1001marathiessay.blogspot.com
प्रिय मित्रांनो आपल्या देशाचे रक्षण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सैनिक करत असतात. स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता दिवस-रात्र न थकता सैनिक आपले कर्तव्य पार पाडत असतात. सीमेवर असलेली कठीण परिस्थिती आपल्या मजबूत खांद्यावर ते पेलत असतात.
सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून उभे असतात त्यामुळे देशातील जनता आणि आपण सगळे बिनधास्तपणे झोप घेऊ शकतो. आजच्या निबंधा मध्ये आपण स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत जाणून घेऊया. या निबंधातील मुद्द्यांचा उपयोग तुम्ही| सैनिकाचे मनोगत किंवा |शौर्यपदक विजेत्या सैनिकाचे मनोगत, या निबंध साठी सुद्धा करू शकता. चला तर मग बघुया एक छानसा निबंध सैनिकाचे मनोगत.
आपण पुढे हे दोन्ही निबंध वाचणार आहोत.
|स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत.
|शौर्य पदक विजेता सैनिकाचे मनोगत.
|शौर्यपदक विजेत्या सैनिकाचे मनोगत
| सैनिकाचे मनोगत मराठी निबंध |
| Sainikache manogat|
आमच्या शाळेमध्ये 26 जानेवारी निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा सैनिकांच्या हस्ते करण्याचे ठरलेले होते. आमच्या गावातील सदाशिव भाऊ हे सैन्यामध्ये कार्यरत आहेत. ते या कालावधीमध्ये गावी आलेले असल्यामुळे त्यांच्या हस्तेच ध्वजारोहन करण्याचे ठरले होते.
नियमाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर सदाशिव भाऊ बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रुबाबदार होते. शरीर यष्टी अगदी पैलवानासारखी मजबूत होती . ते सरळ उभे राहून आपल्या खड्या आवाजात बोलू लागले.
. |सैनिकाचे मनोगत
या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना आणि बालगोपाल यांना मी वंदन करतो. या भारत मातेच्या रक्षणासाठी मी सीमेवर सदैव तैनात असतो त्या भारत मातेला आणि या राष्ट्रध्वजाला वंदन करून मी माझे दोन शब्द तुमच्या समोर सांगत आहे .ते तुम्ही शांतपणे ऐकावे.
मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की , या भारतमातेसाठी मला जगण्याची संधी मिळाली. जगतात तर सर्वच , परंतु या आयुष्यात आपण कोणते महान कार्य करतो . यावरच आपल्या जीवनाची सार्थकता ठरलेली असते. आज आपण माझ्या हस्ते जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला त्यामुळे मी खरोखर भरून पावलो आहे.
तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मला बोलवून मला जो मान दिला त्यामुळे सीमेवर आम्ही जो कष्ट आणि त्रास सहन करतो त्याचे काहीतरी चीज झाल्यासारखे वाटते. सर्व सैनिकांबद्दल याठिकाणी तुम्ही जो आदर आणि आत्मीयता व्यक्त केली त्यामुळे खरोखरच आमचे दुःख किंवा त्रास कमी झाल्यासारखे वाटले. आम्ही ज्या लोकांसाठी रात्रंदिवस खडा पहारा देतो त्या देशबांधवांना आमच्या विषयी असलेली ही आपुलकी बघून खरोखर धन्य झालो.
.|सीमेवरील जवानाचे मनोगत
सियाचीन सारख्या भागामध्ये वजा तापमानात रक्त गोठवणाऱ्या थंडीत बर्फ तुडवताना होणारा त्रास सहन न होणारा असतो. माझ्या हातात सतत बंदूक व पाठीवर खाद्यपदार्थ आणि दारूगोळा घेऊन शत्रूच्या वाईट दृष्टी पासून भारत मातेच्या सीमेचे रक्षण करताना जन्माचे सार्थक झाल्याचे वाटते.
सीमेवर कर्तव्य बजावत असताना घरच्या माणसांची आठवण तर येतेच. पण मोहात न अडकता कर्तव्याला अग्रक्रम देत त्याठिकाणी आम्ही हिमालयासारखे अडून उभे असतो. तुम्ही या ठिकाणी जे प्रेम दाखवलं भारत मातेविषयी जो मातृभाव दाखवला त्यामुळे मनात अनंत ऊर्मी उसळून आलेल्या आहेत.
देशसेवा ही फक्त सीमेवरच करता येते असे नाही , तर आपण आपले गाव, देश स्वच्छ ठेवून देशसेवाच करू शकतो. त्यामुळे आपले घर , गाव स्वच्छ ठेवा आणि आरोग्य सांभाळा. एवढे बोलून, मी आता तुम्हा सर्वांना वंदन करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय भारत.
| sainikache manogat marathi nibandh
प्रिय वाचक मित्रांनो आता आपण एका सैनिकाचे मनोगत निबंध बघितला त्यानंतर आपण आता दुसरा निबंध बघूया त्या निबंधाचे नाव आहे |शौर्यपदक विजेता सैनिकाचे मनोगत
|शौर्यपदक विजेत्या सैनिकाचे मनोगत
shaurya padak vijeta sainikache manogat
नमस्कार मित्रांनो मी सैनिक बोलतो आहे . नुकतेच मला शौर्यपदक मिळाले ,त्यामुळे तुम्ही मला शौर्य पदक विजेता सैनिक असे म्हणतात आणि त्याबद्दल या ठिकाणी माझा सत्कार समारंभ तुम्ही आयोजित केला आहे म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे.
मला पदक का आणि कसे मिळाले हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच हे मला माहित आहे. मी तुम्हाला मला शौर्यपदक का मिळाले याविषयी सांगणार आहे.झाले असे की भारत-पाकिस्तान सीमेवर माझी नियुक्ती झालेली होती. तो दिवस आजही माझ्या अंगावर शहारे निर्माण करतो. आमच्या त्या तळावर आहे आम्ही सुमारे 21 सैनिक होतो. रात्रीची वेळ होती कुट्ट अंधार होता. आम्ही जेवण करून थोडीशी विश्रांती घेत होतो. इतक्यात मला सीमेजवळ काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवले.
|मी सैनिक बोलतो आहे मराठी निबंध
मी उठून तिकडे गेलो तितक्यात हालचाल थांबली. मग मी परत छावणीत आलो आणि माझ्या सहकाऱ्यांना सांगितले. छावणीतील सगळे सहकारी तयार झाले. पण आम्ही असे दाखवले कि ,आम्हाला काहीही माहीत नाही. बाकीची सैनिक मागच्या बाजूने गेले. आम्ही बंदुकी घेऊन तयार होतो.
तितक्यात मागच्या बाजूने गेलेल्या सैनिकांचा सुगावा आतंकवाद्यांना लागला . आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. आम्ही तयार होतो. माझ्या जवळच असलेल्या माझ्या जोडीदाराला गोळी लागली. त्याच्या छातीत गोळी लागलेली होती त्यामुळे त्यांन लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जाणे अत्यंत गरजेचे होते.
सुमारे दहा आतंकवादी होते त्यातील एका आतंकवाद्याला मी गोळी मारली आणि तो ठार झाला. मलाही पायात एक गोळी लागलेली होती. मी देखील मला जोडीदाराला दवाखान्यापर्यंत घेऊन जायचे होते. मी त्याला खांद्यावर घेतले. परंतु खोलीतून बाहेर जाणे शक्य नव्हते कारण बाहेर आतंकवादी दबा धरून बसलेले होते.
यावेळी मला मदत केली ती आमच्या बाहेर गेलेल्या सैनिकांनी. त्यांनी आतंकवादयांवर एक सारखा गोळीबार चालू ठेवला. तितक्यात एक आतंकवादी खोलीची दार उघडून हाताला. मी पटकन खांद्यावरच्या जोडीदाराला खाली ठेवले आणि समोर आलेल्या आतंकवाद्याला गोळी घातली. या झटापटीत माझ्या दुसऱ्या पायाला देखील गोळी लागली.
एका खांद्यावर बंदुक आणि एका खांद्यावर जखमी झालेला माझा सहकारी यांना घेऊन मी गाडी जवळ आलो. त्याला गाडी घेऊन मी गाडी चालवू लागलो. सहकाऱ्याला दवाखान्यात सोडून मी पुन्हा आलो. सोबत जास्तीचा दारूगोळा आणला होता. आता मात्र मी दुसऱ्या बाजूने गेलो त्यामुळे आतंकवाद्यांवर मी सरळ हल्ला चढवला आणि अजून दोन आतंकवाद्यांना यमसदनी पाठवले. याच वेळात माझ्या इतर सहकारी देखील अत्यंत शिताफीने उरलेल्या आतंकवाद्यांना कंठस्नान घातले.
माझ्या शरीरातून बराच रक्तस्त्राव झालेला होता त्यामुळे मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडलो. माझ्या सहकाऱ्यांनी मला दवाखान्यात आणले व काही वेळाने मला जाग आली. सुदैवाने आमच्यातील एकाही जवानाला प्राण द्यावे लागले नाही.
काही दिवसांनी मी पुन्हा ड्युटीवर जॉईन झालो.
प्रिय मित्रांनो आपण आत्ता या ठिकाणी दोन निबंध बघितले |सैनिकाचे मनोगत आणि |शौर्य पदक विजेत्या सैनिकाचे मनोगत तुम्हाला हे निबंध कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा.
या निबंधाची खालीलप्रमाणेही नावे असू शकतात.
१. |सैनिकाचे मनोगत
२.|जवानाचे मनोगत
३.|सीमेवरील जवानाचे मनोगत
४. |मी सैनिक बोलतो आहे मराठी निबंध
५.|शौर्यपदक विजेत्या सैनिकाचे मनोगत
प्रिय मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा . तुमच्या मनातही अजून काही भावना असतील तर त्या देखील तुम्ही नक्की व्यक्त करा.
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
- रम्य पहाट
- दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी/Diwali status Marathi
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
- माझे घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.