www.upkarmarathi.com

| आजची शिक्षण पद्धती माहिती मराठी
| aajchi shikshan paddhati essay in Marathi
| आजची बदलती शिक्षण पद्धती मराठी निबंध

|  | aajchi shikshan paddhati in Marathi nibandh


      शिक्षण म्हणजे आपला स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान  होय.  पूर्वीच्या काळी प्रत्येक वर्गासाठी भिन्नभिन्न शिक्षण होते .ब्राह्मण वर्गासाठी वेदविद्याचे, क्षत्रिय यांच्यासाठी शास्त्र विद्येचे आणि वैश्य व शूद्र ही आपल्या वाडवडिलांकडून चालत असलेल्या कलेचे शिक्षण घेत असत. पण आता ही शिक्षण पद्धती पूर्णपणे बदललेली आहे.
      आजचे शिक्षण हे पूर्णपणे पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकातील माहिती ठराविक वेळात उतरून काढणे याला  परीक्षा या शब्दाचे रूप मिळाले आहे. पुस्तकाबाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची संधी आजच्या युगात विद्यार्थ्यांना व शिक्षकाला मिळत नाही. आजच्या शिक्षकांना तरी जनरल ज्ञान देता आले पाहिजे व विद्यार्थ्यांनी ते उत्कृष्टपणे ग्रहण केले पाहिजे.पण तसे न करता विद्यार्थी हा स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही. त्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. त्याला जेवढे आपल्या गुरूकडून मिळते तेवढे सर्व आपल्या जवळ ठेवतो. आता तो काहीच वाढवण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे त्याच्या बुद्धीला चालना मिळत नाही.
      त्याच्या विचारांची क्षमता ही कमी होत जाते याच कारणामुळे वैद्यकीय अभियांत्रिकी तसेच शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळणे अशक्य झाले. आहे ज्याचे पाठांतर उत्तम तो अत्यंत हुशार असा समज झाला आहे. दिवसेंदिवस महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा वेगाने घसरत आहे त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. 
             आजच्या शिक्षणात औद्योगिकरणाच्यापरिस्थिती व्यावसायिक आणि प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण याची निकडीची गरज आहे परंतु ती गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे व्यक्तीविकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास नृत्य, गायन, शिल्पकला इत्यादी कला विभागांचाही शिक्षणाचा भाग असला पाहिजे. पण दुर्दैवाने या विषयांकडे बघितले जात नाही . जणू काही एक आपल्या आयुष्यात हे एक जरुरीचे साधन नाहीच. या उद्देशाने या विषयाकडे नजर टाकली जाते. 
     भाकरी मिळवून देणारे सुसंस्कार घडवणारे देशबांधवांना विषयी अभिमान निर्माण करणारे असे शिक्षण असावे. शारीरिक बौद्धिक भावनिक तसेच सर्व विकास साधण्यासाठी ते सर्व दृष्टीने संपन्न होईल असे आजच्या युगात शिक्षण असायला हवे.


      आजच्या शिक्षणात मनुष्य फक्त सुशिक्षित होतो पण सुसंस्कृत नाही .तसे पाहता शिक्षण हे पवित्र आहे. त्यामुळे ज्यांनी  शिक्षण घेतले ते तर  शिक्षित असायलाच हवे पण खरे तर ती   माणसे ही स्वार्थी व संकुचित वृत्तीचे असतात . हुंड्याची प्रथा सुशिक्षितांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते . अशिक्षित यांच्या घरी पत्नीही गृहलक्ष्मी मानली जाते . सुशिक्षितांमध्ये घरी येणारी वधु ही उपभोग्य वस्तू मानली जाते . फक्त एक हुंडा घेऊन येणारी व्यक्ती समजली जाते. कुठलाही मानव बघा   निस्वार्थी होण्यासाठी त्याने पूर्वीचे ऋषीमुनींच्या  आचरणातून शिक्षण घ्यायला हवे.
       महात्मा गांधींच्या  मते "शिक्षण म्हणजे व्यक्तींमधील अध्यात्मिक बौद्धिक अंगाचा विकास करणे ".आजची शिक्षण पद्धती ही बौद्धिक विकास करते. शिक्षण हे सर्वांगीण विकास करणारे असते मोठ्या प्रमाणावर डॉक्टर , इंजिनीअर्स, शिक्षक तयार होतात परंतु खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे.  यामुळेच आपल्या भारताला ऑलिंपिकमध्ये फारसे  सुवर्णपदक मिळत नाही . याला कारण शिक्षण पद्धतीतील खेळाला असलेले निम्न स्थान होय. निरोगी शरीराचा विकास करणारी शिक्षण पद्धती असावी. यात खेळालाही महत्त्वाचे स्थान असावे.
        आज शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारले तू हे शिक्षण का घेत आहेस ? त्याचे उत्तर ज्ञान प्राप्ती करणे किंवा व्यवसाय करायचा आहे असे कधीही होत नाहीत. केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेत आहोत असेच होते . शिक्षण पद्धतीतील व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था  तसे कमीच आहेत. प्रत्येकाला कमी श्रमात अधिक पैसा देणारी नोकरी हवी आहे. शिक्षणात उद्योग धंदा व व्यवसाय शिक्षण द्यायला हवे अशी आपली शिक्षण पद्धती हवी.विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणारे नैतिक मूल्य रुजणारी व सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी पद्धती शिक्षण पद्धती असावी.

  1. | aajchi shikshan paddhati
  2. | aajchi shikshan paddhati essay in Marathi
  3.  | aajchi shikshan paddhati in Marathi nibandh
  4. | aajchi shikshan paddhati bhashan
  5. | aajchi shikshan paddhati in Marathi

    प्रिय वाचक मित्रांनो आजची शिक्षण पद्धती योग्य की अयोग्य  याविषयी तुमचे देखील काही मत नक्कीच असेल. तुमचे मत मला कमेंट करून नक्की सांगा.
     त्याबरोबरच शिक्षण पद्धती मध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे किंवा कोणते बदल केल्याने शिक्षण पद्धती अधिकाधिक सुदृढ होईल याविषयी देखील तुमच्या कल्पना कमेंट करून नक्की सांगा.
       तुम्हाला तुमचे स्वतःचे काही साहित्य या साइटवर प्रदर्शित करायचे असेल तर तसे कळवा कॉन्टॅक्टस या पेजवर जाऊन आमच्याशी संपर्क साधा तुमच्या नावासह तुमचे साहित्य आपण या  ब्लॉगवर प्रदर्शित करू .
धन्यवाद.
  1. सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा. 
  2. शिक्षक वर मराठी निबंध | essay on teacher in marathi language वाचा .
  3. स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार वाचा .
  4. Essay on my school in English | my school essay  वाचा .

2 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने