माझा आवडता लेखक मराठी निबंध
My favourite writer Marathi essay

       मराठी वांग्मय विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध झालेले आहे. यामध्ये अनेक लेखकांनी व साहित्यकार यांनी मोलाची भर घातलेली आहे . त्यापैकीच  अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे वि. स. खांडेकर. खांडेकरांनी मराठी भाषेला आपल्या अलौकिक लेखन कौशल्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

         " नभीच्या तारकांनाही
 लाजवतात कधी
 दिव्यांच्या ज्योती......
धारदार शब्दांपुढे 
बोथट होतात 
      तलवारीच्या पाती......
पावसाचे थेंब
 टपकतात नि मिटतात
पण जन्माला येतो 
फक्त एखादाच मोती....."

    असेच जे मोती मराठी साहित्य भूमीतून उदयास आले . त्यातील महत्त्वाचे नाव म्हणजे वि. स.खांडेकर. त्यांचे पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर असे होते. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली येथे झाला.  खांडेकरांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर असे होते परंतु ते ज्या वेळी दत्तक गेले त्यावेळी त्यांचे नाव बदलून विष्णू सखाराम खांडेकर असे झाले.
      वि. स. खांडेकर यांचा जन्म सांगलीत झालेला असला तरी देखील त्यांची कर्मभूमी मात्र वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा ही होय. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीने मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला.



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने