www.upkarmarathi.com

महिला सशक्तिकरण  
 | महिला सबलीकरण काळाची गरज
| महिला सक्षमीकरण काळाची गरज, मराठी निबंध
 | women empowerment essay in Marathi

 
                          एकविसाव्या शतकामध्ये जग अत्यंत वेगाने बदलत आहे. आजचे युग हे आधुनिक युग आहे. या युगामध्ये महिला सशक्तिकरण किंवा महिला सबलीकरण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलांचे सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण याचा अर्थ स्त्रियांना आत्ताच्या युगामध्ये जगण्यासाठी सर्व बाबतीत सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. सक्षम व्यक्ती जीवन जगताना महत्त्वाचे निर्णय स्वतः घेऊऊ शकतो व स्वतःच्या हिमतीवर जीवन जगू शकतो .
           आज आपण " महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध (women empowerment in Marathi)"  बघूया.
      महिला सक्षमीकरणाशी  संबंधित हा निबंध तुम्हाला शाळा, कॉलेज तसेच विविध स्पर्धांमध्ये उपयोगी पडेल . याचा नीट अभ्यास करा व तुमच्या शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. चला तर मग बघुया एक छानसा निबंध,  महिला सक्षमीकरण काळाची गरज.
women empowerment essay in Marathi
महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध मराठी


महिला सशक्तिकरण निबंध मराठी
| women empowerment essay in Marathi

      भारताची निम्मी जनसंख्या ही स्रिया आहेत. या जन संख्येचे सशक्तीकरण करणे अत्यंत गरजेचे आहेच. स्त्रियांचे महत्व आज जगाला  स्त्रियांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. प्राचीन धर्मग्रंथांमध्येसुद्धा स्त्रियांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. संस्कृत भाषेमध्ये एक सुंदर सुभाषित आहे." यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता" . याचा अर्थ असा की, ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते ,त्यांचा आदर केला जातो ,मान राखला जातो अशा ठिकाणीच देवांचे देखील वास्तव्य असते.
       सध्याच्या काळामध्ये महिलांचे सशक्तीकरण फारच चर्चेचा विषय बनला आहे. त्यासाठी शासनाने विविध योजना देखील आखलेल्या आले आहेत. तरीदेखील आपल्या देशातील अनेक भागांमध्ये स्त्रिया सक्षम आणि असुरक्षित व अशिक्षित असलेल्या दिसून येतात. स्त्रियांकडे अत्यंत हीन भावनेने पाहिले जाते.
         स्त्रियांचे महत्व आणि त्यांचे अधिकार संपूर्ण जगाला कळावे यासाठी संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन तसेच मातृ दिवस साजरे केले जातात. असे दिवस साजरे करून स्त्रियांना सक्षम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
       भारतासारख्या प्राचीन संस्कृती लाभलेल्या देशांमध्ये सुद्धा आज देखील हुंडा , लैंगिक अत्याचार, असमानता, घरेलू हिंसा आणि स्त्रीभ्रूणहत्या यासारख्या कुप्रथा जिवंत आहेत. शासनाने आता अशा प्रथांना कायदेशीर बंदी घातलेली आहे परंतु तरीदेखील लपून-छपून चोरट्या मार्गाने या प्रथा आज देखील मोठ्या प्रमाणात पाळल्या जात असताना दिसतात.
       आपल्या सगळ्यांचे भरण-पोषण करणार्‍या पृथ्वी मातेला देखील आईचीच उपमा दिलेली आहे. यावरून आईचे महत्व विषद होते. स्त्रीही सर्जनशीलतेची आणि सृजनशीलतेची जननी आहे. संपूर्ण मानव जात हे स्त्रिया मुळेच अस्तित्वात आहे. श्री यांची हे महत्त्व लक्षात घेता स्त्रियांना विश्वास धर्म उपासना आर्थिक राजनीतिक इत्यादीचे स्वतंत्र अधिकार देणे आवश्यक आहे आणि भारतीय संविधानाने ते दिलेले देखील आहेत.
        बातम्यांमध्ये आज अनेक वाईट बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात संबंधित तर दिवसातून एकदा तरी बातमी ऐकायला मिळते .त्यामुळे त्याच्या मातापित्यांनी आपल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे अत्यंत गरजेचे आहे.
      एक मुलगी ज्यावेळी सक्षम होती त्यावेळी ती दोन कुटुंबांना समर्थपणे सांभाळू शकते. त्यामुळे सदर स्त्रीला पुरुषाची शक्ती असे संबोधले जाते.
      महिला सशक्तीकरण यासाठी महिलांना पुरुषांप्रमाणेच सर्व अधिकार दिले गेले पाहिजेत. आता ज्या पद्धतीने अधिकार आणि स्वातंत्र्य दिले गेले आहे त्यामुळे स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवत आहेत.
      भारताच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत महिलांच्या सशक्तिकरण आकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. बेटी बचाव बेटी पढाव योजना उज्वला योजना महिला हेल्पलाइन योजना सपोर्ट ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वूमन यासारख्या उत्कृष्ट योजना शासनामार्फत राबवल्या जात आहेत निवडणुकांमध्ये देखील महिलांसाठी आरक्षित जागा ठेवल्या जात आहेत काही प्रमुख महिला सशक्तिकरण याच्या योजना भारत सरकार द्वारे राबवण्यात येत आहेत.
        आपला भारत देश ज्या जलद गतीने आर्थिक प्रगती करत आहे सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर देखील भारताचा मान मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या सर्वांमध्ये स्त्रियांची भूमिका ही अत्यंत मोलाची आहे आरोग्यय, शिक्षण , संशोधन,  तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त सरसपणे काम करताना दिसतात.
     इतके सगळे असूनही महिलांच्या सशक्तीकरणासाठी अजून आपल्याला योग्य दिशेने पाऊल उचलणे गरजेचे आह. शासनाने देशातील महिला सक्षमीकरणाची खोली समजून घेऊन त्या प्रमाणात लोकांमध्ये जागृती निर्माण करायला हवी. पाठ्यपुस्तकांमधून देखील महिलांच्या सशक्तिकरण यासंबंधी लहानपणापासूनच त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी अभ्यासक्रमात बदल केला पाहिजे. हे सगळे केले तर भारताला संपूर्ण जगात महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.


या निबंधाचा लोक खालील प्रमाणे ही शोध घेतात 
  1. |  महिला सक्षमीकरण निबंध
  2. |  महिलांचे सामाजिक सक्षमीकरण 
  3. |  महिला सशक्तिकरण निबंध मराठी
  4. |महिला दिन भाषण


            प्रिय मित्रांनो तुम्हाला हा महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध वाटला हे नक्की कळवा तुमच्या मनात अजून काही कल्पना असतील तर ते देखील कमेंट मध्ये आम्हाला सांगा. खूप खूप धन्यवाद.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने