www.upkarmarathi.com

       तुम्हाला अभ्यासामध्ये मदत व्हावी यासाठी या साइटवर अनेक प्रकारचे निबंध आणि लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसेच आज तुमच्यासाठी |मी झरा बोलतो आहे| किंवा |झरा बोलू लागला तर| हा निबंध घेऊन आलेलो आहोत. तुम्ही हा निबंध वाचा आणि तुमच्या शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. हा निबंध जसाच्या तसा लिहू नका. तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीला वाव द्या.
       चला ,तुम्हाला  उपदेशाचे डोस न पाजता लगेच आपण निबंध बघूया..




मी झरा बोलतो आहे
 | essay on mi zara boltoy in marathi 

        असे म्हणतात की, नदिचे मूळ आणि संतांचे कुळ कधीही विचारू नये . त्यांच्याकडून फक्त होईल तसा लाभ करून घ्यावा. विनाकारण त्या खोलात शिरू नये. परंतु मी तर साधा झरा आहे. माझा जन्म या डोंगराच्या अंगाखांद्यावरच झालेला आहे. माझ्या पाण्याने या डोंगरावर असलेल्या पाय वाटांनी आपल्या प्रियजनांना भेटायला निघालेल्या लोकांना मी तृप्त करतो. 
    
          ज्या वेळी अनेक पशुपक्षी माणसे माझे पाणी पिऊन तृप्त होतात त्यावेळी माझ्या मनाला खूपच आनंद होतो माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. या डोंगरातून मी फार आनंदाने आणि वेगाने खाली येतो. येताना अनेक झाडांना दगडा यांना वळसा घालून आम्ही पुढे पुढे निघतो रस्त्यामध्ये अनेक अडचणी येतात परंतु त्या सर्वांवर मात करून अनेक वळणे मी पुढेच जात राहतो.

       इथून थोडे पुढे गेले की एक खडक आहे. त्या खडकावरून मी खाली उडी मारतो आणि पुढे मजेने वाहत जातो ज्या वेळी मी खाली उडी मारतो  त्यावेळी  सुंदर आवाज निर्माण होतो .वातावरण शांत असले की माझा आवाज दूरपर्यंत ऐकू जातो. उंचावरून खाली पडताना माझे रूप फारच सुंदर पांढरेशुभ्र दिसते.
       
      मी वाहत जातो त्या रस्त्याच्या काठाने असणारी सर्व पाने, फुले, झाडे ,वेली नेहमी हिरवेगार आणि ताजी टवटवीत असतात. माझ्या पाण्यामुळे त्यांची तहान भागते ते जोमाने वाढू लागतात. माझे पाणी पिऊन वाढणारे झाडे आणि पशुपक्षी ज्यावेळी मी बघतो तेव्हा जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

     जसे प्रत्येकाला कुणाच्यातरी साथीची गरज असते किंवा कुणाचे तरी सानिध्य आवडते अगदी त्याच पद्धतीने माझ्याही संगतीला आहे लहान-लहान जीव आणि माशा, पक्षी, फुलपाखरे, कीटक, मधमाशी सतत रहात असतात.

        सर्वांची तहान भागवणारे माझे शांत पाणी ज्या वेळी कोणीही येऊन खराब करते, दूषित करते तेव्हा मला फारच वाईट वाटते. उन्हाळ्यामध्ये तर बऱ्याच वेळा माझे जीवनच संपुष्टात येते माझ्यातले पाणी संपून जाते आणि मी आटून जातो. जरीही मी नाहीसा होत असतो तरीदेखील पुन्हा पुढच्या वेळी त्याच जोमाने वाहू लागतो.
     
      आयुष्यात संकटे तर येतच राहतील . संकटांना घाबरून जो मागे सरकतो तो कधीही यशस्वी होत नाही. म्हणून तुम्ही देखील आयुष्यात कधीही घाबरायचे नाही .संकटे येतात आणि निघूनही जातात. फक्त तुम्ही संयम ठेवा. न डगमगता सतत पुढे जात राहा .आयुष्य फार सुंदर होऊन जाईल.

हा निबंध लोक खालील नावानेही शोधतात.

  1. |झऱ्याचे मनोगत मराठी निबंध | zaryache maongat 
  2. |झरा बोलू लागला तर मराठी निबंध|jhara bolu lagla tar 
  3. |झऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध|zaryache atmavrutt 
  4. |झऱ्याचे आत्मकथन मराठी निबंध|zaryache atmakathan 
  5. |झऱ्याची कैफियत मराठी निबंध|zaryachi kaifiyat
तुम्हाला हे निबंध वाचायलाही आवडेल 
  1. आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन
  2.  माझी आई, majhi aai marathi nibandh  
  3. कोरोना व्हायरस, corona,covid-19 
  4. मी कोरोना वायरस बोलतोय.
  5. माझी अभयारण्यास भेट. 
  6. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  7.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  8. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh






    
      
    

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने