1001marathiessay.blogspot.com

Essay in Marathi on trip to wildlife sanctuary



प्राणी संग्रहालयाला भेट 
|Essay in Marathi on trip to wildlife sanctuary

      सुट्टीचा दिवस असला की घरातील आम्ही सर्वजण पण कुठेतरी फिरायला जातो आणि सुट्टीचा मनमुराद आनंद लुटतो. मे महिन्याच्या सुट्ट्यामध्ये  आम्ही पुणे जिल्ह्यात असणाऱ्या सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचे ठरवले.
            अष्टविनायकांपैकी पुण्यामध्ये असणार्‍या सर्व गणपती मंदिर यांना भेट दिली व तेथील गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतल. मग आम्ही निघालो कात्रज येथे असलेल्या प्राणीसंग्रहालयाच्या दिशेने.
          प्राणीसंग्रहालयात जाण्याचा माझा पहिलाच योग होता. मनामध्ये खूप आनंद होता की आता भरपूर प्राणी व पक्षी बघायला मिळणार. इच्छित स्थळी पोचल्यावर अंतर त्याठिकाणी भलामोठा गेट बांधलेला होता. वरती सुंदरपैकी प्राणी आणि पक्ष्यांची चित्र काढलेले होते. त्याबरोबरच आलेल्या सर्व दर्शकांचे व निसर्गप्रेमी यांचे हार्दिक स्वागत असेही लिहिलेले होते.
          तिकीट काढून आत गेल्यानंतर एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा अनुभव मला आला. वेलींच्या सुंदर कमानी  तयार केलेल्या होत्या त्याला लागलेली जाई-जुई, मोगऱ्याची फुले सगळीकडे सुगंध उधळत होती. त्या वेलींच्या कमानीतून आत प्रवेश करताना असे वाटत होते की , आम्ही निसर्ग देवतेच्या दर्शनासाठी जात आहोत आणि आमच्यावर पुष्पांचा वर्षाव होत आहे.
         पुढे जात असताना सुरुवातीलाच एका मोठ्या  घराएवढ्या   पिंजर्‍यात एक पांढरा मोर नजरेस पडला. मी पहिल्यांदाच सफेद रंगाचा मोर बघितला होता. माझा लहान भाऊ मोठ्याने ओरडला,' आई मोर म्हातारा झाला आहे बघा!' त्याच्या या बोलण्यावर सगळेजण खळखळून हसू लागलीत. मधेच कुठून तरी कोकिळेचा मधुर स्वर ऐकू येत होता. आंब्याच्या झाडांना आलेल्या मोहराबरोबरच आमचे मनही मोहरून जात होते. 
         असेच अनेक पक्षी बघत आम्ही पुढे पुढे जात होतो. मग अचानक आम्ही एका हरणांच्या कळपाजवळ थांबलो. नाही आता लोकांच्या सहवासाला तयार झालेले होते आम्ही जवळ गेल्यावरही ते पळाले नाही . उलट दुरून आमची गंमत बघत होते. थंडीच्या दिवसात अंगावर जसे काटे येतात तसेच भलेमोठे काटे असणारे साळींदर देखील बघितले त्याच्या संपूर्ण अंगावर  टोकदार  सुयांसारखे काटे होते.
      सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही त्याठिकाणी भलामोठा पट्टेदार भुरा वाघ बघितला. वाघ बघून अंगाचा थरकाप उडाला. तो अगदी शांतपणे बसलेला होता. मी  अगदी नजर रोखून त्याच्याकडे बघत होतो. मनात म्हटले या वाघाची डरकाळी किती भयानक असेल. माझ्या मनातील बोलणे ऐकू गेल्यासारखा वाघाने प्रचंड डरकाळी फोडली. आमच्या जगातील सर्व अवसान गळून पडले . हातपाय थरथर कापू लागले.
         वाघाला मी इतका घाबरून गेलो की पुढचे प्राणी बघायचे नाही असे ठरवून टाकले. पण घरच्यांच्या आग्रहामुळे मी इतर मगर, सुसर, विविध प्रकारचे साप कासव इत्यादी प्राणी बघितले.
       सर्व प्राणी बघून झाल्यानंतर आम्ही छान पैकी जेवणाचा कार्यक्रम उरकून घेतला आणि मनामध्ये आठवणींचा खजिना घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघालो.
.................................................

     प्रिय मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही असा एखादा अनुभव असेल तर ते देखील नक्की आम्हाला सांगा. ते वाचायला आम्हाला खूपच आनंद होईल.

खालील निबंध वाचायला अजिबात विसरू नका.

  1. महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.

हे वाचायला अजिबात विसरू नका 

  1. चांदण्या रात्रीतील नौकाविहार, मी केलेला नौकाविहार.
  2. माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
  3. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  4. सुंदर मराठी सुविचार
  5. माझी अभयारण्यास भेट. 
  6. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  7. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 

      प्रिय मित्रांनो तुम्हाला हे निबंध आणि लेख कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा.










Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने