www.upkarmarathi.com




|वाचनीय मराठी लेख|
|प्रयत्न|
   
         खुप वेळा आयुष्यामध्ये आपल्या समोर असे प्रसंग येऊन उभे राहतात की ,त्यावेळी आपण काय करावे काहीही सुचत नाही. आपल्या मनाची प्रचंड गोंधळलेली अवस्था असते. त्यावेळी कोणीतरी आपल्याला काही प्रेरणादायी व दिलासादायक बोलल्यानंतर थोडासा धीर येतो.
        तुमच्याही जीवनामध्ये जर कधी असा प्रसंग निर्माण झाला तर अजिबात घाबरू नका . अडचणी त्यांनाच येतात जे काही तरी करतात . जे काहीच करत नाही त्यांच्यासमोर समस्या उभे राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. 
           तुम्ही एखादी मुंगी नक्की बघितले असेलच किती छोटासा जीव असतो. मुंगी म्हणजे अतिशय उद्योगी कीटक . छोटासा साखरेचा दाणा घेऊन मुंगी कितीतरी वेळा भिंतीवरून जात असताना  खाली घसरते. कितीही वेळा घसरली तरीसुद्धा मुंगी वरती चढून जाण्याचा प्रयत्न अजिबात सोडत नाही. आणि तिच्या प्रयत्नांना यश मिळतेच एक वेळ अशी येते की साखरेचा तो कण घेऊन ती इच्छित ठिकाणी पोहोचून जाते, आणि मग साखरेचा गोडवा तिला अनुभवता येतो. तसेच कितीही अडचणी असल्या तर तुम्ही प्रयत्न करणे अजिबातच सोडू नका. प्रयत्न करत असताना तुम्हाला त्रास होईल परंतु  अडचणीतून बाहेर अंतर या प्रयत्नांमधून मिळणारा गोडवा तुम्हाला चाखायला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
         जो व्यक्ती समुद्राच्या लाटांना घाबरतो तो व्यक्ती समुद्र पार कसा करू शकतो ? समुद्र पार करायचा असेल तर समुद्राच्या लाटांना भेदून जाण्याची इच्छाशक्ती व स्वतःवर विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. समस्या आपली आहे तर आपल्यालाच सोडवावे लागणार. आपल्या अंगणातील घाण काढायला बाहेरची माणसे कशाला येतील. अगदी त्याच पद्धतीने आपल्या समोर असलेली कठीण परिस्थिती आपल्यालाच सुधारावी लागेल.
          समुद्राच्या गर्भातून मोती बाहेर काढणारे गोताखोर ज्या ज्या वेळी समुद्राच्या तळाशी जातात , त्या प्रत्येक वेळी त्यांना मोती मिळतोच असे नाही. अनेक वेळा त्यांना रिकाम्या हातानेच परत यावे लागते. यामुळे ते अजिबात हार मानून घेत नाही. त्यांना एक गोष्ट माहीत असते की या एवढ्या विशाल समुद्रातून आपल्याला मोती सहज मिळणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी रिकाम्या हाताने जरी परत यावे लागले तरी त्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की ठरवलेले असते की एकदा तरी आपल्या हाती मोती नक्कीच लागेल. सकारात्मक विचारच त्यांना पुन्हा पुन्हा समुद्रामध्ये खोल तळाशी जाण्याची प्रेरणा देत राहतो आणि ते यशस्वी देखील होतात. त्याच पद्धतीने कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला वारंवार अपयश येत असेल तर मनाशी खूणगाठ बांधून ठेवा की तुम्हाला एक वेळ नक्की यश मिळेलच. म्हणून हार मानू नका.
     आपल्या वाट्याला येणारे प्रत्येक अपयश हे अपयश नसून एक संधी आहे अशी सकारात्मक विचारसरणी ठेवा. अपयश एक नवीन संधी घेऊन येईल त्यामुळे अपयशाचा स्वीकारही हसऱ्या चेहऱ्याने  केला पाहिजे.
         अपयश आल्यानंतर एका गोष्टी चा विचार नक्की करा. अपयश का आले या प्रश्नाच्या खोलात जाऊन सर्व शक्यतांचा अभ्यास करा आणि त्या अभ्यासानंतर अपयशाची सर्व कारणे आणि शक्यता पुसून टाका . मग स्वतः देव सुद्धा तुम्हाला अपयशी करू शकणार नाही.
     चला तर मग आता थांबायचे नाही. मनात ठरवलेले संकल्प पूर्ण झाल्याशिवाय विश्रांती घ्यायची नाही.

     तुम्हाला अजून चांगले वाचनीय लेख व कथा द्यायचे असतील तर ब्लॉगमधील इतर पोस्टही नक्की वाचा.

तुम्हाला हे खालील लेखही नक्की आवडतील.


   

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने