www.upkarmarathi.com


|गुन्हेगारीशास्त्र | गुन्हेगारीचे प्रकार | गुन्हेगारी एक सामाजिक शास्त्र.


           |गुन्हेगारी शास्त्र
 | गुन्हेगारीचे प्रकार
 | गुन्हेगारी एक सामाजिक शास्त्र.

        प्रत्येक समाजात स्वतःची एक मूल्यव्यवस्था अस्तित्वात आलेले दिसून येते. यामुळे व्यवस्थेनुसार समाजात राहणाऱ्या लोकांनी आपले वर्तन ठेवावे अशी अपेक्षा असते.



प्रिय मित्रानो आज आपण या लेखात खालील मुद्दे पाहणार आहोत .
  • प्रस्तावना 
  • | गुन्हा म्हणजे काय ?
  • | सामाजिक नियंत्रणाची गरज
  • | गुन्हेगारीची व्याख्या
  • | गुन्हेगारीचे प्रकार
  • | Sutherland यांनी सांगितलेले गुन्ह्यांचे व   गुन्हेगारांचे वर्गीकरण
  • |बोगर यांनी सांगितलेले गुन्ह्यांचे व   गुन्हेगारांचे वर्गीकरण
  •  | हेज यांनी सांगितलेले गुन्ह्यांचे व   गुन्हेगारांचे वर्गीकरण
  •  |लोंब्रोसो यांनी सांगितलेले गुन्ह्यांचे व   गुन्हेगारांचे वर्गीकरण
  •  |गुन्हेगारीची कारणे
  • | गुन्हेगारी रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल


     
   | गुन्हा म्हणजे काय ?

     गुन्ह्याचा संबंध व्यक्ती व समाज या दोघांशी असल्याने गुन्हा ही एक सामाजिक घटना आहे असे म्हटले जाते. प्रत्येक  देश प्राचीन काळापासून गुन्ह्यांच्या प्रश्नाला तोंड देत आहे. व्यक्ती व समाज या दोघांच्या दृष्टीने गुन्हा ही सामाजिक समस्या असून ती प्राचीन काळापासून मानवी समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा अभ्यास विविध सामाजिक शास्त्रात केला जातो.
    उदाहरणार्थ कायदे शास्त्रात गुन्हेगारीचा अभ्यास केला जातो. गुन्ह्यांचा संपूर्णपणे अभ्यास करण्याच्या शास्त्रास  गुन्हेगारी  शास्त्र , क्रिमिनलॉजी (criminology)   हे एक स्वतंत्र शास्त्र विकसित झाले आहे. या शास्त्रामध्ये गुन्हा हा व समाज यांच्यामधील अभ्यास केला.
   प्रत्येक समाजातील सामाजिक संस्था व्यक्तींकडून असणाऱ्या अपेक्षा या आधारावर समाजाचे एक संघटन निर्माण केले गेलेले असते या संघटनेतील नियमांप्रमाणे व्यक्तीने आपले वर्तन ठेवले तर समस्या निर्माण होत नाही . थोडक्यात गुन्ह्याची व्याख्या अशा प्रकारे करता येईल की , जे वर्तन समाजाला अमान्य आहे असे वर्तन म्हणजे गुन्हा व असे वर्तन करणारे लोक म्हणजे गुन्हेगार.

| सामाजिक नियंत्रणाची गरज

समाजरचना कोणत्याही प्रकारची असो त्यात सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता असतेच समाजातील व्यक्ती व्यक्तींमध्ये अनेक प्रकारचे भेद असतात व्यक्तींच्या आवडीनिवडी सवयी यात व्यक्तीनुसार फरक असतो समूहांच्या श्रद्धा सामाजिक मूल्य आचार-विचार या बाबतीत फरक दिसून येतो समाजातील प्रत्येक व्यक्ती बौद्धिक दृष्ट्या आचरण दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या परस्परांपासून भिन्न असते.
    सामाजिक एकता टिकवणे व समाज प्रगतीपथावर नेणे हे समाजाचे कर्तव्य असल्यामुळे परस्परातील सांस्कृतिक व बौद्धिक व मतभेद जास्त विकोपाला जाऊ नये यासाठी नियंत्रणाची आवश्यकता निर्माण झाली आहे.
   समाज वैचारिकरित्या पुढारलेला असो की मागासलेला असो त्यामध्ये सामाजिक नियंत्रण असायलाच हवे कारण त्याशिवाय समाजाचे सातत्य व एकता अबाधित राहणे अशक्य आहे नियंत्रणामुळे निरनिराळ्या समूहातील व्यक्तींमध्ये परस्परांत बरोबर जुळवून घेण्याची प्रवृत्ती वाढते व्यक्तींमध्ये सामूहिक जाणीव निर्माण होण्यास मदत होते.
    समाजातील सर्वच व्यक्ती सारख्या प्रवृत्तीच्या नसतात. काही व्यक्ती स्वार्थी असतात दुसर्‍याची पिळवणूक करणे हाच त्यांचा व्यवहार असतो व अशा व्यक्ती सामाजिक विघटनाला आणि गुन्हेगारीला जबाबदार ठरतात सामाजिक नियंत्रणाच्या साधनांमुळे अशा व्यक्तींच्या वर्तनावर आळा घातला जातो व सामूहिक हित साधले जाते.

   | गुन्हेगारी ची व्याख्या

१. इलियट व मेरील


     इलियट व मेरील यांच्या मते गुन्हा म्हणजे कायद्याच्या विरुद्ध वर्तन जे केल्यास मृत्यूदंड किंवा तुरुंगात सुधारगृहात किंवा तत्सम ठिकाणी डांबून ठेवण्याची शिक्षा दिली जाते.

२. डॉक्टर सेठना


   डॉक्टर सेठ ना यांच्या मते गुन्हा म्हणजे कायद्याच्या दृष्टीने कोणतीही व्यक्ती म्हणजे चे वय सात वर्षांपेक्षा जास्त असून त्या देशातील कायद्याने ठरवल्याप्रमाण ती सज्ञान अपराधी होऊ शकते आणि तिने गुन्हा किंवा परत केल्यास ती गुन्हेगार होऊ शकते . फक्त ती व्यक्ती वेडी नसावी.

३. हर्टन आणि लेस्ली


  यांच्यामते गुन्हा म्हणजे कायद्याचे केलेले उल्लंघन होय.

४. गिलीन व गिलीन


      गिलीन व गिलीन यांच्या मते कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा म्हणजे त्या देशातील कायद्याचे उल्लंघन होय.

    सर्व विचारवंतांचे या बाबतीत एकमत आहे की गुन्हा ही समाजविघातक कृती आहे. त्यामुळे समाजाचे संघटन  धोक्यात येते. सामान्य व्यक्ती असुरक्षित बनतात व लोकांमध्ये गुन्ह्यांमुळे दहशतीची परिस्थिती निर्माण होते.

| गुन्हेगारीचे प्रकार

   समाजशास्त्र मध्ये सामाजिक अपराध शास्त्र या विषयाची नवीन शाखा अस्तित्वात आलेली आहे. अपघात शास्त्रांमध्ये गुन्हा आणि गुन्हेगारांचे वर्गीकरण ज्या विविध शास्त्रज्ञांनी केले आहे त्यांचा सविस्तर विचार केला जातो.

१. Sutherland यांनी सांगितलेले गुन्ह्यांचे व   गुन्हेगारांचे वर्गीकरण

       या विचारवंताने गुन्ह्यांच्या स्वरूपावरून गुन्ह्यांचे व  गुन्हेगारांचे वर्गीकरण केलेले आहे.

A) गंभीर स्वरूपाचे गुन्हे :

    या प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये गुन्हेगार मानवी हत्या दरोडेखोरी जगात कराची चोरी यासारख्या समाजावर व्यापक परिणाम किंवा प्रभाव टाकण्याच्या गुन्ह्यांचा अंतर्भाव होतो.

B) साधारण गुन्हे

यातील गुन्हे परिस्थितीजन्य असतात. किरकोळ चोर्‍या मारामार्‍या इत्यादी अनेक वेळा व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊन परिणामांची पर्वा न करता गुन्हे करतात व याबद्दल त्यांना पश्चाताप होतो.

C) पांढरपेशी गुन्हेगारी

   जे गुन्हेगार समाजात आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या उच्च समजले जातात अशा गुन्हेगारांचा उल्लेख पांढरपेशे गुन्हेगार असा करता येईल.

२) बोगर यांनी सांगितलेले गुन्ह्यांचे व   गुन्हेगारांचे वर्गीकरण 

  बोगर यांनी भांडवलशाही हे गुन्हेगारी वृत्ती निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण मांडलेले आहे. त्यांच्या मते भांडवलशाहीमुळे , बालकामगार , कामगारांवर अन्याय  ,झोपडपट्ट्या , अज्ञान , गरिबी , व्यसनाधीनता इत्यादी गोष्टी समाजात निर्माण होत असतात.
 
    बोगर यांनी याशिवाय याच गुन्ह्यांचे चार प्रकार केलेले आहेत
  1. आर्थिक गुन्हे 
  2. यौवन विषयक गुन्हे
  3.  राजनैतिक गुन्हे 
  4. विविध गुन्हे

| आर्थिक गुन्हे

   यामध्ये चोऱ्या मारामारी अफरातफर भ्रष्टाचार इत्यादी प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो.

| यौवन विषयक गुन्हे

  आधुनिक मुक्त समाज व्यवस्थेमध्ये गुन्हेगारीचा हा भयंकर प्रकार सर्वत्र आढळून येतो.

| राजनैतिक गुन्हे

    जागून यांचा संबंध देशाच्या राजकारणाशी राजकीय घटनांशी आहे त्या सर्व गुन्ह्यांना राजनैतिक गुन्हे असे म्हणता येईल.

विविध गुन्हे

  या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामाजिक मूल्यांच्या विरुद्ध होणारी सर्व गुन्हेगारी समाविष्ट करता येईल.

३) हेज यांनी सांगितलेले गुन्ह्यांचे व   गुन्हेगारांचे वर्गीकरण 

    हेज या गुन्हाशास्त्रज्ञाने गुन्हेगारांचा गुन्हा करण्याचा उद्देश कोणता आहे? या आधारावर गुन्हेगारीचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे.
  1. व्यवस्थेविरुद्ध होणारे गुन्हे
  2. संपत्ती विरुद्ध होणारे गुन्हे
  3. व्यक्तीविरुद्ध होणारे गुन्हे
  4. व्यवस्थेविरुद्ध होणारे गुन्हे
   समाजातील एखाद्या गटाला जर प्रचलित व्यवस्था मान्य नसेल तर सामान्य असणारे लोक हत्तीने व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतात असा प्रयत्न करीत असताना बऱ्याचदा हिंसाचार व इतर मार्गांचा उपयोग केला जातो यामध्ये सरंजामशाही व भांडवलशाहीच्या विरुद्ध होणारे गुन्हे यांचा समावेश होतो.

संपत्ती विरुद्ध होणारे गुन्हे

  समाजात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांपैकी बहुसंख्य गुन्हेगार याच प्रकारातील असतात. समाजात जर अति श्रीमंत व अति गरीब असे सांपत्तिक दृष्ट्या दोन टोकाचे वर्ग निर्माण झालेले असतील तर असे वर्ग एकमेकांचा द्वेष करतात त्यातून प्रामुख्याने कनिष्ठ आर्थिक वर्गांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढत जाते.

व्यक्तीविरुद्ध होणारे गुन्हे

  एखाद्या व्यक्ती विरुद्ध त्याच्या संपत्तीवर लक्ष ठेवून जेव्हा केले जातात तेव्हा त्यांना व्यक्ती विरुद्ध घडणारे गुन्हे असे म्हणतात या गुन्ह्यांमध्ये नियोजन बद्धता असलेली दिसून येते एखाद्या व्यक्तीला हेरून तिच्यावर पाळत ठेवले जाते तिच्या संपत्तीक परिस्थितीचा पूर्ण अंदाज घेऊन असे चोऱ्यामाऱ्याचे गुन्हे होतात.

४) लोंब्रोसो यांनी सांगितलेले गुन्ह्यांचे व   गुन्हेगारांचे वर्गीकरण 

    या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने गुन्हा व गुन्हेगारांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे.
     
  1. भावनाप्रधान गुन्हेगार
  2. मनोविकृत गुन्हेगार
  3. आकस्मित गुन्हेगार

भावनाप्रधान गुन्हेगार

  काही व्यक्ती हे जन्मजात गुन्हेगार नसतात े सामान्य प्रवृत्तीचे असतात परंतु परिस्थिती च्या आहारी जाऊन बर्‍याचदा ते गुन्हेगार बनतात भावनेच्या आधारे जाउन जे गुन्हे केले जातात त्यांना भावनिक गुन्हे म्हणतात व असे गुन्हे करणाऱ्यांना भावनाप्रधान गुन्हेगार असे म्हणतात.

मनोविकृत गुन्हेगार

   जे गुन्हेगार मनोविकृत असतात. कोणत्याही गोष्टीचा साधक-बाधक विचार करण्यास असमर्थ असतात त्यांचा समावेश या प्रकाराच्या गुन्ह्यांमध्ये करता येईल. अशा प्रकारचे गुन्हेगार नेहमीच अपसामान्य वागतांना दिसून येतात.

आकस्मिक गुन्हेगार

     गुन्हेगारी करावी असे मनात नसते परंतु अचानक परिस्थिती समोर हार मानून गुन्हा करावा लागतो, तसेच ज्यांना आपण नेमके काय करत आहे याचे भान देखील राहत नाही . अशा प्रकारच्या गुन्हेगारांना अकस्मिक गुन्हेगार असे म्हणावे लागेल.
 

| गुन्हेगारीची कारणे

   समाजाने तयार केलेले नियम भंग करून ज्यावेळी एखादी व्यक्ती कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा करते तेव्हा ती व्यक्ती तो गुन्हा का करते याची कारणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
     एखाद्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करण्याकरता अनेक कारणे असतात त्याबद्दल पद्धतशीर अभ्यासाला "अपराध विज्ञान" म्हटले जाते.

   1917 च्या अखेरीस गुन्हे आणि गुन्हेगारी या विषयाच्या शास्त्रीय अभ्यास करण्याबद्दल लोक जागृत झाले आणि समाजशास्त्र व विज्ञान शाखेच्या अभ्यासावर या विषयांवर भर देऊन विविध विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला.
    त्यापूर्वी धर्मशास्त्रात ,  वैद्यकीय तज्ञ  , मानस उपचर तज्ञ
 समाजसुधारक यांनी गुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही व त्यानंतर अनेक वैज्ञानिक आणि समाजशास्त्रज्ञ यांनी विविध प्रकारची गुन्ह्यांची कारणे सांगितले आहे गुन्हा हा अनेक कारणांच्या एकत्रिकरणामधून घडत असतो.

| गुन्हेगारी रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल


 गुन्ह्यांना प्रतिबंधात्मक उपाय किंवा त्यांच्या पुनर्वसनासाठी काही मुद्दे खालीलप्रमाणे दिले आहेत.

  1. गुन्हेगाराला तो कैदी असताना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे.
  2. गुन्हेगाराच्या सुप्त गुणांचा विकास करणे.
  3. कैद्यांची संगत चांगली राहील याचा सतत विचार करणे.
  4. निरक्षर असलेल्या कैद्यांना साक्षर बनवणे.
  5. गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी त्याला लघु उद्योग सुरू करायला मदत करणे.
  6. लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  7. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी जनजागृती करणे.

     प्रतिबंधक उपाय हे गुन्हेगारांना सुधारण्याचे आणि त्यांना गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करण्याचे एक साधन आहे. गुन्हेगारी ज्यामधून जन्माला येते त्या सामाजिक , आर्थिक, राजकीय, शारीरिक आणि इतर प्रकारच्या परिस्थितीवर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे आपल्या हातामध्ये नसले तरी देखील आपण किमान गुन्हेगारांना एक अधिक चांगले आणि अधिक अर्थपूर्ण असे जीवन कसे जगावे ? यासाठी मार्गदर्शन व त्या जगण्यासाठी एक संधी देऊन त्यांना नक्की मदत करू शकतो.

गुन्हेशास्त्र संबंधी लोक खालील प्रमाणे शोध घेतात.

  1. | गुन्हेगारीचे प्रकार
  2. | गुन्हा म्हणजे काय
  3. | गुन्हेगारी शास्त्र हा शब्द कोणी बनवला
  4. | टीकात्मक गुन्हेगारी शास्त्राशी कोण संबंधित आहे
  5.  |गुन्हेगारी रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल
  6. | युवकांमधील वाढती गुन्हेगारी
  7.  | गुन्हेगारी एक सामाजिक शास्त्र. 





Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने