1001marathiessay.blogspot.com

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा
          - कवी कुसुमाग्रज

         दैनंदिन जीवन जगत असताना अडचणी तर सर्वांनाच येतात. संपूर्ण आयुष्य जगताना एकदाही अडचणच निर्माण झाली आहे असा व्यक्ती सापडणे जवळ - जवळ अशक्य आहे.
         ज्यावेळी व्यक्ती संकटात सापडतो, तेव्हा काहीजण स्वतः हरून जातात तर काही जण  संकटांना हरवून देतात . अशाच एका ध्येय धुरंदर व्यक्तीविषयी कुसुमाग्रज या कवितेमध्ये सांगतात.



         खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीच्या पाण्यात खूप वाढ झाली व नदीचे पाणी एका व्यक्तीच्या घरांमध्ये शिरले. घरामध्ये सर्व संसाराचे साहित्य भांडीकुंडी या नदीने वाहून नेले. असे असताना देखील ती व्यक्ती नदीला माहेरवाशिन पोरीची उपमा देते. माहेरवाशिन मुलगी ज्यावेळी घरी असते तेव्हा ती संपूर्ण घरांमध्ये मोठ्या आनंदाने खेळत आणि बागडत असते .जुन्या आठवणींना कवटाळत असते. अगदी तशीच नदी घरात शिरली आणि घरात सर्वत्र पाणी झाल्यानंतर स्वतःबरोबर सगळे वाहून घेऊन गेली तरीदेखील आपले धैर्य गमावले नाही व हिंमत सोडली नाही.
       घराच्या भिंती खचल्या , चुल विझलेली होती . होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं . असले तरी देखील या पीडित व्यक्तीने स्वतःवरचा असलेला विश्वास अजिबात गमावलेला नव्हता कठीण आतल्या कठीण परिस्थितीमध्ये देखील स्वतःच्या सामर्थ्याने पुन्हा उभे राहणे त्याने पसंत केले आहे.
      आयुष्य आपल्याला सतत घडवत असते आपल्याला ठेच लागून आपण पडत असतो , परंतु हे आपल्यावर निर्भर असते की आपण त्या परिस्थितीतून कोणत्या पद्धतीने बाहेर निघतो. आपल्याला उठायचे आहे की नाही . परिस्थितीचे भांडवल करून आपले अपयश लपवायचे आहे का हे ज्याचे त्याने ठरवावे.
         त्याकरिता कठीण परिस्थितीचा सामना करत असताना तो गृहस्थ आपल्या पत्नीच्या साथीने पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. नदीचे पाणी आता ओसरले आहे पण घरात साचलेला चिखल गाळ काढतो आहे. परिस्थितीशी लढत असताना त्याला थोडासा एकटेपणा वाटला. व थोडीशी सांत्वना आणि मार्गदर्शक , मनाला उभारी देणारे शब्द हवेत म्हणून तो  आपल्या शिक्षकांकडे जातो.
      शिक्षकांना सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर शिक्षक मदतीसाठी त्याला थोडेसे पैसे देण्याची तयारी दाखवतात व  खिशाजवळ हात नेताना दिसताच तो तरुण सांगतो सर मला पैसे नको आहे मला फक्त थोडा एकटेपणा वाटला म्हणून थोडीशी मनाला उभारी मिळणारे शब्द तुमच्याकडून ऐकावेत यासाठी मी तुमच्या जवळ आलेलो आहे. माझा संसार जरी मोडला पडलेला आहे तर देखील माझा कणा मोडलेला नाही.तुम्ही फक्त मला लढा    लढ म्हणा म्हणजे मला प्रेरणा मिळेल व मी पुन्हा नव्याने माझा मोडलेला संसार उभा करेन.



.............  धन्यवाद.


          प्रिय मित्रांनो, तुम्हाला हा काव्यपंक्तीचा विस्तार कसा वाटला? हे कमेंट करून मला नक्की सांगा. तसेच यात काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्याही नक्की सांगा . तुमच्या सूचनांचे आम्ही स्वागतच करू. खूप खूप धन्यवाद.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने