www.upkarmarathi.com
प्रिय वाचक मित्रांनो ज्यावेळी एखादी निर्जीव वस्तू आपल्याशी बोलू लागते त्यावेळी कशी मजा येईल हे आपण आजच्या लेखामध्ये बघूया.
आजच्या या निबंधामध्ये आपण बघूया चप्पलचे मनोगत म्हणजेच चप्पल बोलू लागली तर...
chappalche manogat marathi nibandh |
चप्पलचे मनोगत | चप्पलचे आत्मकथन
मे महिन्याच्या सुट्ट्या चालु होत्या. मामाच्या गावाला जायचा बेत आखला. वार ठरला आणि आतुरतेने त्या दिवसाची मी वाट बघू लागलो. कधी एकदा मामाच्या गावाला जातो आणि शेतामध्ये जाऊन मजा करतो असे झाले होते.
ठरलेल्या दिवशी आम्ही आमचा सामान घेऊन निघालो. उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता. वाऱ्याबरोबर उष्णतेची झुळूक अंगावर येत होती आणि संपूर्ण अंग घामाने डबडबले होते. प्रवासामध्ये घाईघाईने माझी चप्पल हरवली. तसाच प्रवास करत असताना गाडीमध्ये उन्हाचा जोर इतका चांगला नाही परंतु जसा गाडीतून खाली उतरलो तसा पायाला जोराचा झटका बसला आणि एक सनक पायातून सरळ डोक्यापर्यंत आली.
सतत पायात असणार्या चपलेचे महत्त्व मला त्या एका क्षणामध्ये कळले. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. चटके बसत असल्यामुळे मी जागीच उड्या मारू लागलो. लगेच आईने मला पिशवीतून चप्पल काढून दिली. चप्पल पायात घातल्यावर बरे वाटले. प्रवासात मी झोपलेला होतो त्यामुळे आईने चप्पल पिशवीत ठेवली होती.
तितक्यात आवाज आला ,आता माझे महत्त्व समजले का ? आवाज कुठून येतं आहे म्हणून मी इकडे तिकडे बघू लागलो. मग पुन्हा आवाज आला ."अरे इकडे तिकडे बघू नको. मी तुझ्या पायातली ही तुझी चप्पलच बोलत आहे."
माझ्याशिवाय तुम्ही कुठे फिरायला ही जाऊ शकत नाही. इतके माझे महत्त्व आहे, परंतु माझी काळजी तुम्ही मनापासून घेता का? किती तरी दिवस झाले तू माझी नीट आंघोळ सुद्धा घातलेली नाहीस. माझ्या अंगावर सगळी धूळ बसलेली आहे. माझा जीव अगदी गुदमरल्यासारखं होतो. पायाला येणाऱ्या घामामुळे माझं शरीर अगदी चिकट झालेला आहे माझी जरा अंघोळ घाल.
मी चप्पल बोलते आहे त्यामुळे तू माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नको. अरे आमचा जन्मच जणू दुसऱ्यासाठी झिजण्याकरता झालेला आहे. कुठेतरी एका कारखान्यांमध्ये आमची निर्मिती केली जाते कुशल कारागिराच्या हातांमधून आम्हाला सुंदर असे रूप प्राप्त होते. मग आम्हाला अनेक दुकानांमधून विक्रीसाठी ठेवले जाते. मग अनेक माणसे दुकानांमध्ये येतात आणि आमचे रूप व मजबुती बघून आम्हाला खरेदी करतात. बऱ्याचदा अनेक आई-वडील आपल्या लहान मुलांना घेऊन येतात आणि मुलांच्या आवडीचे जोडे त्यांना घेऊन देतात.
मुले आनंदाने हे जोडे पायात घालतात आणि घरभर नाचतात ,फिरतात . आनंदाने उड्या मारतात. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावरील आनंद बघून आम्हालाही खूप आनंद होतो. आमचे जीवन धन्य झाले असे आम्हाला वाटते. काही दिवसातच मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात होते आणि आम्हाला गृहीत धरलं जातं. आम्ही तुमच्या पायांचे रक्षण करतो परंतु तुम्ही आमची काळजी घेत नाही त्याचे आम्हाला फार वाईट वाटते.
चप्पलचे मनोगत ऐकून मला फारच वाईट वाटले.मी चप्पल से बोलू लागलो आणि म्हटले तू आता काळजी करू नकोस घरी गेल्याबरोबर मी तुझी चांगले आंघोळ घालतो आणि तुला स्वच्छ करतो तू माझी इतकी काळजी घेतेस तर मी सुद्धा तुझी आज पासून काळजी घेईन असे मी तुला वचन देतो.
बोलण्याच्या नादात मी रस्त्यावर चालतो आहे आणि आईचा हात धरला आहे हे विसरलो माझे बोलणे ऐकून आहे म्हणाले अरे कोणाशी बोलतो आहेस आणि कोणाचे आंघोळ घालतोस. मी आईला हळुच बोललो मी माझ्या जवळच्या माणसाशी बोलत आहे
आता चप्पल ही शांत झाली होती आणि मामाचे घरही आले होते. मी मात्र मनात पक्के ठरवले होते की आता माझ्या चप्पलची काळजी घ्यायची , कारण ती माझ्या पायांची एक ती मनापासून काळजी घेते.
प्रिय वाचक मित्रांनो या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
- चप्पलची कैफियत
- चप्पलचे मनोगत
- चप्पलचे आत्मकथन
- चप्पलची आत्मकथा
- चप्पल बोलू लागली तर
- मी चप्पल बोलते आहे
प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा चप्पलचे मनोगत निबंध कसा वाटला ? हे मला कमेंट करून नक्की सांगा , आणि तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचे निबंध हवे असतील तर तेही कळवा.
तुम्ही काही निबंध अथवा लेख लिहिले असतील तर ते आम्हाला पाठवा आम्ही ते तुमच्या नावासह या साइटवर टाकू.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.