल आणि पैसे दोन्ही वाचले असते.

            शाळेत जाण्यासाठी मला खूपच कमी वेळ लागला असता. घरात एखादी वस्तू विसरून गेली असती तर मी शाळेतून पटकन घरी येऊन विसरलेली वस्तू घेऊन पुन्हा शाळेत गेले असते. माझी नुसती मज्जाच मज्जा झाली असती.
|मला उडता आले तर,mala udta aale tar marathi nibandh

          आपल्याकडे जसे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या देशांमधील पक्षी पाहुणे बनून येतात तसेच मी सुद्धा त्यांच्या देशांमध्ये पाहुणा बनून गेले असते. तिथल्या नद्या , डोंगर , तिथली माणस कशी आहेत? हे अगदी डोळे भरून बघितले असते. त्या सर्वांना भेटून आल्यानंतर घरात माझ्या मित्र मैत्रिणींना आणि आई-वडिलांना व भावंडांना तेथील गोष्टी मोठ्या आवडीने सांगितल्या असत्या. त्यांनाही त्या ऐकायला खुप मज्जा आली असती.

       मला पंख असते तर मला कधीच शाळेमध्ये शिक्षा होणार नाही. माझा अभ्यास अपूर्ण राहिला आणि शिक्षिका मला छडी देण्यासाठी आल्या तर मी लगेच खिडकीतून भुरकन उडून जाईल. त्यांचा तास संपल्यावरच वर्गात येईल! मग काय नुसती मज्जा.

mala udata aale tar

         मला पंख आले तर मी आकाशात उंच भरारी घेईल. ढगांच्याही वर जाऊन निरभ्र आकाशातून सूर्याचे दर्शन घेईल. आणि रात्रीच्या वेळी अगदी जवळून चांदोमामा बघायलाही मी अजिबात विसरणार नाही. 
        मला पंख असते तर मी गरुड पक्षासारखे उंच आकाशात जाईल आणि तिथून माझ्या प्रिय मित्रांकडे वेगाने झेप घेईल. मला भेटल्यानंतर त्यांनाही वाटेल की त्यांनासुद्धा पंख हवेत. मग मी त्यांना माझ्या पाठीवर देईल आणि उंच आकाशात फेरफटका मारून येईल. या सगळ्यामुळे आमची मैत्री अजुनच पक्की होईल.
marathi nibandh

         दिवसभर उडून  थकल्यानंतर रात्री झोपायला मात्र मी घरीच येईन. झोपताना सुरुवातीला पंखांमुळे थोडी अडचण वाटेल. पण म्हणतात ना "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है|"

    प्रिय मित्रांनो तुम्हाला हा मी लिहिला "मला पंख असते तर मराठी निबंध "कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचून आम्हाला खूप आनंद होतो.


या निबंधाचे खालीलप्रमाणेही नावे असू शकतात.

१) |मला उडता आले तर
२) |मला उडण्याची शक्ती मिळाली तर
३) |मी उडु शकली तर 
४) |mala udata aale tar

खालील निबंध वाचायला विसरू नका.

  1. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  2. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  4. परीक्षा .. छान मराठी लेख.
  5. उपकार ...छान कथा वाचा.
  6. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  7.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  8. रम्य पहाट
  9. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  10. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  11. सुंदर विचार
  12. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने