www.upkarmarathi.com

| माझा आवडता प्राणी कुत्रा , मराठी निबंध


| My favourite pet animal 
dog

      आमच्या घरी एक कुत्रा आहे . त्याचे नाव शेरू आहे. शिरू माझा अत्यंत आवडता प्राणी आहे. शेरू चा रंग पांढरा शुभ्र आहे. त्याला झुपकेदार  शेपूट आहे. मी दिवसभर त्याच्याबरोबर खेळत असतो. खेळताना आम्हाला खूपच मजा येते.
        एकदा माझा पुस्तकांचा पसारा मांडून मी खेळायला निघून गेलो. आल्यावर आईने मला सगळी पुस्तके आवरायला सांगितली. रागात म्हणाली तुला किती वेळा सांगितले की पुस्तके अशी पसरून बाहेर खेळण्यासाठी जाऊ नको पर्यंत तुला काहीही फरक पडत नाही कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच आई मला असे म्हटल्यावर मला कळले नाही की आई असे का म्हटली.
माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध 

         मी लगेच दिवसभर शेरु बरोबर खेळत बसलो आणि त्याची शेपूट सरळ करत बसलो. दिवसभर शेरूच्या शेपटीशी खेळत असताना आईने मला बघितले. तेव्हा मी आईला म्हटलो आई खरोखर कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच ती सरळ होतच नाही. बघ या शेअरची शेपूट मी दिवसभर सरळ करण्याचा प्रयत्न करत आहे पण ती काही झाली नाही  माझे बोलणे ऐकून आईला खूप हसू आले.
        शेरू आमच्या घरात दिवसभर फिरत असला तरी सुद्धा तो घरात अजिबात घाण करत नाही. घरातील खाद्यपदार्थांमध्ये तो तोंड सुद्धा घालत नाही. शेरू अत्यंत प्रामाणिक आहे. तो दिवसभर आमच्या घराची राखण करत असतो.
       त्याचे नखरेही खूप आहेत. त्याला इतर कुत्र्यासारखे भाजी पोळी किंवा भाकरी फेकून दिले तर तो अजिबात खात नाही. त्याला व्यवस्थित भांड्यामध्ये ते द्यावे लागते तरच तो खातो. मी खेळत असताना तो माझ्याबरोबर खूप चांगला खेळतो. मी बॉल दूर फेकला की तो पळत जाऊन तोंडात बॉल पकडून आणतो
          मी शाळेत जातो तेव्हा मला शेरूची खूप आठवण येत असते. शाळेत जसे मला खूप मित्र आहे त्या पद्धतीनेच शेरू माझा खूप जवळचा मित्र आहे.

         
                प्रिय मित्रांनो तुम्हाला हा माझा आवडता प्राणी कुत्रा (majha avadta prani kutra, marathi nibandh) कसा वाटला ? हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमचा आवडता प्राणी कोणता आणि त्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहेत, हे देखील सांगा . आम्हाला तुमच्या  भावना जानून  घेण्यात खूपच आनंद होईल. धन्यवाद

हा निबंध लोक खालीलप्रमाणे  शोधतात.
|माझा आवडता प्राणी मराठी निबंध
|माझा आवडता प्राणी निबंध
|माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी
|माझा आवडता प्राणी यावर निबंध.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने