1001marathiessay.blogspot.com
|बसस्थानकावर एक तास मराठी निबंध|
जुलै महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले होते पावसाने नुसताच जोर धरला होता. पावसाची रिप रिप सतत चालू होती. कालच रविवार संपून नविन आठवड्याला सुरुवात झालेले होते. सोमवारी शाळेत जाण्यासाठी बसस्थानकावर आलेलो होतो. मी परगावी शिक्षणासाठी जात असल्याने मला दररोज ये - जा करणे भागच होते.
रविवारच्या आरामानंतर सोमवारी शाळेत जाण्यासाठी मनात एक उत्साह निर्माण झालेला होता. बस स्टैंड वर पोहोचलो तेव्हा सगळीकडे प्रवाशांची रेलचेल दिसत होती. वरुणराजामूळे बसस्थानकावर चिखलाचे राज्य पसरले होते . ठीकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले होते. डबके चुकवत प्रवासी रस्ता काढत पुढे पुढे जात होते.
मी प्रवाशांसाठी बांधलेल्या मोठ्या इमारती जवळ उभा होतो. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांवर नजर टाकत मी माझ्या गाडीची वाट बघत उभा होतो. बसस्थानकावर सर्वत्र अत्यंत सुंदर नक्षीदार पद्धतीची फरशी बसवलेली होती. त्या फरशीवर मात्र प्रवाशांची ये-जा होऊन चिखलाची वेगळीच नक्षी तयार झालेली होती.
पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या डबक्याजवळ एक लहान मुल आईचा हात धरून जात होते , परंतु ते डबक्यात पाय टाकायला घाबरत होते. डबक्यात आभाळाचे प्रतिबिंब पडलेले होते त्यामुळे त्या मुलाला असे वाटायचे किि, डबक्यात पाय टाकल्यावर मी खोल पाण्यात बुडून जाईल. मला फार गंमत वाटत होती.
बस स्थानकाच्या समोर मोठे मैदाना सारखे पटांगण होते त्या पटांगणात येणाऱ्या गाड्या रांगेत उभे राहायच्या किंवा वळून बाहेरच्या दिशेने जायच्या. पटांगणाच्या चारही बाजूंना वेगवेगळी दुकाने होती. त्याठिकाणी एक छोटीशी टपरी होती त्या टपरीवर इतर दुकानांच्या मानाने गर्दी जास्त दिसत होती. गुटखा, तंबाखू घेणाऱ्यांची गर्दी झालेली होती. तसेच नियमित अपडाऊन करणारे काही प्रवाशीही तिथे थांबलेले दिसले. सुटाबुटात असणारे ते प्रवासी बघून ते नोकरदार आहेत हे मला समजले.
तितक्यात मळके कपडे घातलेला एक तीस-पस्तीस वर्षाचा तरुण मनुष्य माझ्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाकडे हात पसरून पैसे मागू लागला. माझ्या शेजारी उभ्या असणाऱ्या माणसाने त्याला सांगितले की,' तू भिक का मागतो आहेस? तू तर चांगला तरुण आणि धडधाकट आहेस तुला काही काम करता येत नाही का? चल निघ इथून पैसे नाहीत माझ्याकडे." भिक मागणारा तो तरुण काही न बोलताच निघून गेला. माझ्या शेजारी उभ्या असणाऱ्या माणसाचे बोलणे मला पटले , कारण की तो भिकारी खरोखरच अगदी सशक्त दिसत होता. त्याचा दारूचा वासही येत होता.
लोक चांगले आरोग्यदायी असून देखील अशी भीक का मागत असतील ?असा विचार माझ्या मनात सारखा येत होता. असा विचार डोक्यात चालू असतानाच माझी बस त्या ठिकाणी आली. मग मी शाळेत जाण्यासाठी बस मध्ये बसलो. बस बसस्थानकातून बाहेर निघाली आणि माझ्या डोक्यात शाळेविषयीचे विचार येऊ लागले.
प्रिय मित्रांनो तुम्हाला हा मी लिहिलेला बस स्थानकावरील एक तास निबंध नक्की कसा वाटला? हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हालाही काही अनुभव असेल तर तो देखील आम्हाला सांगा. तुमचे अनुभव ऐकायला आम्हाला खूप आवडेल.
हा निबंध लोक खालील नावानेही शोधतात .
- |बसस्थानकावर एक तास मराठी निबंध
- |बस स्टॉप वर एक तास मराठी निबंध
- |Marathi essay on "one hour on bus stand"
- |बस स्थानकावर एक तास मराठी निबंध
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
- शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
- शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
- रम्य पहाट
- दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी/Diwali status Marathi
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.