www.upkarmarathi.com
फळाची आत्मकथा, मराठी निबंध
|Autobiography of fruit in Marathi
मे महिन्याच्या सुट्ट्या लागणार होत्या. शेवटचा दिवस असल्यामुळे शाळेतून कधी एकदा घरी जातो असे झाले होते. घरी गेलो आणि भरपूर खेळलो. दप्तर कपाटात ठेवून कपाटाला कुलूप लावून टाकले. म्हटले आता पाच दिवस अजिबात अभ्यास करायचा नाही फक्त भरपूर खेळायचं आणि मजा करायची. भरपूर खेळून झाल्यानंतर रात्री कधी डोळा लागला ते समजले नाही.
आमचे घर शेतामध्ये आहे .शेतामध्ये भरपूर झाडे लावलेली आहेत. सकाळी मनमोहक सुगंधामुळे मला जाग आली. आंब्याच्या झाडांच्या मोहराचा आणि काही झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा तो सुगंध मला बोलवत होता. अंतराळातून उठून तोंड धुतले आणि धावतच आंब्याच्या झाडांकडे गेलो.
झाडाकडे पोहोचताच आवाजाला या बाळराजे आलात मी तुमची अगदी मनापासून वाट बघत होतो. तुम्हाला मी खूप आवडतो असे माझ्या आईकडून मला समजले. अचानक आलेला आवाज ऐकून मी घाबरून गेलो इकडे तिकडे बघू लागलो. माझी घाबरगुंडी उडालेली बघून पुन्हा आवाज आला अरे, घाबरू नको .मी या झाडावर लागलेला एक आंबा तुझ्याशी बोलतो आहे.
मी आहे सगळ्या फळांचा राजा. तुला आम्ही खूप आवडतात असे मला या झाडाकडून समजले. म्हणून वाऱ्याच्या मदतीने मी तुझ्या पर्यंत माझा सुगंध पोहोचवला आणि तुला माझ्याकडे बोलावून घेतले.
उन्हाळ्याचा कडाका खूपच वाढलेला आहे आणि मला चांगले माहीत आहे की तुम्ही माझी मनापासून वाट बघत असणार. मी आवडत नाही असा माणूस सापडणे फारच कठीण आहे. आणि तुम्ही जेव्हा हा गोड रसाचा आस्वाद घेता तेव्हा मला खूप आनंद होतो.
मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची नुकसान झाले व तुमच्यापर्यंत कमी प्रमाणात आंबे पोहोचले. यावर्षी मात्र मागच्या वर्षाची सगळी कसर निघून जाईल. या वर्षी सगळीकडेच आंब्यांना खूप चांगला मोहर आलेला आहे. त्यामुळे उत्पन्नही खूप वाढेल आणि तुम्हाला रस-पुरी खायलाही मजा येईल.
काही झाडांना आत्ताच मोहोर लागलेला आहे व त्यांना काही छोटे आहेत परंतु काही झाडांचे आंबे मात्र पिकून खाण्यासाठी अगदी तयार झालेले आहेत.
तुम्हाला अनेक फळ आवडत असतील परंतु माझी म्हणजे फळांच्या राजाची बातच काही निराळी आहे. ज्या ठिकाणी उन्हाळा जास्त का राहतो अशा ठिकाणी आंब्यांची झाडे चांगल्या पद्धतीने वाढतात. आंब्याच्या विशिष्ट रसाळ गोड चवीमुळे आंबे लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
आंब्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विटामिन सी आणि विटामिन इ असतात. आंब्याच्या रसामध्ये तंतू देखील असतात त्यामुळे अपचनाची समस्या देखील बऱ्याच प्रमाणात नाहीसे होते. आंब्याचे लोणचे देखील बनवतात. ते शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते.
पूर्वी आंबा फक्त एक उन्हाळ्यामध्ये येणारे फळ म्हणून बघितले जायचे.परंतु आता आंब्याला व्यापारी महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आंब्याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेण्यासाठी अनेक कृषी पद्धतींचा वापर करायला सुरुवात केली आहे.
आज तुझ्याकडे माझे म्हणजे आंब्याचे मनोगत व्यक्त करून मला खूप चांगले वाटले. आता घरी जा आंघोळ वगैरे करून ये आणि मग पुन्हा इकडे ये .माझा आस्वाद घेण्यासाठी. एवढे बोलून आंबा शांत झाला. मीही आंब्याच्या आज्ञेचे पालन करत घराकडे आलो.
या निबंधाचे खालीलप्रमाणे नावे असू शकतात.
- |आंब्याचे मनोगत
- |मी अंबा बोलतो आहे
- |माझे आवडते फळ-आंबा
- |आंबा बोलू लागला तर
- |Autobiography of fruit in Marathi.
- |Essay on autobiography of a fruit in Marathi.
- |My favourite fruit mango
प्रिय मित्रांनो तुम्हाला हा फळाचे मनोगत निबंध कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला अजून कोणताही निबंध हवा असेल तर तेही सांगा मी तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.