www.upkarmarathi.com
औद्योगिक प्रदूषण मराठी माहिती | audyogikaran in marathi
मनुष्य निसर्गाचाच अंश असल्यामुळे तो निसर्गापासून जितका दूर जाईल तितकाच दुःखी होईल . जगभरात कृत्रिम जीवनशैलीचा अवलंब होत असल्यामुळे सकृत दर्शनी नैसर्गिक वाटणाऱ्या आपत्ती मनुष्यनिर्मित असतात हे सत्य आता दडून राहिलेले नाही. निसर्गचक्रात हस्तक्षेप असाच वाढत राहिला तर निसर्गाचे संतुलन पूर्णतः बिघडून वादळ महापुर, ओझोन कवच क्षय, पृथ्वीच्या तापमानात वाढ यासारख्या आपत्ती कोसळतील . संपूर्ण सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल.
भविष्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे वायू ,जल ,भूमी, किरणोत्सार आणि इतर अनेक प्रकारच्या प्रदूषणाचे आव्हान होय. औद्योगिकरणामुळे शहरीकरण झपाट्याने होत आहे .नोकरी व्यवसाय उद्योग यामुळे शहरांकडे स्थलांतर करणार्यांचे प्रमाण वाढत आहे . उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भरमसाठ रसायनांमुळे परिसरात दूषित वातावरण निर्माण होत आहे.
उद्योगांमधून सल्फर डायऑक्साइड , नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड इत्यादी पर्यावरणास अपायकारक वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. म्हणजेच संभाव्य धोके लक्षात न घेता औद्योगीकरण केल्यामुळे शहरीकरण आणि पर्यावरण प्रदूषित होत आहे. तसेच वायू गळती मुळेही प्रचंड प्रमाणात प्राणहानी होत आहे . जसे भारतात 1983मध्ये भोपाळ येथे झालेली वायुगळती तसेच अनुशक्तीच्या चाचण्यांमुळे वातावरणात किरणोत्सर्ग वाढत जाऊन त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे आणि उष्णतेचे परिणाम वाढून त्याचा हवामानावर परिणाम होत आहे. त्यामुळे मानवाला विविध रोगांना तोंड द्यावे लागत आहे. हवा प्रदूषणामुळे जगातील न्यूयॉर्क, टोकिओ ,रोम तसेच भारतातील मुंबई ,कलकत्ता या शहरातील लोकांना हवा प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.
स्वतःचाच आपल्या आयुष्यात पराभव करून घेण्याचे आत्मघातकी ध्येय असल्यासारखा मनुष्य वागत आहे तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर पर्यावरणात फरक होत आहे. त्याचा वेगही बराच आहे आणि हा फरक मनुष्याला हानीकारक असाच आहे मनुष्य हा लोकसंख्या व पर्यावरण यात सुसंगती निर्माण करीत आहे असे म्हणायला सध्यातरी जागा नाही फक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून या परिस्थितीत सुधारणा होणे शक्य आहे तांत्रिक ज्ञानाने अन्नधान्याचे उत्पादन वाढेल परंतु ते वाढत्या लोकसंख्येला पुरे पडणे कठीण आहे.
पर्यावरण सुधारण्याचा प्रयत्न केला तरी तेथेही वाढत्या लोकसंख्येचा विपरीत परिणाम दिसणारच ह्याच तंत्रज्ञानामुळे पर्यावरणात दोषही निर्माण होऊ शकतात.
पाणी जीवनावश्यक गरज आहे . पाण्याचा आणि आरोग्याचा घनिष्ठ संबंध आहे. जलप्रदूषणामुळे दूषित पाणी लोकांना प्यावे लागते आणि दूषित पाणी म्हणजे रोगराईला आमंत्रण होय. मानवी स्वभाव आणि वाढत्या उद्योगधंद्यांमुळे देशातील मोठमोठ्या नद्यांचे पाणी झपाट्याने प्रदूषित होत आहे. गंगा कावेरी कृष्णा गोदावरी ब्रह्मपुत्रा इत्यादी नद्यांच्या जलप्रदूषणास मानवच कारणीभूत आहे. कारण मानवाने नद्यांच्या काठावरील मोठमोठ्या शहरांमधील गटारे मतप्रवाह कारखान्यातील टाकाऊ पदार्थ इत्यादी नदीच्या पाण्यात सोडून ही समस्या निर्माण केली आहे. पिक्चर जलप्रदूषणामुळे कॉलरा कावीळ अमांश इत्यादी साथीच्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे.
प्राणी सृष्टी आपल्या उदरनिर्वाहासाठी वनस्पती खातात व बदल्यात विष्टेद्वारा खत देतात परंतु मनुष्यप्राणी सर्वकाही भक्षण करून त्याच्या बदल्यात काहीही देत नाही तर त्याची विल्हेवाट नद्यांमध्ये करून उलट आणखी घाण करतो मनुष्यप्राणी स्वतःला फार शहाणा समजतो परंतु निसर्ग संतुलनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो.
जीवसृष्टीचे परस्पर संबंध हा निसर्ग शास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे उदाहरणार्थ जसे की, गाय कुरणात चोरून पोट भरीत आहे जर कुरणात भरपूर गवत असेल तर वरचे गवत खाईल व पुष्ट होईल म्हणजे गाईला पुरेल एवढे गवत सतत उपलब्ध होत राहील परंतु गाईंची संख्या वाढली तर गवत अपुरे होईल व गाई गवत अगदी जमिनी जवळून खात राहतील त्यामुळे पुढे गवत वाढण्यास वाव न मिळाल्याने कुरणातील गवत मरून जाईल व नंतर गवत न मिळाल्यामुळे गाई सुद्धा मरतील अशा रीतीने निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे दोन्ही जीवसृष्टीचा अंत झाला असे दिसून येते.
तसेच पर्यावरण घटकात वृक्षांचे महत्त्वाचे कार्य आहे परंतु मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाच्या मूलभूत घटकांचे पालन केले नाही वाढती लोकसंख्या वाढते औद्योगिकरण आणि वाढते प्रदूषण यामुळे अलीकडील काही दशकांत पर्यावरणाच्या प्रश्नाने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे.
पर्यावरण विषयक जागृतीची गरज जगातील सर्वच राष्ट्रांना जाणवू लागली आहे कारण पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यास पृथ्वीसारख्या सर्वांगसुंदर ग्रहावरील सजीव सृष्टी चे अस्तित्वच धोक्यात येईल, ही बाब लपून राहिलेली नाही. भौतिक सुखाच्या आणि आधुनिकतेच्या हव्यासापोटी पर्यावरणाचे शोषण आरंभ झाले पर्यावरणाचा विविध घटकातील मनुष्याचा हस्तक्षेप वाढत गेला आणि पर्यावरणाची स्थिती चिंताजनक होऊ लागली.
औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले आहे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रावर आक्रमण होऊन व नष्ट झाले आहेत शहरांमध्ये उद्योगधंदे आणि परिवहन या दोन्हींमध्ये ऊर्जेचा वापर होत असल्याने जशी उष्णता वाढते त्याप्रमाणे प्रदूषणही वाढत आहे वेगवेगळ्या केमिकल आणि उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे साखर कारखाने सिमेंट कारखाने रासायनिक खते तयार करण्याचे कारखाने किटकनाशक तयार करण्याचे कारखाने अशा अनेक कारखान्यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे औद्योगिकरणामुळे जंगलांची समस्या निर्माण होऊन जंगलांमध्ये परंपरेने स्थायिक झालेल्या लोकांचा विस्थापनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे लोकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे जंगल व पर्यावरणाच्या विनाशास औद्योगीकरण मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरले आहे.
त्याप्रमाणेच वेगवेगळ्या उद्योगात कामगारांना वेगवेगळे प्रकारचे काम करावे लागते ती त्या उद्योगात जे काही उत्पादन होत असते ते उत्पादन होत असताना कामगाराला त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करावे लागते त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागते कीटकनाशके या उद्योगातून उत्पादित केली जातात तेथील कामगारांना मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांच्या डोळ्यावर इजा होतात अर्धांगवायू चे झटके येऊ शकतात त्वचेचे विकार होऊ शकतात.
काही उद्योगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्यामुळे एलर्जी होणे जळजळ होणे असे विकार जडतात तर काही उद्योगांमधून कामगारांना धुरामुळे व धुरात असणाऱ्या कार्बन मोनॉक्साइड मुळे फुफ्फुसांचे कर्करोगही होऊ शकतात कापड उद्योगात सुद्धा दम्याचे विकार खोकला फुफुसाचे विकार होऊ शकतात खाली आणि भट्टी मधून बाहेर पडणारा धूर आणि त्यात असणारा कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साइड यामुळे विषबाधा हृदयाच्या कार्यावर परिणाम श्वसन मार्गाचे रोग वायु मोठ्या प्रमाणात हुंगला गेल्यास मरणाची भीती यांसारखे आजार होतात.
गंधक आम्लं तयार करण्याचे कारखाने विद्युत निर्मितीचे कारखाने पेट्रोलियम इंडस्ट्रीज तेल शुद्धीकरणाचे कारखाने कोळसा व तेल यांच्या ज्वलनाने यातून बाहेर पडणाऱ्या सल्फर डायॉक्साईड यामुळे घशाची रखरख इंद्रियांचे रोग होतात इत्यादी आजारांमुळे जीवाला मुकावे लागते.
मानव निसर्गाचा एक अविभाज्य भाग असून त्याने आपले निसर्गातील स्थान नम्रपणे ओळखून राहावे जर मानवाने अति हुशारी करून निसर्ग शास्त्राचे नियम मोडत राहण्याचा मूर्खपणा अट्टाहासाने चालू ठेवला तर परिणामतः तोच नष्ट होईल. माणसाच्या गरजांमध्ये आवश्यक गरजा व नवीन गरजा अशा दोन गरजा आढळून येतात त्यातील अन्नही गरज आवश्यक आहे व वस्त्र निवारा आणि इतर हौशी च्या गरजा निर्मिती गरजा ठरतात या सर्व गरजांचा पुरवठा निसर्गाला जर सहज शक्य व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर निसर्ग शास्त्राप्रमाणे आपण निसर्गाला सहाय्य केले पाहिजे व त्या रीतीने या सर्व गोष्टी नियमितपणे मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे.
मानवाच्या औद्योगिक गरजा वाढत आहेत व त्या प्रमाणात इंधनांची गरज वाढत आहे यासाठी खनिज इंधन जाऊन मानव हवेतील प्राणवायू कमी करत आहे त्याच वेळी जंगल तोड करत आहे त्यामुळे वनस्पती सृष्टी नष्ट होत आहे.
अगदी हल्ली म्हणजे गेल्या शतकापर्यंत माणसाच्या गरजा व लोकसंख्या निसर्गाच्या ताकदीत बसणारी होती परंतु औद्योगिक क्रांती व इतर काही विकासामुळे आता निसर्गाचे संतुलन मानवाच्या गरजा पूर्वी त्यांना सतत बिघडत आहे ते सावरण्यासाठी माणसाला अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे असे वागताना माणसाला काही मर्यादा स्वतःवर घालून घ्याव्या लागणार आहेत व त्यासाठी जी नीती आत्मसात करावे लागेल त्याला पर्यावरण नीती असे म्हणतात.
पर्यावरण नीतीचे मूलभूत तत्व असे की माणसाने सर्व जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा आदर केला पाहिजे व स्वतःच्या छोट्या स्वार्थासाठी इतर जीवसृष्टीच्या जीवनात नाहक ढवळाढवळ करू नये लोकसंख्या वाढत राहिली तर पाण्याचे प्रदूषण होणार हे ठरलेलेच आहे मग काही दिवसांनी दूषित पाण्याच्या जबर समस्येला तोंड द्यावे लागणार परंतु पर्यावरणाची योग्य आखणी केल्यास आणि निसर्गाशी सुसंगत अशा तऱ्हेने वातावरण निर्मिती केली तर निसर्गाशी संघर्ष न होतात वरील सर्व धोके टाळता येतील योग्य आखणी न करता जे औद्योगीकरण झालेले आहे त्यामुळे जमीन उजाड झाली आहे जंगले नष्ट झालेली आहेत मानवी आयुष्याच्या सुरक्षिततेला धोका वाढतच आहे औद्योगीकरण व जंगले कमी होणे यामुळे वन्य जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे आणि म्हणूनच आपली सर्व प्रगती तंत्रज्ञानाची वाढ औद्योगीकरण हे सर्व पर्यावरणाच्या रक्षणाशी सुसंगत अशाच तऱ्हेने केले पाहिजे.
- | audyogikaran in marathi information
- | audyogikaran meaning in marathi
- | audyogikaran marathi mahiti
- | audyogikaran ka mahatva in marathi
- | औद्योगिकरण meaning in marathi
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.