upkarmarathi.com

| माझा आवडता महिना  श्रावण 

| shravan mahina


     मराठी बारा महिन्यांमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे . श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या वर्षी म्हणजेच सण 2021 सालामध्ये श्रावण महिना 9 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. आणि त्याच्या चाहुलीचे संकेत निसर्गाने द्यायला सुरुवात केली आहे. वातावरणामध्ये बदल जाणवायला लागलेले आहेत.

श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये, का विशेष आणि खास आहे, श्रावण
श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये, का विशेष आणि खास आहे, श्रावण 

| माझा आवडता महिना मराठी निबंध 

श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये, का विशेष आणि खास आहे, श्रावण


|श्रावण महिन्यातील वातावरण

      तसे बघितले तर प्रत्येक महिन्यातील वातावरण हे वेगवेगळे असते, परंतु श्रावण महिन्यातील वातावरणाची मजा फार वेगळी असते. निसर्गामध्ये एक वेगळ्या प्रकारची उमेद आणि उत्साह या महिन्यामध्ये वाहताना दिसतो. घराघरांमधून सुगंधी अगरबत्ती यांचा वास दरवळत असतो. श्रावण महिन्यामध्ये विविध प्रकारचे व्रतवैकल्य यामध्ये स्त्रिया व्यस्त दिसतात. नवीन साड्या कपडे तरुण मुली ड्रेस घालून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात.

          श्रावण महिन्यामध्ये सोमवारी शाळांना अर्धी सुट्टी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही श्रावण महिना नेहमीच लक्षात राहतो. माणसाच्या एकंदरीत जीवनावर फार मोठ्या प्रमाणात श्रावण महिन्याचा परिणाम होत असतो त्यामुळे तो नेहमीच लक्षात राहतो. 

श्रावण महिन्यातील पाऊस: 

   श्रावण महिन्यामध्ये येणारा पाऊस म्हणजे अगदी लहान मुला सारखा असतो. लहान मुलांच्या मनात कधी कोणते विचार येतील किंवा ते कसे वागतील हे अजिबात सांगता येत नाही. अगदी तसेच श्रावण महिन्यामध्ये कधी पाऊस येईल आणि कधी ऊन पडेल हे सांगता येत नाही. ऊन सावलीचा खेळ हा सतत चालूच असतो.

     श्रावण महिन्याचे वर्णन करणारी कविता तुम्हाला माहीतच असेल,"श्रावण मासी हर्ष मानसी....."अगदी मनाला स्पर्श करून जाते.
श्रावणातील पाऊस म्हणजे अचानक पावसाच्या सरी कोसळू लागतात तर लगेच पुढच्या क्षणाला ऊनही पडते. ऊन सावलीचा हा खेळ चालूच असतो. निसर्गालाही लपंडाव खेळ खूपच आवडतो असे वाटू लागते

श्रावण महिन्याची विविध रूपे व सौंदर्य ( various forms of Shravan month)

      श्रावण महिन्याचे वर्णन करताना मला एक गाणे आठवते ते असे की,

" हसरा नाचरा जरासा लाजरा 
सुंदर साजिरा श्रावण आला"

     श्रावण महिन्यातील ऊन अत्यंत कोवळे व सुकुमार असते. श्रावण महिन्यातील ऊन ज्यांना सोसणार नाही त्यांना अगदी नाजूक म्हटले पाहिजे. उन्हाप्रमाणे श्रावण महिन्यातील पाऊस देखील अत्यंत साधा व मनमोहक असतो. पावसाच्या जोरदार सरी नंतर अचानक ऊन पडू लागते.

श्रावण महिन्यात निसर्गात झालेले बदल
(changes in nature during the month of Shravan):

     श्रावण महिन्यात निसर्ग आपल्या विविध रूपांचे दर्शन घडवत असतो. कधीतरी अचानक आकाशामध्ये इंद्रधनुष्याचे दर्शनही घडते. आपल्या अनंत  बाहूंनी निसर्ग सौंदर्याची बरसात करत असतो. श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य उपास-तापास यांची सुरुवात होते एक वेगळेच भक्तिभावमय वातावरण या महिन्यात निसर्गामध्ये निर्माण झालेले असते.

       श्रावणातील ऊन सुद्धा अतिशय कोमल असते. असा हा सुंदर सुकुमार महिना कुणाला न आवडेल तर नवलच आहे. या महिन्यांमध्ये विविध  सणांना आणि समारंभांना सुरुवात होते. वर्षभरातील हिंदुधर्माच्या सणांचे अनुक्रमाणिका केली तर श्रावण महिन्यालाच पहिला नंबर द्यावा लागेल.

FAQ:-

श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन सांगा 

    पावसाळा सुरू होऊन पंधरा-वीस दिवस एखादा महिना होतो आणि लगेच श्रावण महिन्याच्या आगमनाची चाहूल लागते. झाडांना नवीन पालवी फुटून धरणी नवीन हिरवा शालू पांघरते असे वाटते.
      गवताच्या पात्यावर दवबिंदू किंवा पावसाचे बिंदू गोळा झालेले असतात. अचानक चालणाऱ्या ऊन-पावसाच्या खेळामध्ये ऊन आले की यादव बिंदूंवर हे उन्हाचे किरण पडल्यानंतर अचानक कुठून तरी मोदी चमकावा असेच वाटू लागते.

यावर्षीचा म्हणजेच 2021 वर्षातील श्रावण मास कधी पासून सुरू होणार आहे?/कधी सुरू होणार श्रावण?
    
 यावर्षी म्हणजेच सन 2021 मध्ये श्रावण महिना नऊ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.

श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्या देवाची पूजा केली जाते?
   श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भगवान शंकराची पूजा केली जाते.

श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
  • श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची पूजा केली जाते.
  • श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात लोक उपवास धरतात.
  • भगवान शंकराची मोठ्याप्रमाणात पूजा केली जाते.
  • भगवान शंकरांना श्रावण महिना अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते.
  • सगळीकडे आनंदी आनंद असतो नदी-नाले पाण्याने ओथंबून वाहत असतात. तसेच धरणे मातीने सर्वत्र हिरवागार गालिचा पसरलेला असतो.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने