www.upkarmarathi.com
एखादी निर्जिव वस्तू किंवा सजीव व्यक्ती आपल्याशी बोलते आहे. आणि तिचे विचार, भावना, कल्पना आपल्याशी बोलून व्यक्त करत आहे. अशी कल्पना करून त्यावेळी एखादा निबंध लिहिला जातो त्या निबंधाला मनोगत असे म्हटले जाते.
असाच आपण छान मनोगतपर निबंध |पुस्तक बोलु लागले तर किंवा |पुस्तकाचे आत्मवृत्त आज आपण बघूया.
| पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध |pustakache atmavrutta Marathi nibandh
सगळ्यांना नमस्कार मी पुस्तक बोलत आहे . माझं मन तुमच्याकडे मोकळ करण्याचा मी चंगच बांधलेला आहे. बरेच दिवस झाले मनात ठरवले होते . आज मुहूर्त मिळालेला आहे . तर हा मुहूर्त काही मी सोडणार नाही.
लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत तुम्ही पुस्तकांची मदत घेत असतात. कधी वाचण्यासाठी , कधी चित्र बघण्यासाठी , कधी मनोरंजनासाठी , तर कधी तुमची मनस्थिती बदल होण्यासाठी. हे सगळं करत असताना तुम्ही कधी माझ्या मनाचा तिचा विचार केलेला आहे का? पुस्तकाला कसे वाटत असेल ? आपण त्याची काळजी घेतो का ?आपल्या चुकीच्या वागण्याने पुस्तकाला त्रास होईल का? या गोष्टीचा विचार तुम्ही करायला नको!
कुठेतरी एखाद्या छपाईच्या कारखान्यांमध्ये माझा जन्म झाला. आमच्यावर विविध रंगाने लेखन केले गेले. हे लेखन म्हणजे काही अविचाराने लिहिलेली अक्षरे नव्हे, तर एखाद्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या व्यक्तीने किंवा अनुभवसंपन्न व्यक्तीने लिहीलेले आपले अनुभव यांच्यामध्ये व्यक्त केलेले असतात.
या अनुभवांचा फायदा अनेक लोकांना आयुष्य जगत असताना वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये होतच असतो. माझ्यात लिहिलेली अक्षरे वाचून जर कुणाला फायदा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यातच आमच्या जीवनाचे खरे सार्थक आहे.
आमच्या मुळे होणारा हा फायदा सगळ्यांना मान्य तर आहेच . असे असून देखील आमच्याकडे होणारे दुर्लक्ष मात्र विसरून चालणार नाही. तुम्ही आमची नीट काळजी घेत नाही. याचेच मला थोडे वाईट वाटते .बरेच दिवस विचार करत होतो की , कधीतरी तुमची कृती बदलेल आणि तुम्ही आमची काळजी घेणार परंतु अजिबात फरक पडलेला नाही तुमच्या वागण्यामध्ये . त्यामुळे आज मी तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी माझे मनोगत व्यक्त करत आहे.
आजपासून मनाशी पक्की खूणगाठ बांधून ठेवा की पुस्तकांची काळजी घेणार. पुस्तके जीवनाचा आधार आहेत हे विसरून चालणार नाही . त्यामुळे मी या निबंधामध्ये तुम्हाला जे सांगितले नीट लक्षात ठेवा मला येतो आता मी . माझे बोलणे पूर्ण शांततेने ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.
या निबंधाचा लोक खालील प्रमाणेही शोध घेतात.
- | मी पुस्तक बोलत आहे
- |Pustakache atmavrutta nibandh marathi madhe
- |पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध
- |पुस्तकाचे मनोगत निबंध इन मराठी
- |पुस्तकाचे मनोगत निबंध दाखवा
- |पुस्तकावर निबंध
- |एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.