1001marathiessay.blogspot.com
भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणू काठी
.... संत तुकाराम महाराज.
संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस होय. आपल्या त्याग व वैराग्यभावनेने यांनी समस्त मानवजातीच्या हृदयात अभंग स्थान मिळवलेले आहे. कृतीला जर चारित्र्याची जोड असेल तर ती कृती अजरामर होते. तुकाराम महाराजांच्या अंगी असलेला रोखठोकपणा हे त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
अभंगातील या ओळीतून तुकाराम महाराज विष्णुदास म्हणजे वैष्णव भक्त अथवा वारकरी यांच्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत
आहेत.
संत, ऋषी ,मुनी म्हटले म्हणजे फक्त शांत सुस्वभावी आणि लोकांनी कितीही त्रास दिला तरी देखील शांतपणाने सहन करणारी व्यक्ती .असा अर्थ तुकाराम महाराजांना अजिबात मान्य नाही. याउलट तुकाराम महाराज असे म्हणतात की आम्ही विष्णू दास मेनापेक्षाही मऊ आहोत परंतु प्रसंगी इंद्राच्या वज्रालादेखील भेदून जाऊ
जो आमच्याशी चांगला वागेल त्याच्यासाठी आम्ही खूपच चांगले आहोत, आमच्याशी प्रेमाने वागणाऱ्या माणसाला आम्ही कोणतीही मदत करण्यासाठी सदैव तयार असतो. एखाद्याला मदत करायचे ठरवले तर आम्ही लंगोटी काढून सुद्धा देऊन परंतु आमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला फटके द्यायला देखील आम्ही मागेपुढे बघत नाही.
थोडक्यात पण चांगली मांडणी केली सर.तुकोबारायांचा रोखठोकपणा चांगला अधोरेखित केला आहे.
उत्तर द्याहटवाCOorect
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.