www.upkarmarathi.com
नमस्कार मित्रांनो ,आज मी तुमच्यासाठी संपूर्ण भारतातील एका महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित असलेल्या मानव समाजाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मोठा मानव समाज म्हणजेच आदिवासी समाज होय.
|आदिवासी म्हणजे काय?|आदिवासी माहिती
आदि म्हणजे आधीपासून वासी म्हणजे निवास करणारे. आदिम काळापासून वास करणारे म्हणून त्यांना आदिवासी असे म्हटले जाते. खरे तर आदिवासी म्हणण्यापेक्षा त्यांना वनवासी म्हणणे अधिक योग्य ठरेल. एकेकाळी हा समाज अत्यंत प्रगत व आर्थिकदृष्ट्या सक्षम होता. परंतु भारतामध्ये इंग्रजांचे राज्य आल्यानंतर या समाजाचे इंग्रजांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केले त्यामुळे आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात ढासळली.
आदिवासी जमाती मुख्यत्वेकरून डोंगराळ प्रदेशांमध्ये राहत असल्याचे दिसते. निसर्गाविषयी विशेष आवड असणारा हा आदिवासी समाज निसर्गाची पूजा करतो, म्हणजेच निसर्गपूजक असतो. यांच्या सर्व संस्कृती निसर्गाशी निगडित असतात. इतर समाजाशी त्यांचे काही देणे घेणे नसते. ते स्वतः निसर्गाच्या सानिध्यात राहणेच पसंत करतात.
पुरातन संस्कृत ग्रंथांमध्ये आदिवासींना अत्विक असे देखील म्हटलेले आहे. गांधीजींनी आपल्या काही ग्रंथांमध्ये त्यांना गिरिजन असे देखील म्हटले आहे. म्हणजेच डोंगरात किंवा पर्वतात राहणारे.
माझा आदिवासी जमाती मध्ये राहण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रसंग आलेला आहे . त्यावरून मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो की , हे लोक अतिशय सुस्वभावी व शांत स्वभावाचे असतात.स्वतःच्या धुंदीत जगत असतात.
आदिवासी जमाती मध्ये देखील आता शिक्षणाचा प्रसार होऊ लागलेला आहे. त्यामुळे हे लोक देखील आता विविध नोकऱ्यांमध्ये व धंद्यामध्ये कार्यरत असलेले दिसतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्यामुळे हे लोक शारीरिक दृष्ट्या निरोगी असतात. शिक्षणामुळे आता विविध प्रकारच्या चांगल्या नोकऱ्या आणि व्यवसायांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात यांचा विकास होत आहे.
|आदिवासी व वन्य जमातीच्या उत्पन्नाची साधने|
लाकूड कटाई करणे, तसेच वनांमधून कंदमुळे , फळे ,तंतू ,मध ,औषधी वनस्पती गोळा करणे हे येथील लोकांचे मुख्य व्यवसाय असतात.
गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, मेळघाट ,नंदूरबार ,ठाणे इत्यादी जिल्ह्यातील वनक्षेत्रात या वस्त्या आढळतात. बांबूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक वस्तू बनवणे यामध्ये या लोकांना विशेष गती असते. बांबू पासून टोपली विणणे, झाडू तयार करणे इत्यादी कामे देखील हे लोक करताना दिसतात. शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे आता डॉक्टर इंजिनिअर शिक्षक तसेच अनेक उद्योगधंद्यांमध्ये देखील आपल्या कौशल्याने यश मिळताना दिसत आहेत.
आदिवासी लोकांच्या विकासासाठी भारत आणि राज्यांमधील शासनाने विविध प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत.
|आदिवासी लोकांच्या प्रगतीमधील अडचणी|आदिवासी समस्या
आदिवासी लोकांच्या प्रगती मधील महत्त्वाची अडचण म्हणजे त्यांची प्रगत शहरी वस्तीपासून किंवा गावापासून दूर असलेले अस्तित्व म्हणजेच राहणे.
आदिवासी लोक हे एकाच ठिकाणी गटाने वस्ती करून राहण्याचे प्रमाण फार कमी आहे. घरामधील अंतर बऱ्याच ठिकाणी फारच जास्त असते. आता काही ठिकाणी लोक एकत्र येऊन गावांची निर्मिती झालेली दिसून येते. अशा ठिकाणी प्रगतीचे प्रमाणही जास्त दिसून येते.
घरे दूर दूर असल्यामुळे रस्त्यांची निर्मिती करतानाही मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. प्रत्येक घरापर्यंत पक्का रस्ता निर्माण करणे यासाठी लागणारा खर्च फारच मोठा आहे त्यामुळे प्रगतीचा वेग फारच मंदावतो.
आदिवासी लोकांची बोलीभाषा विविध प्रकारच्या असतात. ज्याप्रमाणे मराठी भाषा दर कोसावर बदलते असे म्हणतात. त्या पद्धतीनेच आदिवासी बोलीभाषांमध्ये देखील थोड्या मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतात. प्रमाण भाषेपासून दूर असल्यामुळे या लोकांना शिक्षण घेताना देखील अडचणी येतात. शिक्षणात अडचण निर्माण झाली की आपोआपच सर्व प्रकारच्या विकासाचे वेग आपोआपच मंदावतात.
आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे शिक्षणामध्ये देखील अडचणी येतात परंतु आता शासनाने आदिवासींसाठी विविध प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. या योजनांमुळे आदिवासी समाजातील तरुण-तरुणी अतिशय चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊ शकतात.
आदिवासी तरुण-तरुणींसाठी विविध प्रकारच्या वसतिगृहांची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. तरुण तरुणी अगदी निर्भीडपणे विविध शैक्षणिक संस्था व संशोधन संस्थांमध्येही काम करताना आपला ठसा उमटवत त्यांना दिसतात.
|जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करतात?|
जागतिक आदिवासी दिन 1994 पासून 9 ऑगस्ट रोजी साजरा करतात. या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात. आदिवासी समाज बांधवांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो.
तुम्हाला खालील लेख वाचायलाही नक्की आवडेल
Aadivasi ha vanavsi nahi
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.