www.upkarmarathi.com
| Diwali information in Marathi
| दिवाळी माहिती मराठी
|essay for Diwali, हिंदू सणांमध्ये महत्त्वाचे स्थान लाभलेला सण म्हणजे दिवाळी होय दिवाळीलाच दीपावली असे देखील म्हटले जाते. दिवाळी म्हणजे दीपोत्सव संपूर्ण भारतभर हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
दिवाळीमध्ये घराच्या अवतीभवती सुंदर दिवे लावले जातात. तेलाचा उपयोग करून लावलेले हे दिवे सर्वत्र प्रकाश पसरवतात आणि एक आनंदमय वातावरण निर्माण करतात. काही ठिकाणी मेणाचे देखील दिवे पेटवले जातात. घराच्या उंच ठिकाणी सुंदर सुंदर आकाश कंदील लावले जातात. आकाश कंदिलांची जणू स्पर्धाच लागलेली असते.
दीपावलीच्या आनंदामध्ये भर घालणाऱ्या अनेक उपक्रमांना या दिवसांमध्ये बहर आलेला असतो. यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे घरासमोर काढली जाणारी रांगोळी. घरासमोर अंगणात विविध रंगांचा वापर करून अगदी सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. महिला भगिनी दीपावली मध्ये रांगोळ्या काढण्यासाठी अनेक दिवस आधीच तयारी करतात .अंगणात कोणती रांगोळी काढायची याचा विचार त्यांनी आधीच करून ठेवलेला असतो.
खेड्यापाड्यांमध्ये तसेच शहरांमध्ये देखील दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून सर्व स्त्रिया अंगण स्वच्छ झाडून सुंदर सुंदर रांगोळ्यांनी अंगण सजवतात. आपली रांगोळी इतर सर्वांपेक्षा सुंदर दिसावी यामुळे अनेक तरुण-तरुणी तसेच विवाहित स्त्रिया देखील विशेष प्रयत्न करताना दिसतात. कुणाची रांगोळी सर्वात सुंदर अशी जणू सर्वांची चढाओढच चालू असते.
पावसाळा नुकताच संपलेला असतो नवीन पिके शेतकऱ्यांची स्वप्ने खुलवत असतात शरद ऋतु सुरुवात होऊन थोडे दिवस झालेले असतात. अश्विन आणि कार्तिक महिना यांच्या मैत्री कालातच येतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दीपावली सण हा सुमारे पाच दिवसांचा असतो. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत या दीपावली सणाचा सण साजरा केला जातो. दीपावली सण म्हणजे केवळ सण नसुन प्रत्येकाच्या मनामनात आनंदाचे तरंग उठवणारा एक वादळाचाच अवतार आहे असे म्हणावे लागेल.
इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर दीपावली हा सण साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येतो. या सणांच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादन स्पर्धा ,गायन स्पर्धा यांचाही समावेश करावा लागेल.
दीपावली अनेक हिंदू सणापैकी अत्यंत पवित्र मानला जातो. असा सण जो समाजामधील वाईट गोष्टींवर चांगल्या व सत्य गोष्टींच्या विजयाचे प्रतीक निर्माण करतो. दीपावलीच्या कालावधीमध्ये भारतातल्या अनेक शाळा , कॉलेजेस तसेच कंपन्यांना सुट्ट्या दिल्या जातात.
| दिवाळी सणाची माहिती
|Diwali Information in Marathi
दिवाळी सणाचा इतिहास
| Diwali festival information in Marathi
दिवाळी सणाचा इतिहास तसा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे. लिखित स्वरूपामध्ये जे पुरावे सध्या उपलब्ध आहेत त्यानुसार असे सांगता येते की सुमारे तीन हजार वर्षांपासून दिवाळी हा सण साजरा केला जातो. ज्यावेळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये होते .त्या काळामध्येच दिवाळी सणाचा उगम झाला, म्हणजेच दिवाळी सण साजरा करण्यात येऊ लागला असे म्हणता येते.
वैदिक काळामध्ये अश्विन या मराठी महिन्यात शरद ऋतूत अश्वयोजी किंवा आग्रयण नावाचे यज्ञ केले जात असत . या यज्ञचा समावेश पाकयज्ञांमध्ये मध्ये केला जातो .
दिवाळी सण सुरू करण्यामागे अजून अशी ही कथा सांगितली जाते की, ज्या वेळी प्रभू श्री राम रावणाचा वध करून आयोध्या मध्ये परत आले त्यावेळी सर्व लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी आनंदोत्सव साजरा केला हा आनंदोत्सव म्हणजेच दिवाळी होय. त्यावेळचा दिवाळी हा सण आतासारखा मात्र अजिबात नव्हता. त्याकाळी दिवाळी सणामध्ये विविध यज्ञांचे आयोजन केले जात असे होम केले जात असत व सर्वत्र दैवी वातावरणाची निर्मिती केली जात असे.
श्री बी.के. गुप्ते हे प्रसिद्ध लेखक आपल्या , " फोकलोवर ऑफ दिवाली"या पुस्तकात असे म्हणतात की, दिवाळीचे पुरातन काळामध्ये धार्मिक बाबींमध्ये संदर्भ मात्र आढळून येत नाहीत. दिवाळी हा एक अशांचा सण आहे असेही काही ठिकाणी आढळून येते.
| दिवाळी सणाचे विविध नावे
| various names of diwali festival
various names of diwali festival
ग्रंथ किंवा व्यक्ती | दीपावली सणाचे नाव |
---|---|
हेमचंद्रने दिलेले नाव | यक्षरात्री (दीपावलीचे मूळ नाव ) |
वात्स्यायानाचे कामसूत्र यातील नाव | यक्षरात्री |
नीलमत पुराणात दिलेले नाव | दीपमाला |
कनौजचा राजा हर्षवर्धनने नागानंद नाटकात दिलेले नाव | दीपप्रतिपदुस्तव |
ज्योतिषरत्नमाला यातील नाव | दिवाळी |
भविष्योत्तरपुराण दिलेले नाव | दीपालिका |
कालविवेक ग्रंथात दिलेले नाव | सुखरात्री |
व्रतप्रकाश ग्रंथात दिलेले नाव | सुख सुप्तीका |
दीपावली सणाच्या काळामध्ये महाराष्ट्रासह इतरत्र अनेक ठिकाणी लहान मुले व मोठी माणसे मातीचे किल्ले तयार करता. तयार केलेल्या किल्ल्यांवर मातीची खेळणी देखील ठेवतात . त्यावर धान्य पेरतात . पेरलेल्या धन्याला कोंब येऊन संपूर्ण किल्ल्यावर हिरवळ पसरल्या सारखे छोटेसे कोंब वर येतात. किल्ले तयार करण्याची परंपरा कशी सुरू झाली ? याविषयी मात्र कुठेही काही नोंद आढळून येत नाही.
| दिवाळीमधील सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्थानिक उत्सव
- दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे की वसुबारस असते त्यादिवशी चौकाचौकांमध्ये गाय आणि वासरू यांच्या पूजेचे आयोजन केले जाते.
- दिवाळीमध्ये घराघरात विविध प्रकारच्या फराळाचे साहित्य बनवले जाते जसे की, चिवडा ,लाडू, करंजी, शेव, बालुशाही इत्यादी .
- विविध प्रकारचे सांगीतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.
- नृत्य स्पर्धांचे आयोजन , वादन स्पर्धांचे आयोजन, चित्रकला, भाषण, सामाजिक जनजागृती वरील देखावे यासारखे विविध उत्सव साजरे केले जातात.
- मोकळ्या मैदानामध्ये फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.
- एकत्रित दीपोत्सवाचे देखील आयोजन केले जाते. त्यामध्ये गावातील कॉलनीमधील सर्व लोक एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करतात.
| दिवाळी आणि महाराष्ट्रातील लोकसंस्कृती
दिवाळीच्या दिवसांमध्ये ज्यावेळी मुले फुलबाज्या किंवा फटाके उडवत असतात ,तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची गाणी देखील गायली जातात. त्यातील काही गाण्यांची उदाहरणे खाली देत आहे.
- दिन दिन दिवाळी दिवाळी गाई म्हशी ओवाळी || गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा श्रीरामाचा||
- दिवाळी आली दिवाळी आली |अंघोळीची घाई झाली| चला आता पटकन आवरा| किसन देव मारील नरकासुर
- गाई-म्हशींचे भरले वाडे दह्या-दुधाने भरलेले डेरे
- बळीच राज्य येऊ दे , सगळीकडे आनंद राहू दे.
भारतातील विविध राज्यांमधील दिवाळी.
1. पंजाब
पंजाब मधील लोक श्रीरामांचा राज्यभिषेक झाल्याच्या स्मृतिप्रित्यर्थ दिवाळीच्या दिवशी दीपोत्सव साजरा करतात.
पंजाबमधील शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा स्थापनेचा स्मृतिदिन या निमित्ताने दिवाळी सण साजरा करतात तसेच गुरु हर गोविंद सिंह जी यांचे मुघलांच्या कैदेतून सुखरूप सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा काल आनंदाने साजरा करतात.
2. नेपाळ
नेपाळमध्ये दिवाळीच्या कालावधीमध्ये लोक लक्ष्मीपूजन करतात. त्याबरोबरच गाई, बैल, कुत्रे या प्राण्यांची पूजा देखील करतात.
3. गोवा
गोवा राज्यातील दिवाळी जराशी वेगळ्याच प्रकारे साजरी केली जाते .गोव्यामध्ये दिवाळीच्या दिवसात विविध गावांमध्ये नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून ते जाण्याची म्हणजेच दहन करण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. गोव्यातील दिवाळीचे हे नरकासुराचे दहन म्हणजे आकर्षण मानले जाते.
3. महाराष्ट्र
महाराष्ट्र मध्ये देखील दिवाळी हा सण सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळी सणानिमित्त महाराष्ट्र शाळांना सुट्ट्या देखील असतात. पाहुणेरावळे मंडळी एकमेकांच्या घरी जाऊन आनंदाने सण साजरा करतात.
|मराठीत दिवाळी कशी साजरी केली जाते?
|दिवाळी सणाचे प्राचीन नाव काय आहे?
|दिवाळी का म्हणतात?
|दिवाळी कधी येते?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या आजच्या " दिवाळी सण माहिती |Diwali information in Marathi"या लेखामध्ये मिळतील.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.