1001marathiessay.blogspot.com
| बाल साहित्यामध्ये जादूई कथांचे महत्व
| Essay on why magic stories are important
मुलांच्या विकासामध्ये गप्पागोष्टी गाणे या सर्वांचा फारच महत्त्वाचा भाग असतो. सर्वच वयोगटातील मुलांना आणि प्रौढ माणसांना देखील गोष्टी ऐकायला खूपच आवडते. कितीही टेन्शन मध्ये आपण असलो तरीदेखील गोष्ट ऐकताना मन गुंग होऊन जाते.
मोठ्यांची अशी अवस्था असते तर लहान मुलेही मनाने निर्मळ आणि निरागस असतात त्यांना गोष्ट आवडणे अगदी स्वाभाविकच आहे गोष्ट न आवडणारा बालक म्हणजे जवळजवळ अशक्य गोष्ट आहे.
ज्या कल्पना प्रत्यक्ष आयुष्यामध्ये घडणे जवळपास अशक्य असते त्या कल्पना जादुई गोष्टींमध्ये अगदी सहज घडतात. त्यामुळेच मनातील कल्पनांना अधिकच वाव मिळतो व नवनवीन कल्पना सुचू लागतात अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला फारच चालना मिळते आणि मुलांच्या कल्पनाशक्तीच्या मर्यादा या अनंत , अगाध असतात. त्यांना जितकी चालना मिळेल तितक्या त्या अधिकच बहरत जातात. त्यातूनच नवनवीन संशोधक, शास्त्रज्ञ तयार होण्याची खरी सुरुवात होते.
गडचिरोली ,चंद्रपूर ,नंदुरबार, धुळे जळगाव ,गोंदिया या जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आदिवासी जमाती राहतात. या जमातींचे वास्तव्य बहुदा डोंगरदऱ्यांमध्ये व जंगलांमध्ये असते. निसर्ग ताच हे लोक अगदी काटक व निरोगी असतात. त्यांच्या शारीरिक व मानसिक मर्यादा या फारच उच्च प्रतीच्या असतात असे निदर्शनात आले आहे.
त्यांची स्थानिक भाषा ही प्रमाणेच भाषांपेक्षा वेगळे असल्यामुळे त्या भाषेत बालसाहित्य उपलब्ध आहे या गोष्टीमुळे ज्यावेळेस ही मुले पहिली, दुसरीत प्राथमिक शिक्षण घेत असतात त्यावेळी त्यांची इतर मुलांपेक्षा अधिक तयारी करून घ्यावी लागते.
जादुई गोष्टी मुळे त्यातील विविध पात्र मुलांना अगदी जवळचे वाटतात. मुलांच्या एखाद्या कल्पनेशी समानता असणारे पात्र मुलांना आपण स्वतः असल्याचे देखील बऱ्याचदा वाटते. त्यातून एक आत्मीय समाधान मुलांना मिळते.
जादुई गोष्टी मधील बर्याचश्या कल्पना जसे की उडणारा झाडू , बोलणारे प्राणी , धावणारे झाडे अशा गोष्टी , दुष्ट प्रवृत्ती चे माणसे चांगल्या प्रवृत्तीची माणसे, या संकल्पना नकळतच ते शिकून जातात.
जादुई गोष्टींमुळे मुले कल्पनेच्या वेगळ्याच गावाची सफर करतात. दैनंदिन जीवनात ते जे बघतात त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी त्यांना अशा गोष्टींमध्ये बघायला मिळतात. जादुई गोष्टींमुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी घडते की मुलांना "असे झाले तर काय होईल?" या त्यांच्या उपजत प्रश्नाचे उत्तर बर्याचदा मिळतेे.
जीवनातील प्रत्येक घटनेकडे सकारात्मक आणि वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.
त्यामुळे मुलांना भरपूर जादुई कथा ऐकवा आणि बघु द्या. सध्याच्या काळात तर आपले बरेचसे काम सोपे झाले आहे विविध प्रकारचे कार्टून्स आता गोष्टीरूपाने सहज बघण्यासाठी उपलब्ध होतात. त्यातही आपली मुले कोणत्या प्रकारचे कार्टून्स बघतात यावर विशेष लक्ष ठेवा. केवळ मारधाड व चुकीचे भाषा बोलणारे अपशब्द वापरणारे कार्टून्स मुलांना बघू देऊ नका.
एवढ्या लिखाणातून तुम्हाला जादुई कथांचे मुलांच्या आयुष्यामध्ये आणि विकासामध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे , हे नक्की लक्षात येईल पण मुलांनी किती वेळ टीव्ही किंवा डिजिटल माध्यम बघावे याचेही तुम्ही योग्य नियोजन करून द्या.
आता तरी तुम्हाला गोष्टींचे महत्त्व समजले असेल असे मला वाटते आणि अजूनही काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी अजून यावर जास्त लिखाण करण्याचा प्रयत्न करेल.
............ समाप्त........
लोक खालील प्रमाणे शोध घेतात.
- |Why is fantasy important?
- |Why is fantasy important in children literature?
- |Importance of fantasy in fiction
- |Why are storage important to human .
- माझी अभयारण्यास भेट.
- चहा बोलू लागला तर. किंवा मी चहा बोलतो आहे. किंवा चहा चे मनोगत.chaha
- ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे
- शिक्षक दिन ,varnanatmak nibandh
- माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
- पंडित नेहरुंचे मुलास पत्र
- माझे गाव
- स्वामी विवेकानंद
- झाडे लावा झाडे जगवा
- मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat in marathi nibandh
- दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
- मी पाहिलेला अपघात
- माझी शाळा .
- महात्मा ज्योतिबा फुले
- माझा भाऊ
- आमचे वनभोजन
- माझे वडील मराठी निबंध
- मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
- मी पाहिलेला अपघात
- निसर्गाचे मनुष्यास पत्र
- माझे आवडते संत एकनाथ महाराज
- जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
- माझा बस प्रवास/maza bus pravas
- माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
- पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
- सुंदर मराठी सुविचार
- छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
- स्वामी दयानंद सरस्वती
- राजा राममोहन रॉय
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.