www.upkarmarathi.com


Essay on teacher in marathi language 

|शिक्षक मराठी निबंध

    Essay on teacher in marathi , आई-वडिलांच्या नंतर शिक्षक ही अशी एकमेव व्यक्ती आहे जी त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी सतत प्रयत्न करत असते .चांगले शिक्षण देऊन शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य घडवत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या शिक्षकांची मोठी भूमिका असते. एका उत्कृष्ट शिक्षकांमध्ये बरेच गुण असतात आणि असे शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.  यावरच आधारित एक छान निबंध आपण बघूया या निबंधाचे नाव आहे .शिक्षक वर मराठी निबंध essay on teacher in marathi

शिक्षक दिन निबंध

शिक्षक वर मराठी निबंध
 | essay on teacher in marathi language

      सर्वच पालकांना त्यांची मुले ज्या शिक्षकांकडे शिकतात त्या शिक्षकांकडून खूप अपेक्षा असतात. जसे आई-वडील मुलांसाठी वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात , त्यापद्धतीनेच शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये वर्ग आणि खेळाच्या मैदानात पर्यंत वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात . विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक शिक्षक विविध प्रकारचे प्रयत्न करत असतात.
     एक चांगले  शिक्षक सतत सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांसमोर येतात. वर्गात येण्याअगोदर दररोजचे आपले अभ्यासाचे नियोजन त्यांच्याकडे असते. विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अध्ययन अनुभूती द्यायच्या, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला विकसित करायचे आहे ?  याविषयीचा संपूर्ण आलेख व नियोजन एका चांगल्या शिक्षकांकडे नेहमी तयार असते.
      भविष्यामध्ये एक चांगला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांसह स्वतःच्या जीवनात देखील ठरवलले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते नेहमी झटत असतात. एक चांगले शिक्षक आपल्या समोर एक गोष्ट सतत ठेवत असतात ती म्हणजे त्यांचे आदर्श आचरण. एक चांगले शिक्षक आपल्या आचरणाबाबतीत सतत जागरूक असतात. आपल्या आचरणामधून सर्व विद्यार्थ्यांसमोर एक चांगला संदेश कसा जाईल याचा ते सतत विचार करत असतात.


       एक चांगले शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाने विद्यार्थ्याच्या आयुष्यावर आजन्म प्रभाव टाकत असतात. आपल्या प्रेमपूर्वक वागण्याने शिक्षक विद्यार्थ्यांच्या अंतकरणात एक आदरयुक्त जागा निर्माण करतात. ज्या वेळी विद्यार्थ्यांना भविष्यात भावनिक , मानसिक आधाराची गरज असते, तेव्हा शिक्षक सतत त्यांच्या पाठीशी उभे असतात.
        ज्याप्रमाणे अंधारात चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातात दिवा दिला की त्याला प्रकाश मिळतो ,आणि मग तो न अडखळता मार्गक्रमण करू शकतो. अगदी त्याच प्रकारे एक आदर्श शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश देत असतो. हा ज्ञानरूपी प्रकाश विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रत्येक संकटांमध्ये मार्गदर्शन करत असतो.
        शिक्षक आपण शिकवलेले विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समजावे यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या शोधून काढतात. सर्व संकल्पना विद्यार्थी योग्य पद्धतीने कसे आत्मसात करतील ? यासाठी विद्यार्थ्यांना आवडतील व समजतील अशा सोप्या भाषेचा ते वापर करतात.
         शिक्षक त्यांना जो घटक वर्गांमध्ये शिकवायचा असतो त्या घटकाशी संबंधित विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य स्वतःबरोबर घेऊन येतात. त्यातील बरेच साहित्य शिक्षकांनी स्वतः तयार केलेले देखील असते. शिक्षक ज्यावेळी स्वतः तयार केलेले साहित्य वर्गामध्ये घेऊन येतात आणि शिकवतात तेव्हा मात्र अध्यापनला एक वेगळाच रंग आलेला असतो. शिक्षकांमध्ये ही सर्जनशीलता बघून विद्यार्थी देखील स्वतःच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन नवनवीन युक्त्या सुचवतात. हीच कल्पनाशक्ती भविष्यामध्ये त्यांना यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडते.
       ज्या पद्धतीने निसर्गाने तयार केलेली कोणतीही वस्तू निरुपयोगी नाही किंवा निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी प्रयोजन हे असतेच . अगदी त्या पद्धतीनेच शिक्षकांनी केलेल्या प्रत्येक कृती मागून विद्यार्थी काही ना काही शिकत असतोच. याची सर्वस्वी जाणीव एका चांगल्या शिक्षकांना नेहमीच असते. या  जाणिवेमुळेच एक उत्कृष्ट शिक्षक कधीही आपले आचरण ढळू देत नाही.
        औद्योगिकरणाच्या या युगामध्ये जग वेगाने बदलते आहे. बदलत्या जगाबरोबर अस स्वतःमधील कौशल्य देखील वृद्धिंगत करणे अत्यंत गरजेचे आहे .त्यामुळे शिक्षक सतत नवनवीन तंत्रज्ञान आणि विज्ञान शिकण्याचा प्रयत्न करत असतात.बदलत्या जगात टिकाव लागावा म्हणून चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मार्गांचा सतत परिचय करून देत  असतात .
       धन्यवाद.

    प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा शिक्षक वर मराठी निबंध | essay on teacher in marathi language कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हालाही कोणता निबंध हवा असेल तर त्याविषयी देखील मला कमेंट मध्ये सांगा . मी तुम्हाला त्या विषयी निबंध लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

वरील शिक्षकावर आधारित निबंध लोक खालील प्रमाणेही शोधतात.

  1. | शिक्षक दिन निबंध
  2. | माझे आदर्श शिक्षक निबंध
  3. | उपक्रमशील शिक्षक निबंध
  4. | शिक्षक दिन निबंध मराठी
  5. | माझे आवडते शिक्षक निबंध
  6. | माझा शिक्षक माझा प्रेरक निबंध लेखन


   

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने