upkarmarathi.com

थकवा

       आज जरा अस्वस्थ झाल्यासारखं वाटत होतं. बराच थकवा आलेला होता. गाडीवर खूप प्रवास करून खांदे आणि मांड्या फारच दुखत होते. अगदी शांततेने पडून राहिलो. शरीर शांत होतं परंतु मन मात्र कधी शांत राहता का?
       मला वाटतं जगात असा एकही माणूस नाही की ज्याला कधीतरी थकवा जाणवला नाही किंवा तो थकलेला नाही . थकवा आल्यानंतर आराम करायला देखील फार मजा येते. थकल्यासारखं आनंदाचंही आहे . प्रचंड दुःख झाल्यानंतर ज्यावेळेस आनंदाचा एखादा क्षण आयुष्यात येतो आकाश ठेंगणे झाल्यासारखं वाटत.


       थकवा अनेक प्रकारचा असतो. शारीरिक , मानसिक, सामाजिक,अध्यात्मिक, वैचारिक. एखाद्या वृद्ध दंपत्याकडे  बघा जन्मभर मुलाबाळांसाठी ,त्यांच्या लग्नासाठी ,पोटाचा खड्डा भरण्यासाठी सतत केलेली धावपळ आणि त्याच धावपळीने थकलेलं त्यांच शरीर. थकवा म्हणजे काय हे दाखवून जात. जन्मभर यांच्यासाठी धावपळ केले आणि हे शरीर थकलं तेच या शरीराचा तिरस्कार करू लागतात. त्यांना घरात म्हातारी माणसे नकोशी वाटतात. चार मुलांना छोट्या घरात  संभाळणारा  बाप आणि आई ोठ्या घरांमध्ये राहणार्‍या चार मुलांनाही जड होऊन जातात. ही खरोखरच फार मोठी गंमत म्हणावी लागेल.
        थकवा आल्यानंतर अनेक आवडीच्या गोष्टीही नकोशा वाटू लागतात. थकल्यानंतर ज्यावेळी एखाद्या लहान गोंडस बाळाला आपण जवळ घेतो किंवा त्याच्या पुढे बघतो तर थकवा कुठल्या कुठे पळून जातो अनुभव तर सर्वांनी घेतला असेलच. याचाच अर्थ असा होऊ शकतो की थकवा कितीही आलेला असला तरी देखील लगेच ऊर्जेचा संचार करता येऊ शकतो. फक्त ते कारण आणि ते साधन तितकं ताकदवान व निरागस देखील असलं पाहिजे.



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने